ETV Bharat / city

राज्यसभा, विधानपरिषद निवडणूक बिनविरोधसाठी प्रयत्न, दुपारी तीन पर्यंत चित्र स्पष्ट होईल - भुजबळ

author img

By

Published : Jun 3, 2022, 10:53 AM IST

Updated : Jun 3, 2022, 12:26 PM IST

राज्यसभेची निवडणूक बिनविरोध व्हावी या संदर्भामध्ये महाविकास आघाडीचे नेते छगन भुजबळ अनिल देसाई व सुनील केदार हे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी त्यांच्या सागर या निवासस्थानी दाखल झाले आहेत. त्यांनी चर्चाही केली. दुपारी तीनपर्यंत वाट पाहणार असल्याचे भुजबळ यांनी भेटीनंतर स्पष्ट केले.

राज्यसभा, विधानपरिषद निवडणूक बिनविरोधसाठी मविआ नेते देवेंद्र फडणीस यांच्या दारात

मुंबई - राज्यसभेची निवडणूक बिनविरोध व्हावी या संदर्भामध्ये महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे नेते, मंत्री छगन भुजबळ, शिवसेना खासदार अनिल देसाई व काँग्रेस नेते मंत्री सुनील केदार हे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडवणीस यांना भेटण्यासाठी त्यांच्या शासकीय, 'सागर' या निवासस्थानी गेले होत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासोबत तब्बल दीड तास चर्चा झाली. परंतु या चर्चेतून अद्याप अंतिम तोडगा निघाला नसून, दुपारी ३ वाजेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे, असे छगन भुजबळ म्हणाले.

तिढा सुटण्याची चिन्हे कमी? - राज्यात राज्यसभेच्या सहाव्या जागेवर रस्सीखेच सुरू झाली आहे. भाजपने राज्यसभेची तिसरी जागा मागे घ्यावी व त्या बदल्यात महाविकासआघाडी त्यांना विधानपरिषदेची पाचवी जागा द्यायला तयार आहे, असा प्रस्ताव आज छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडवणीस यांना देण्यात आला. परंतु या प्रस्तावाला देवेंद्र फडवणीस यांनी होकार दिला नाही. उलटपक्षी मविआने त्यांचा चौथा उमेदवार मागे घ्यावा, त्याबदल्यात भाजप त्यांना विधानपरिषदेची पाचवी जागा द्यायला तयार आहे, असा प्रस्ताव भाजपकडून महाविकासआघाडीच्या नेत्यांना देण्यात आल्याने आता हा तिढा अजून वाढलेला दिसत आहे.

आशा व निराशा? या बैठकीनंतर बोलताना छगन भुजबळ म्हणाले की,राज्यसभेची सहावी जागा मागे घेण्यासाठी आमच्यात चर्चा झाली. कोणीतरी माघार घ्यावी त्या अनुषंगाने प्रयत्न सुरू आहेत. राज्यसभा बिनविरोध झाल्यास विधानपरिषदेची पाचवी जागा भाजपला सोडण्यास महाविकास आघाडी तयार आहे. परंतु दुपारी ३ वाजेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. असे सांगत आमच्या प्रयत्नांना यश मिळेल अशी आशा भुजबळ यांनी व्यक्त केली आहे. परंतु राज्यसभेची जागा तुम्ही सोडावी आणि विधानपरिषदेची जागा आम्ही सोडतो असा प्रस्ताव देवेंद्र फडणीस यांच्याकडूनसुद्धा दिला गेला असल्याचेही भुजबळ यांनी सांगितले आहे.

Last Updated : Jun 3, 2022, 12:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.