ETV Bharat / city

Highly educated connected with PFI: पीएफआय प्रकरणात महाराष्ट्रातून अटक केलेल्यांपैकी अनेकजण उच्चशिक्षित.. - पीएफआयशी संबंधित अनेकजण उच्चशिक्षित

महाराष्ट्र एटीएसच्या पथकाने (maharashtra ATS) राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये छापेमारी केली होती. मुंबई, नाशिक, औरंगाबाद आणि नांदेड या चार ठिकाणी देशविरोधी कृत्य केल्याप्रकरणी चार गुन्हे दाखल करून २० पदाधिकारी आणि 'पीएफआय'शी संबधितांची धरपकड केली होती.

Many of those arrested from Maharashtra in connection with PFI are highly educated
पीएफआयसोबत संबंध असल्याप्रकरणी महाराष्ट्रातून अटक केलेल्यांपैकी बरेचजण उच्चशिक्षित !
author img

By

Published : Sep 24, 2022, 11:07 PM IST

मुंबई: महाराष्ट्र एटीएसच्या पथकाने राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये छापेमारी केली. मुंबई, नाशिक, औरंगाबाद आणि नांदेड या चार ठिकाणी देशविरोधी कृत्य केल्याप्रकरणी चार गुन्हे दाखल करून २० पदाधिकारी आणि 'पीएफआय'शी संबधितांची धरपकड केली. मुंबई तसेच आसपासच्या परिसरातून शेख सादिक, मोहम्मद इकबाल खान, मझहर खान, मोमीन मिस्त्री, आसिफ खान या पाच जणांना अटक करण्यात आली. या पाच जणांना एटीएसने गुरुवारी संध्याकाळी सत्र न्यायालयात हजर केले. त्यांना १४ दिवसांची पोलिस कोठडी द्यावी, अशी विनंती एटीएसच्या अधिकाऱ्यांनी केली. मात्र, न्यायाधीशांनी सुनावणीअंती त्यांना पाच दिवसांची कोठडी सुनावली. यापैकी काही आरोपी उच्च शिक्षित असल्याचे निष्पन्न झाले आहे. मझहर हा हा कुर्ल्यात राहणारा असून सेल्समनची नोकरी करत होता.

देश विघातक कृत्य केल्याप्रकरणी नाशिक येथे PFI या संघटनेच्या काही सदस्यांवर गुन्हा दाखल आहे. त्याच अनुषंगाने पहाटे पुण्यातील कोंढवा येथे दहशतवाद विरोधी पथकाने कारवाई करत PFI संघटनेच्या पूर्वाश्रमीच्या दोन सदस्यांना अटक केली. कयूम शेख आणि रजी अहमद खान अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. कयूम शेख हा आयटीमध्ये काम करत आहे तर रजी अहमद हे बिल्डर आहे. नेरूळच्या पीएफआयची जबाबदारी सांभाळणाऱ्या आसिफ शेख यांना पहाटे ४ च्या सुमारास घरातून ताब्यात घेऊन कार्यालयात आणण्यात आले होते. त्याठिकाणी पहाटे ५ ते दुपारी १ पर्यंत कागदपत्रांची झाडाझडती सुरु होती. त्यानंतर मोठया प्रमाणात कागदपत्रे सोबत घेऊन एनआयएच्या पथकाने दुपारी दिड वाजता तिथून पाय काढला.

मोदींविरोधी भूमिकेने अडचण ? पीएफआयच्या नेरुळ येथील कार्यालयात सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे महागाई विरोधातल्या आंदोलनातले पोस्टर आढळून आले आहेत. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महागाई कमी करा अथवा, खुर्ची सोडा असे संदेश लिहिलेले आहेत. त्याशिवाय इतरही आंदोलन व सामाजिक उपक्रमाचे पोस्टर कार्यालयात आढळून आले आहेत.

दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास पथकाकडून मुंबईतील ट्रृॉम्बे चिता कॅम्प येथेही छापा टाकण्यात आला. यावेळी पीएफआयच्या कार्यालयातून अहमद अबिब्बुलाला नावाच्या व्यक्तीला एनआयएने ताब्यात घेतले आहे.अहमद हा मंगळूर येथून मुंबईत आला होता. तो तेथील पीएफआयच्या कार्यालयात राहत होता. याबाबत माहिती मिळाल्यानंतर एनआयएने पहाटे छापा टाकून संशय़ीत अहमदला ताब्यात घेतले, अशी माहिती सूत्रांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.