मुंबई - राज्य अनलॉकच्या दिशेने जात असताना अमली पदार्थांच्या बाजार मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. याविरोधात मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. मुंबईत सध्या उच्च प्रतीच्या अमली पदार्थांची मागणी घटली असून गांजा सारख्या सोप्या पद्धतीने मिळणाऱ्या अमली पदार्थाची मागणी वाढली असल्याचे समोर आले आहे.
मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने शहरात हेरॉईन, चरस, कोकेन, एमडी, एलसीडी डॉट पेपर आणि इतर प्रकरणांत मोठी कारवाई केली आहे. जानेवारी ते सप्टेंबर या काळात आर्थिक राजधानी मुंबईत एकूण 2 हजार 720 गुन्हे दाखल केले आहेत. यात 2 हजार 863 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तब्बल 374 किलो वजनाचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले असून त्याची आंतराष्ट्रीय बाजारातील किंमत तब्बल 15 कोटी 7 लाख 27 रुपये आहे.
जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत अमली पदार्थांविरोधात करण्यात आलेली कारवाई
१) हेरॉईन - तस्करीत १० गुन्हे दाखल असून यात १२ जणांना अटक करण्यात आली आहे. यात १२ कोटी ५३ लाख ७३ हजारांचे ६ किलो हेरॉईन जप्त करण्यात आले आहे.
२) चरस - तस्करीत ९ गुन्हे दाखल असून यात १३ जणांना अटक करण्यात आली आहे. यात ३३ लाख १२ हजारांचे ७ किलो चरस जप्त करण्यात आले आहे.
३) कोकेन - तस्करीत ५ गुन्हे दाखल असून यात ५ जणांना अटक करण्यात आली आहे. यात १० लाख १५ हजारांचे कोकेन जप्त करण्यात आले आहे.
४) गांजा - तस्करीत ११२ गुन्हे दाखल असून यात १२१ जणांना अटक करण्यात आली आहे. यात १ कोटी २९ लाख ७२ हजारांचे ३३६ किलो गांजा जप्त करण्यात आले आहे.
५) एमडी - तस्करीत ५५ गुन्हे दाखल असून यात ६४ जणांना अटक करण्यात आली आहे. यात ६५ लाख १४ हजारांचे २ किलो एमडी जप्त करण्यात आले आहे.
६) इतर प्रकरणे - अमली पदार्थाच्या इतर प्रकरणात अमली पदार्थ विरोधी पथकाने २५ गुन्हे दाखल केले असून यात २८ जणांना अटक करण्यात आलेली आहे. तर अमली पदार्थ सेवन करण्याच्या प्रकरणात आता पर्यंत 2 हजार 503 गुन्हे नोंदवण्यात आले असून या प्रकरणी 2 हजार 619 आरोपींना अटक करण्यात आली आहे.