ETV Bharat / city

Malegaon bomb blast : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील 20 वा साक्षीदार फितूर; ATS वर खळबळजनक आरोप - मालेगाव बॉम्बस्फोट 20 वा साक्षीदार फितूर

मालेगाव बॉम्बस्फोट (Malegaon bomb blast) प्रकरणातील 20 वा साक्षीदाराने (20th witness turns hostile) आज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए न्यायालयात (NIA Court) नवीन धक्कादायक खुलासा केला आहे. 29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगावमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. शुक्रवारच्या नमाजानंतर मशिदीत मोटारसायकलवर बॉम्बस्फोट झाला होता. यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला होता.

nia court
कोर्ट फाईल फोटो
author img

By

Published : Mar 30, 2022, 6:13 PM IST

मुंबई - मालेगाव बॉम्बस्फोट (Malegaon bomb blast) प्रकरणातील 20 वा साक्षीदाराने (20th witness turns hostile) आज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए न्यायालयात (NIA Court) नवीन धक्कादायक खुलासा केला आहे. साक्षीदाराने सांगितले की, एटीएसला कोणतेही लेखी साक्ष दिली नाही तसेच एटीएसने सादर केलेल्या माझी लेखी जवाब हे मी दिलेले नाही. मात्र, त्यावर माझी सही आहे असे न्यायालयाला सांगितल्यानंतर न्यायालयाने आज हा हा 20 वा साक्षीदार फितूर म्हणून घोषित केले आहे.

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील हा साक्षीदार आरोपी कर्नल पुरोहित यांच्या संबंधित होता. आतापर्यंत फितूर झालेले साक्षीदारांपैकी कर्नल पुरोहित यांच्या संबंधित असलेले साक्षीदार सर्वाधिक झाले असल्याची माहिती समीर कुलकर्णी यांनी दिली आहे.

अनेक साक्षीदारांनी बदलल्या साक्ष - देशात हिंदू दहशतवाद जन्माला आणणारा शब्द मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणापासून अस्तित्वात आला होता. आतापर्यंत 19 जणांनी या खटल्यात साक्ष बदलली आहे. 29 सप्टेंबर 2008 रोजी झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोटाप्रकरणी सध्या एनआयएच्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे. विशेष म्हणजे यापूर्वी झालेल्या सुनावणीतही एनआयएने हजर केलेल्या साक्षीदाराने साक्ष बदलली होती. त्याने दहशतवाद विरोधी पथकाचे तत्कालीन अधिकारी परमबीर सिंह आणि श्रीराव यांच्यावरही गंभीर आरोप केले होते.

काय आहे प्रकरण - 29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगावमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. शुक्रवारच्या नमाजानंतर मशिदीत मोटारसायकलवर बॉम्बस्फोट झाला होता. यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला होता, तर 100 हून अधिक लोक जखमी झाले होते. याप्रकरणी एटीएसने प्राथमिक चौकशी केली होती. तीन वर्षांनंतर 2011 मध्ये हे प्रकरण एनआयएकडे वर्ग करण्यात आले. एनआयएच्या विशेष न्यायालयात आता मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. भोपाळमधील भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर या या प्रकरणात आरोपी आहेत. या प्रकरणातील अन्य आरोपींमध्ये लेफ्टनंट कर्नल पुरोहित, मेजर (निवृत्त) रमेश उपाध्याय, सुधाकर द्विवेदी, अजय रहीरकर आणि समीर कुलकर्णी यांचा समावेश आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.