ETV Bharat / city

Rich minister in Shinde cabinet : शिंदे भाजप मंत्रिमंडळात मंगल प्रभात लोढा सर्वात श्रीमंत तर 'हा' सर्वात गरीब मंत्री, इतर मंत्र्यांबाबत जाणून घ्या.. - श्रीमंत मंत्री मंगल प्रभात लोढा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Rich minister in eknath shinde cabinet ) यांच्या मंत्रिमंडळातील १८ मंत्र्यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक पार्श्वभूमीवर नजर टाकल्यास अनेक अर्थाने ( eknath shinde cabinet expansion ) थक्क करणारी माहिती समोर येत आहे. १८ मंत्र्यांपैकी जवळपास १२ मंत्र्यांवर ( Mangal prabhat lodha is rich minister ) राजकीय, तसेच गुन्हेगारी स्वरुपातील गुन्हे दाखल आहेत.

Rich minister in shinde cabinet
एकनाथ शिंदे मंत्रिमंडळ श्रीमंत मंत्री
author img

By

Published : Aug 10, 2022, 1:35 PM IST

मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Rich minister in eknath shinde cabinet ) यांच्या मंत्रिमंडळातील १८ मंत्र्यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक पार्श्वभूमीवर नजर टाकल्यास अनेक अर्थाने थक्क करणारी माहिती समोर येत आहे. १८ मंत्र्यांपैकी जवळपास १२ मंत्र्यांवर राजकीय, तसेच गुन्हेगारी स्वरुपातील गुन्हे ( eknath shinde cabinet expansion ) दाखल आहेत. मंत्रिमंडळाचे सर्वच मंत्री त्यांच्या प्रतिज्ञापत्रातील माहितीनुसार, कोट्यधीश असून यामध्ये ( Mangal prabhat lodha is rich minister ) सर्वाधिक ४४१ कोटी रुपयांची संपत्ती ही भाजपच्या मंगल प्रभात लोढा यांच्याकडे आहे. तर, सर्वात कमी २ कोटी रुपयांची संपत्ती ही शिंदे गटाचे मंत्री संदिपान भुमरे ( Sandipan Bhumre less rich minister ) यांच्याकडे आहे. मंत्रिमंडळातील एक मंत्री दहावी पास तर एका मंत्र्याने डॉक्टोरेट मिळवली आहे.

हेही वाचा - Saint Narhari sonar Jayanti : विठ्ठलाने घेतली होती श्री संत नरहरी सोनार यांच्या भक्तीची परीक्षा; जाणून घ्या

मंगल प्रभात लोढा सर्वात श्रीमंत मंत्री - व्यवसायाने बांधकाम व्यवसायिक असलेले मलबार हिलचे भाजपचे आमदार मंगल प्रभात लोढा यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे ४४१ कोटी रुपयांची संपत्ती आहे. सहा वेळा आमदारकी भूषविणाऱ्या लोढा यांच्याकडे २५२ कोटी रुपयांची चल, तर १८९ कोटी रुपयांची अचल संपत्ती आहे. या शिवाय दक्षिण मुंबईत लोढा यांच्याकडे पाच फ्लॅट आहेत. लोढा यांच्या विरोधात पाच गुन्हे सुद्धा दाखल आहेत. तर, लोढा यांच्या खालोखाल उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा मतदारसंघातून विजयी झालेले एकनाथ शिंदे गटाचे तानाजी सावंत यांच्याकडे ११५ कोटींची संपत्ती आहे. तिसऱ्या क्रमांकावर शिंदे गटाचे प्रवक्ते सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांच्याकडे ८२ कोटी रुपयांची संपत्ती आहे.

संदिपान भुमरे गरीब मंत्री - गेल्या ३५ वर्षांपासून शिवसेनेत कार्यरत असलेले शिंदे गटाचे पैठणमधील आमदार संदिपान भुमरे यांच्याकडे फक्त २ कोटी रुपयांची संपत्ती असून, आताच्या मंत्रिमंडळात ते सर्वात गरीब मंत्री आहेत. या शिवाय भाजपचे विजय गावित यांच्याकडे २७ कोटी, भाजपचे संकट मोचक समजले जाणारे गिरीश महाजन यांच्याकडे २५ कोटी, राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे २४ कोटी, अतुल सावे यांच्याकडे २२ कोटी, सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे ११ कोटी तर शिंदे गटाचे अब्दुल सत्तार यांच्याकडे २० कोटी, शिंदे गटाचे शंभूराजे देसाई यांच्याकडे १४ कोटी, शिंदे गटाचे दादा भुसे यांच्याकडे १० कोटी रुपयांची संपत्ती असल्याची प्रतिज्ञा पत्रामध्ये नोंद आहे.

मंत्रिमंडळात दहावी उत्तीर्ण ते डॉक्टरेट मंत्री? -शिंदे - फडणवीस सरकारच्या नव्या मंत्रिमंडळातील एक मंत्री दहावी पास आहे. तर, पाच मंत्री बारावी पास आहेत. या शिवाय एक मंत्री इंजिनियर,, सात मंत्री पदवीधर, तर दोन मंत्र्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आहे. एका मंत्र्याने डॉक्टरेट मिळवलेली असून, भाजपचे मिरजचे आमदार सुरेश खाडे हे सर्वाधिक उच्चविद्याभूषित आहेत.

हेही वाचा - Eknath shinde cabinet minister portfolios - मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे नगर विकास, सामान्य प्रशासन तर फडणवीसांना गृह व वित्त खातं?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.