ETV Bharat / city

Hanuman Chalisa At Matoshree : मातोश्री आमचे श्रद्धास्थान, आव्हान द्याल तर जशास तसे उत्तर देऊ.. राणा दाम्पत्याला शिवसैनिकांचा इशारा

author img

By

Published : Apr 16, 2022, 3:34 PM IST

शिवसेनेचे शक्तिस्थळ असलेल्या मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा ( Hanuman Chalisa At Matoshree ) पठण करण्याचा इशारा खासदार नवनीत राणा ( MP Navneet Rana ) आणि त्यांचे पती आमदार रवी राणा ( MLA Ravi Rana ) यांनी दिला होता. त्यावरून आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेर मोठ्या संख्येने गर्दी करत जशाच तसे उत्तर देऊ असा इशारा ( Shivsainik Aggressive Against Navneet Ravi Rana ) दिला.

मातोश्री आमचे श्रद्धास्थान, आव्हान द्याल तर जशास तसे उत्तर देऊ.. राणा दाम्पत्याला शिवसैनिकांचा इशारा

मुंबई - खासदार नवनीत राणा ( MP Navneet Rana ) आणि त्यांचे पती आमदार रवी राणा ( MLA Ravi Rana ) यांनी मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा ( Hanuman Chalisa At Matoshree ) पठण करू, असा इशारा दिल्यानंतर शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले ( Shivsainik Aggressive Against Navneet Ravi Rana ) आहेत. आज सकाळपासूनच मातोश्रीबाहेर शिवसैनिकांची तुफान गर्दी बघायला मिळाली. याप्रसंगी नवनीत राणा व आमदार रवी राणा यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणामध्ये इथे घोषणाबाजी करण्यात आली. विशेष करून शिवसैनिकांच्या महिला रणरागिनी मोठ्या प्रमाणामध्ये येथे उपस्थित होत्या.

हनुमान चालीसा पठण करण्याचा मुद्दा : सध्या राज्यात हनुमान चालीसा मुद्दा चांगलाच गाजत आहे. अशात आज हनुमान जयंती आहे. त्यानिमित्ताने उत्साहाला उधाण आलं आहे. यामध्ये आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हनुमान चालीसा पठण करण्याचे आव्हान दिले आहे. तसेच त्यांनी हनुमान चालीसा पठण केल नाही तर, मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण करण्याचा इशाराही राणा दाम्पत्यांनी दिला आहे. त्याच कारणासाठी आज मातोश्रीबाहेर मोठ्या प्रमाणामध्ये शिवसैनिकांनी गर्दी केली.

जशास तसे उत्तर देऊ : मातोश्री आमचे श्रद्धास्थान आहे. इथे येऊन कोणी आव्हान देण्याचा प्रयत्न करत असेल तर शिवसैनिक ते कधीही सहन करणार नाही. त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल, असं राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितल आहे. मातोश्री बाहेर घोषणाबाजी करण्यात आली. त्यात त्यांनी सहभाग घेतला होता.

हेही वाचा : VIDEO : ...तर राणा दाम्पत्य मातोश्रीवर वाचणार हनुमान चालीसा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.