ETV Bharat / city

कुंभमेळ्यातील भाविकांकडून प्रसाद म्हणून कोरोना वाटप, किशोरी पेडणेकर यांचे वादग्रस्त वक्तव्य

कुंभमेळ्यातून मुंबईत येणाऱ्यांना थेट क्वारंटाइन करणार असल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. या वेळी महापौरांनी कुंभमेळ्यातील भाविक सर्वत्र कोरोना प्रसाद म्हणून वाटत असल्याची टीकाही केली.

author img

By

Published : Apr 17, 2021, 6:04 PM IST

Updated : Apr 17, 2021, 7:18 PM IST

मुंबई
मुंबई

मुंबई - हरिद्वारमधील कुंभमेळ्यामध्ये कोरोनाचा विस्फोट झाला आहे. मुंबईतही कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत असल्याने कोरोनाचा आणखी प्रसार होऊ नये म्हणून कुंभमेळ्यावरून येणाऱ्या लोकांना क्वारंटाइन केले जाणार असल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. कुंभमेळ्यातील भाविक सर्वत्र कोरोना प्रसाद म्हणून वाटत असल्याची टीकाही महापौरांनी केली आहे.

कुंभमेळ्यातील भाविकांकडून प्रसाद म्हणून कोरोना वाटप, किशोरी पेडणेकर यांचे वादग्रस्त वक्तव्य

मुंबई - उत्तराखंड येथील हरिद्वारमध्ये कुंभमेळा सुरू आहे. या कुंभमेळ्यात भाविकांनी मोठी गर्दी केली असल्याने त्याठिकाणी कोरोना चाचणी केली असता. 10 ते 14 एप्रिलदरम्यान 2,36,751 जणांच्या कोविड चाचण्या केल्या, त्यापैकी 1701हून अधिक लोकांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे समोर आले आहे. यामुळे कुंभमेळा कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे.

सर्वाधिक वाचली गेलेली बातमी- निवृत्त पोलिसासोबत झालेल्या झटापटीत सराईत गुन्हेगाराचा मृत्यू, बघा थरारक VIDEO

स्वखर्चाने क्वारंटाइन -

कुंभमेळ्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत. त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना कोरोनाची लागण झाली असल्याची शक्यता असल्याने असे भाविक मुंबईत आल्यास त्यांना त्यांच्या खर्चाने क्वारंटाइन केले जाईल अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. कुंभमेळ्यातील भाविक ज्या ज्या ठिकाणी जात आहेत त्या त्या ठिकाणी कोरोना प्रसाद म्हणून वाटत असल्याची टीकाही महापौरांनी केली आहे. भावना-भक्ती या सगळ्या गोष्टी आहेत. मात्र, तुम्ही जिवंत राहिलात तरच. काही गोंधळी लोक या लोकांना उकसवत आहेत, असा टोलाही किशोरी पेडणेकरांनी भाजपला लगावला आहे.

तर लॉकडाऊन -

मुंबईत कोरोना पसरत आहे. त्यानंतरही नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. मुंबईकरांची काळजी घ्यायला आम्ही आहोत. 19 हजारावरून 25 हजार इतकी बेडची संख्या वाढवली आहे. 6 जंबो सेंटर उभारले आहेत. रुग्णसंख्या वाढत असल्याने सुविधा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. ऑक्सिजन कमी पडू लागले आहे. ऑक्सिजनचा तुटव़डा जाणवत आहे. त्यानंतर लगेच रुग्णांना इतर रुग्णालयात आणि कोव्हिड सेंटरमध्ये हलवण्यात आले आहे, हे दृश्य मुंबईकरांनी कधीच पाहिले नाही. आता सर्व सुविधा कमी पडू लागल्या आहेत. यामुळे मी हात जोडून विनंती करते, कृपया घराबाहेर पडू नका, यामुळे नागरिकांनी यापुढे लॉकडाऊन हवा आहे का याचा विचार करावा असे आवाहन महापौरांनी केले आहे.

Last Updated : Apr 17, 2021, 7:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.