ETV Bharat / city

विशेष : मॅनहोलमुळे मुंबईतील रहदारीला कोणतेच अडथळे नाहीत; पालिकेचा दावा - बीएमसी न्यूज

मुंबईत सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएमआरडीए, रेल्वे, मुंबई पोर्ट ट्रस्ट, मुंबई महापालिका आदी सरकारी यंत्रणांच्या अखत्यारित रस्ते येतात. या रस्त्यांची डागडुजी, त्याचे बांधकाम त्या विभागाकडून केले जाते.

manhole
मॅनहोल
author img

By

Published : Dec 19, 2020, 6:43 PM IST

मुंबई - मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत दोन हजार किलोमीटरचे रस्ते आहेत. या रस्त्यांवर दोन लाखांहून अधिक मॅनहोल आहेत. रस्त्यांच्या उंचीप्रमाणे हे मॅनहोल असल्याने रस्ते वाहतुकीला कोणत्याही प्रकारचे अडथळे येत नाहीत. मॅनहोल उंच किंवा खाली असल्याने कोणत्याही दुर्घटना घडल्या नसल्याची माहिती पालिकेच्या रस्ते विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

'मॅनहोलमुळे मुंबईतील रहदारीला कोणतेच अडथळे नाहीत'

रस्त्याच्या उंचीचे मॅनहोल -

मुंबईत सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएमआरडीए, रेल्वे, मुंबई पोर्ट ट्रस्ट, मुंबई महापालिका आदी सरकारी यंत्रणांच्या अखत्यारित रस्ते येतात. या रस्त्यांची डागडुजी, त्याचे बांधकाम त्या विभागाकडून केले जाते. त्यापैकी बृहन्‍मुंबई महापालिकेच्‍या अखत्‍यारित २,०५५ किलोमीटर लांबीचे रस्‍ते आहेत. या रस्त्यांवर पावसाचे पाणी गटारे, नाल्यामधून समुद्रात आणि खाडीत सोडता यावेत म्हणून मॅनहोल बसवण्यात आले आहेत. मुंबई महापालिकेच्या हद्दीतील रस्त्यांवर तब्बल दोन लाखांहून अधिक मॅनहोल आहेत. शहरातील रस्ते वाहतुकीला कोणताही अडथळा येऊ नये म्हणून या मॅनहोलची उंची रस्त्याच्या उंची इतकीच ठेवण्यात आली आहे. मॅनहोलची उंची कमी किंवा जास्त असल्याची तक्रार आल्यावर त्याची दखल घेऊन पालिकेच्या पर्जन्य जल वाहिन्या व मलनिस्सारण विभागाकडून त्वरित दुरुस्ती केली जाते. यामुळे रस्त्यावरील मॅनहोल उंच किंवा खोल असल्यामुळे रस्ते वाहतूक खोळंबली अशी तक्रार कधीही आलेली नाही असे या अधिकाऱ्याने सांगितले.

पालिकेच्या दाव्यात तथ्य -

मुंबई महापालिकेच्या रस्ते विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीची शहानिशा करण्यासाठी मुंबईमधील रस्त्यांचा आढावा घेतला असता अधिकाऱ्यांनी केलेला दावा योग्य असल्याचे दिसून येते. मुंबईमधील मुख्य रस्ते तसेच अंतर्गत रस्त्यांवर मॅनहोल रस्त्याच्या उंचीपेक्षा जास्त किंवा खाली असल्याचे दिसून आलेले नाही. मुंबईमधील रस्ते वाहतुकही सुरळीत सुरू असल्याचे दिसून आले.

पावसाळ्यासाठी मॅनहोलच्या आत जाळ्या -

मुंबईमधील रस्त्यांवर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात खड्ड्यांच्या तक्रारी येतात. यंदा या तक्रारी कमी झाल्या आहेत. मुंबईत पावसाळ्यात पाणी साचते अशी २५० ठिकाणी आहेत. या रस्त्यांवर दोन वर्षांपूर्वी शहरांत १७४३ मॅनहोलना जाळ्या बसवण्यात आल्या. मागीलवर्षी शहरात १३०८ व उपनगरांत १ हजार २३ मॅनहोलना जाळ्या बसवण्यात आल्या आहेत. या जाळ्या मॅनहोलच्या आत बसवण्यात आल्या आहेत. रस्त्यावर पाणी साचल्यावर मॅनहोलच्या जाळ्या उघडण्यात येतात. मॅनहोल उघडे असल्यास एखादा नागरिक त्यात पडल्यास जाळ्या असल्याने मॅनहोलमधून वाहून जाणार नाही याची खबरदारी घेण्यात आली आहे. पावसाच्या पाण्याच्या निचरा झाल्यावर या मॅनहोलची झाकणे पुन्हा लावली जातात. यामुळे रस्ते वाहतुकीला आणि नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत नाही, अशी माहिती पालिकेच्या पर्जन्य जल वाहिनी व मलनिस्सारण विभागाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

पावसाळ्यातील दुर्घटना -

२०१७ मध्ये मुसळधार पावसात पोटविकार तज्ज्ञ डॉ. अमरापूरकर यांचा उघड्या मॅनहोलने बळी घेतला. शहरात सर्वत्र पाणी साचल्याने रस्त्यावरून चालत घरी जात असताना डॉ. अमरापूरकर मॅनहोलमध्ये पडले होते. पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेल्याने दोन दिवसांनी त्यांचा मृतदेह समुद्र किनारी मिळाला होता. त्याच वर्षी मुलुंड येथील एक महिला मॉर्निंग वॉक करताना उघड्या मॅनहोलमध्ये पडून जखमी झाली होती.

हेही वाचा - ग्रामपंचायतींवर भगवा फडकवण्यासाठी सज्ज राहा, उद्धव ठाकरेचे शिवसेनेच्या संपर्कप्रमुखांना आदेश

हेही वाचा - 'गोवा मुक्तीच्या संदर्भात सत्ताधारी पक्षाने पं. जवाहरलाल नेहरूंविषयी अपप्रचार करू नये'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.