ETV Bharat / city

Rajya Sabha Election 2022 : 'सर्व गणितं ठरलेली, विजय आमचाच' होणार- संजय राऊत

महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी ( Rajya Sabha Election 2022 ) आज मतदान पार पडत आहे. यावर खासदार संजय राऊत ( MP Sanjay Raut ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'आमची सर्व गणितं ठरलेली आहेत. विजय आमचाच होईल.' ( Victory will be ours ) असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ते मुंबईत आपल्या निवासस्थानी माध्यमांशी बोलत होते.

Sanjay Raut
संजय राऊत
author img

By

Published : Jun 10, 2022, 11:24 AM IST

मुंबई : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी आज मतदान पार पडत आहे. यात भाजपने सातव्या जागेचा अर्ज भरल्याने या निवडणुकीचे सस्पेन्स वाढला आहे. सर्वच पक्षांनी आपले आमदार फुटू नयेत म्हणून जोरदार प्रयत्न केले आहेत. त्यामुळे या निवडणुकीची सर्व मदार अपक्ष आमदारांवर आहे. अपक्ष आमदारांच मत कोणाला मिळणार हे आता थोड्याच वेळात स्पष्ट होईल. या सर्व मतदानावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली असून 'आमची सर्व गणित ठरलेली आहेत. विजय आमचाच होईल.'( Victory will be ours ) असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ते मुंबईत आपल्या निवासस्थानी माध्यमांशी बोलत होते.

सर्व ठरल्याप्रमाणे होईल - राऊत म्हणाले की, "महाविकास आघाडीचे चारही उमेदवार हे पहिल्याच फेरीत निवडून (Mahavikas Aghadi were elected ) येतील. दोन शिवसेनेचे, एक राष्ट्रवादी काँग्रेस आणि एक काँग्रेसचा उमेदवार असे हे चार उमेदवार असतील. भाजपचे देखील दोन उमेदवार अगदी सहज निवडून येतील. त्यामुळे मागचे काही दिवस जे काही काटे की टक्कर, चुरस असे चित्र निर्माण केले जाते, तसं काही होणार नाही. महाराष्ट्रात हा भ्रम पसरवला जातोय. आम्हाला 169 आमदारांचा पाठिंबा आहे असल्याचे त्यांनी सांगितले.

ही एक अफवा - शरद पवारांनी जास्तीच्या कोटा मागितल्याच्या वृत्तावर राऊत म्हणाले की, "या सर्व अफवा आहेत. आमची सर्वांची बैठक झाली होती. या बैठकीत सर्वांचा कोटा ठरवून देण्यात आला आहे. त्यामुळे ज्याचा जितका कोटा या बैठकीत ठरलेला आहे, त्यांना तितकी मते मिळतील. ही अफवा भाजप कडून पसरवली जात आहे, हे एक गणित आहे. या ठरलेल्या गणिता प्रमाणेच मतं मिळतील. यासंदर्भात माझं आज सकाळीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ( CM Uddhav Thackeray) शरद पवारांशी सविस्तर बोलणे झाले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत." अस त्यांनी स्पष्ट केले.

MIM चा काँग्रेसला पाठिंबा - "MIM ने काँग्रेसला पाठिंबा ( MIM supports Congress ) दिला आहे. ही बातमी मी आत्ताच वाचली. या दोन पक्षांमध्ये जो काही संवाद झाला असेल त्यानुसार त्यांनी काँग्रेसला पाठिंबा देण्याचं ठरवलं असेल. ही चांगली बातमी आहे. तरीदेखील त्यांनी कोणाला पांठिबा द्यावा हा त्यांचा वयक्तिक प्रश्न आहे. शिवसेना, एमआयएममध्ये मतभेद ( Differences in ShivSena MIM ) आहेत, ते यापुढेही कायम राहतील. पण, काँग्रेसचे MIM चे काही जुळत असेल तर त्यावर आम्ही आक्षेप घेण्याचं काही कारण नाही." अस देखील राऊत यांनी म्हटलं.

देशमुख, मालिकांना मतदानाचा अधिकार- "नवाब मलिक तसेच अनिल देशमुखांना मतदान प्रक्रियेत ( Deshmukh, right to vote for the series ) सहभागी होण्याचा पूर्ण अधिकार आहे. हा त्यांना घटनेने दिलेला अधिकार आहे. केंद्रीय तपास यंत्रणा त्यांना हा अधिकार मिळू देत नाहीत. त्यामुळे या घटनेचे मालक कोण आहेत का? की, भाजप राज्यघटनेचे मालक आहे का? असा प्रश्न त्यांनी यावेळी विचारला. आम्हाला आशा आहे की, न्यायदेवता आम्हाला नक्की न्याय देईल." अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी नवाब मलिक व अनिल देशमुख यांच्या मतदान प्रक्रियेवर दिली आहे.

हेही वाचा - Rajya Sabha Election : राज्यसभा निवडणूक मतदानाला सुरुवात.. बाळासाहेब थोरात म्हणाले, 'विजय आमचाच'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.