ETV Bharat / city

टिपू सुलतान नावाला भाजपाने तेव्हा विरोध का केला नाही? - महापौर किशोरी पेडणेकर

author img

By

Published : Jul 16, 2021, 8:36 PM IST

Updated : Jul 16, 2021, 8:50 PM IST

टिपू सुलतान हे नाव आधीच गोवंडी येथील रस्त्याला देण्यात आले आहे. यामुळे पुन्हा हे नाव त्याच विभागातील उद्यानाला देता येईल का याबाबत पालिकेचा कायद नियम याची पडताळणी करण्यासाठी प्रस्ताव प्रशासनाकडे परत पाठवला आहे. प्रशासनाचा अहवाल आल्यावर निर्णय घेऊ, असे महापौरांनी सांगितले.

महापौर किशोरी पेडणेकर
महापौर किशोरी पेडणेकर

मुंबई - गोवंडी येथील रस्त्याला टिपू सुलतान यांचे नाव देण्यावरून महापालिकेतील वातावरण तापले आहे. टिपू सुलतान यांचे नाव याआधीही रस्त्याला देण्यात आले आहे. त्यावेळी शिवसेनेसोबत भाजपा सत्तेत होती. मग त्यावेळी भाजपाने त्याला का विरोध केला नाही? असा सवाल करत भाजपाने धर्माचे राजकारण करू नये, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.

महापौर किशोरी पेडणेकर

'आम्ही हिंदुत्व सोडलेले नाही'

मुंबईमध्ये गोवंडी येथील प्रभाग क्रमांक १३६ येथील समाजवादी पक्षाच्या नगरसेविका रुकसाना सिद्दीकी यांनी गोवंडी येथील महापालिकेच्या उद्यानास 'टिपु सुलतान उद्यान' असे नाव देण्याची विनंती ठरावाच्या सूचनेद्वारे केली होती. या नामकरणासाठी महापालिकेच्या उद्यान विभागाने नामकरणाची शिफारस केलेली आहे. टिपू सुलतान हे चांगले शासक आणि इंग्रजांविरोधात आंदोलन करणारे पहिले क्रांतिकारी होते असे प्रस्तावात म्हटले आहे. याला भाजपाने विरोध केला आहे. यावर महापौर बोलत होत्या. यावेळी बोलताना २०१३ मध्ये भाजपा शिवसेनेसह सत्तेत सहभागी होती. त्यावेळी गोवंडी येथील रस्त्याला टिपू सुलतान यांचे नाव देण्यात आले होते. सदर नाव देताना भाजपाच्या एकाही नगरसेवकाने त्याला विरोध केलेला नव्हता. आम्ही हिंदुत्व सोडले म्हणून भाजपावाले टीका करतात. आम्ही हिंदुत्व सोडलेले नाही. दुसऱ्यांच्या धर्माचा आदर करणे गरजेचे आहे. आम्हाला शिवसेना पक्ष प्रमुखांनी हेच शिकवले आहे. त्यामुळे आज विरोधात बसले म्हणून धार्मिकवाद निर्माण न करता भाजपाने धर्माचे राजकारण करू नये, असे महापौरांनी म्हटले आहे. टिपू सुलतान हे नाव आधीच गोवंडी येथील रस्त्याला देण्यात आले आहे. यामुळे पुन्हा हे नाव त्याच विभागातील उद्यानाला देता येईल का याबाबत पालिकेचा कायद नियम याची पडताळणी करण्यासाठी प्रस्ताव प्रशासनाकडे परत पाठवला आहे. प्रशासनाचा अहवाल आल्यावर निर्णय घेऊ, असे महापौरांनी सांगितले.

भाजपा नगरसेवकाचे अनुमोदन

टिपू सुलतान यांचे नाव गोवंडी येथिल रस्त्याला देण्यात आले आहे. या नाव देण्याच्या प्रस्तावाला भाजपाचे नगरसेवक अमित साटम यांनी अनुमोदन दिले आहे. डिसेंबर २०१३ चा प्रस्ताव आहे. त्यावेळी शिवसेना आणि भाजपा हे दोन्ही मित्र पक्ष सत्तेत युती म्हणून एकत्र होते. माजी अपक्ष नगरसेवक सिराज सिद्दीकी यांनी रस्त्याला नाव देण्याचा प्रस्ताव आणला होता.

काय आहे मागणी?

स्थानिक नगरसेविका यांनी वर्णन करताना प्रस्तावात टिपु सुलतान हे भारताचे क्रांती सेनानी होते. योग्य शासक, महान योद्धा, विद्वान असे त्यांचे वर्णन केलेले आहे. भारताला इंग्रजांपासून मुक्त करण्यासाठी त्यांनी पहिला प्रयत्न केला होता, असे समाजवादी पक्षाच्या नगरसेविका रुकसाना सिद्दीकी यांनी म्हटले आहे. प्रत्येक लोकप्रतिनिधी आपल्या विभागात ज्या समुदायातील लोक राहतात त्यांच्या समुदायातील नावे दिली जातात. भारतात आपण सर्व बंधू भावाने राहत आहोत. यामुळे एखाद्या नावाला विरोध करणे योग्य नाही, असे सिद्दीकी यांनी म्हटले आहे. या उद्यानाला नाव देण्यासाठी पालिका प्रशासनाने होकारार्थी अभिप्राय देण्यात आला आहे. टिपू सुलतान यांचे नाव देण्यास हिंदू जनजागृती समितीने विरोध दर्शवला आहे. त्यानंतर आज हा प्रस्ताव बाजार आणि उद्यान समितीच्या बैठकीत आला असता त्याला भाजपाने विरोध केला आहे.

'भाजपा रस्त्यावर उतरून आंदोलन करेल'

टिपू सुलतान यांचा इतिहास प्रस्तावात चुकीचा दाखवण्यात आला आहे. टिपू सुलतान हे धर्मांध, क्रूरकर्मा, जुलमी, अत्याचारी व हिंदू द्वेष्टा राजा होता. टिपु सुलतान याने म्हैसूर राज्याला मुस्लिम राष्ट्र घोषित केले होते आणि या राज्यामध्ये सर्व हिंदूंचे धर्मांतर करून त्यांना मुसलमान करण्याची घोषणा केली होती. लाखो हिंदूंची हत्या, कत्तल करत असताना त्याने 40 हजार ख्रिश्चनांनाही बंदी बनवले होते. यासाठी भाजपाच्या नगरसेवकांनी उप सूचना मांडून प्रस्ताव रद्द करण्याची मागणी केली. मात्र बाजार आणि उद्यान समितीच्या अध्यक्ष प्रतिमा खोपडे यांनी उपसूचनेची नोंद न घेता प्रस्ताव फेर विचारला पाठवला. समाजवादी पक्ष राज्यात महाविकास आघाडीत असल्याने शिवसेनेने त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला आहे. या उद्यानाला टिपू सुलतान यांचे नाव दिल्यास भाजपा रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारा नगरसेवक भालचंद्र शिरसाट, पंकज यादव, सपना म्हात्रे, रजनी केणी आदी नगरसेवकांनी दिला आहे.

Last Updated : Jul 16, 2021, 8:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.