ETV Bharat / city

Marathi Signboard : सर्व दुकाने व आस्थापनांना मराठी पाट्या बंधनकारक; अधिनियम लागू - दुकानांवर मराठी पाट्या बंधनकारक

राज्यातील सर्व दुकाने व अस्थापनांना मराठी फलक (Display signboard in Marathi) म्हणजे मराठीत पाट्या बंधनकारक केल्या आहेत. राज्यपालांच्या संमतीनंतर या संदर्भातील परिपत्रक लागू करण्यात आले आहे. राज्यातील सर्व दुकाने आणि आस्थापने यांचे फलक हे मराठीत (Shopes signboard in Marathi) असावेत असा निर्णय राज्य सरकारने घेतला होता.

mantralaya
मंत्रालय फाईल फोटो
author img

By

Published : Mar 30, 2022, 5:39 PM IST

मुंबई - राज्यातील सर्व दुकाने व अस्थापनांना मराठी फलक (Display signboard in Marathi) म्हणजे मराठीत पाट्या बंधनकारक केल्या आहेत. राज्यपालांच्या संमतीनंतर या संदर्भातील परिपत्रक लागू करण्यात आले आहे. राज्यातील सर्व दुकाने आणि आस्थापने यांचे फलक हे मराठीत (Shopes signboard in Marathi) असावेत असा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. दहा कामगार यापेक्षा कमी अस्थापनांना मराठी पाट्या लावणे बंधनकारक आहे.

मराठी भाषेतील पाटी ही इतर भाषेच्या तुलनेत लहान असू नये. मद्य विक्री करणारी दुकाने आणि आस्थापनांच्या मराठी पाट्यांवर महान व्यक्तींची, गड - किल्ल्यांची नावे लिहू नयेत, अशी तरतूद अधिनियमात केली होती. या संदर्भातील अधिनियम राज्य सरकारने राज्यपालांकडे पाठवले होते. १६ मार्च २०२२ रोजी राज्यपालांनी संमती दर्शविली. यामुळे १७ मार्च २०२२ पासून महाराष्ट्रातील दुकाने आणि आस्थापनांवर मराठी पाट्या लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र, मराठी पाट्या न लावल्यास कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.

मराठी पाट्यांबाबतचा निर्णय काय? - कामगार संख्या 10 पेक्षा कमी असलेल्या आस्थापना, तसेच 10 पेक्षा अधिक असलेल्या आस्थापना, अशा सर्व आस्थापना, देवनागरी लिपीत मराठी भाषेमध्ये नामफलक प्रदर्शित करतील. मालक आस्थापनेचा नामफलक हा मराठी देवनागरी लिपी बरोबरच इतर भाषेतही लिहू शकतो. मात्र, मराठी भाषेतील नामफलक प्रारंभी लिहिणे आवश्यक आहे आणि मराठी भाषेतील नामफलकावरील अक्षरांचा आकार इतर भाषेतील अक्षरांच्या आकारापेक्षा लहान असू नये. ज्या आस्थापनेत कोणत्याही प्रकारे मद्य विक्री किंवा मद्यपान सेवा दिली जात असेल अशा आस्थापनेस महापुरुष/महनीय महिला यांची किंवा गड किल्ल्यांची नावे देण्यात येऊ नयेत असाही निर्णय घेण्यात आला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.