ETV Bharat / city

Nepali Thieves Gang Arrested : मालकाचा विश्वास जिंकायचे अन् संधी मिळताच चोरी करायचे; नेपाळी टोळी अटकेत - मुंबई मालवणी पोलिस

देशात नोकरीच्या बहाण्याने विविध शहरात जात मालकाचा विश्वास संपादन करून मालकाकडे चोरी करणाऱ्या नेपाळी टोळीला पोलिसांनी अटक केली ( Nepali Thieves Gang Arrested ) आहे. मुंबईच्या मालवणी पोलिसांनी ( Malwani Police Station Mumbai ) ही कारवाई केली.

नेपाळी टोळी अटकेत
नेपाळी टोळी अटकेत
author img

By

Published : Jan 16, 2022, 3:00 AM IST

मुंबई : नोकरीच्या बहाण्याने मुंबईसह देशाच्या इतर राज्यात जाऊन एक ते दोन वर्षे प्रामाणिकपणे काम करून बॉसचे मन जिंकत चोरी करणाऱ्या नेपाळी टोळीतील तीन चोरट्यांना मुंबईच्या मालवणी पोलिसांनी ( Malwani Police Station Mumbai ) अटक केली ( Nepali Thieves Gang Arrested ) आहे. संधी मिळताच तो आपल्या बाकीच्या साथीदारांसह चोरी करायचा आणि इतर राज्यात पळून जायचा, एवढेच नाही तर किरकोळ चोरी झाली तर आणखी दोन चोरी करायचे आणि नंतर नेपाळला जायचे. मोठी चोरी झाली तर हे चोरटे थेट नेपाळला पळत असे.

मालकाचा विश्वास जिंकायचे अन् संधी मिळताच चोरी करायचे; नेपाळी टोळी अटकेत

पेट्रोलपंपावर केली चोरी

मालवणीचे पीएसआय हसन मुलाणी यांनी सांगितले की, मालाडच्या मढ भागात मच्छिमारांकडे गेल्या दोन वर्षांपासून काम करणाऱ्या सुमन जनक शाही नावाच्या नेपाळी व्यक्तीने आपल्या तीन साथीदारांसह मढ येथील एका पेट्रोलपंपाच्या कार्यालयाचे कुलूप तोडले. ३० डिसेंबरच्या रात्री चोरी केली. मालवणी पोलिसांत तक्रार नोंदवून घेतल्यानंतर सीसीटीव्हीच्या मदतीने तपास केला असता याच बोटीवर काम करणाऱ्या एका नेपाळीने आपल्या साथीदारांसह चोरी केल्याचे आणि चोरी केल्यानंतर वेगवेगळ्या राज्यात पळून गेल्याचे निष्पन्न झाले.

विविध राज्यातून केली अटक

मालवणी पोलिसांनी तीनही नेपाळी आरोपींना देशातील विविध राज्यातून तांत्रिक मदतीने अटक केली आहे. अटक केलेल्या पहिल्या आरोपीचे नाव प्रवीण बसंत शाही असून तो ३३ वर्षे वयाचा आहे. पोलिसांनी त्याला बंगळुरू येथून अटक केली आहे. भारत रनबहादूर शाही असे दुसऱ्या आरोपीचे नाव असून, तो २२ वर्षांचा आहे. त्याला पोलिसांनी राजकोट येथून अटक केली. तर तिसर्‍या आरोपीचे नाव सुमन जनक शाही आहे. त्याचे वय ३६ वर्षे आहे. त्याला मालाडच्या मध परिसरातून अटक करण्यात आली आहे. हे सर्व आरोपी नेपाळमधील कालीकोट जिल्ह्यातील रहिवासी आहेत.

चोरी करण्यापूर्वी केली रेकी

पेट्रोल पंप कार्यालयात चोरी करण्यापूर्वी आरोपींनी रेकी केली. नंतर कुलूप तोडून ९२ हजार ६०० रुपये चोरून पळ काढला. सुदैवाने पेट्रोल पंपाचे उर्वरित पैसे आधीच बँकेत जमा होते. पोलिसांनी आरोपींना अटक करून चौकशी केली असता, या टोळीतील ११ जणांनी मिळून काही महिन्यांपूर्वी भिलवाडा येथे दोन ठिकाणी २६ लाखांची चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी सांगितले की, हे लोक कधीही फोन कॉलद्वारे चोरीची योजना आखत नाहीत. ही टोळी फेसबुक आणि मेसेंजर कॉलिंग करते. जेणेकरून पोलिसांना कॉल रेकॉर्ड मिळत नाहीत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.