ETV Bharat / city

महाविकास आघाडीचे सरकार आपोआप पडेल - प्रवीण दरेकर

author img

By

Published : Nov 28, 2020, 2:09 PM IST

Updated : Nov 29, 2020, 12:14 PM IST

सरकारच्या वर्षपूर्तीच्या कारभारासंदर्भात त्यांना विचारले असता, दरेकर म्हणाले की, या सरकारने राज्यातील सर्वसामान्य जनता, शेतकरी आणि तरुणांच्या प्रश्नांची सोडवणूक केली नाही. कोकणात आलेल्या निसर्ग वादळापासून ते मराठवाड्यातील परतीच्या पावसाने झालेल्या अतोनात नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत दिली नाही. कोरोनावर आज आजूबाजूच्या राज्यांनी नियंत्रण मिळवलेले असताना यांचे नियोजनच बिघडले आहे. यासाठी सरकारची नियोजनशून्यता जबाबदार असल्याचा आरोपही दरेकर यांनी केला.

विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर न्यूज

मुंबई - राज्यात अनैतिकपणे तीन पक्ष मिळून एकत्र आलेले सरकार जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रत्येक आघाडीवर अपयशी ठरले आहे. वर्षभरात महाविकास आघाडीतील पक्ष एकमेकांवर कुरघोडी करत असून त्यातून निर्माण झालेल्या अविश्वासामुळे हे सरकार पडणार आहे. आम्ही या सरकारला पाडण्याची गरज नाही, असा दावा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर 'ईटीव्ही भारत'शी बोलताना केला.

सरकारच्या वर्षपूर्तीच्या कारभारासंदर्भात त्यांना विचारले असता, दरेकर म्हणाले की, या सरकारने राज्यातील सर्वसामान्य जनता, शेतकरी आणि तरुणांच्या कोणत्याही प्रश्नांची सोडवणूक केली नाही. कोकणात आलेल्या निसर्ग वादळापासून ते मराठवाड्यातील परतीच्या पावसाने झालेल्या अतोनात नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत दिली नाही. कोरोनावर आज आजूबाजूच्या राज्यांनी नियंत्रण मिळवलेले असताना यांचे नियोजनच बिघडले आहे. यामुळे राज्यात अजूनही कोरोना संपला नाही. यासाठी सरकारची नियोजनशून्यता जबाबदार असल्याचा आरोपही दरेकर यांनी केला.

महाविकास आघाडीचे सरकार आपोआप पडेल - प्रवीण दरेकर

हेही वाचा - पुण्यातून गावाकडे येत बीडच्या तरुणाने पोल्ट्री फार्म व्यवसायतून दिला आत्मनिर्भरतेचा संदेश

मराठा समाजाच्या प्रश्नांवर आमच्या सरकारने सर्व काही तयार करून दिले होते. परंतु, यांना न्यायालयात नीट बाजू मांडता आली नाही. यामुळे आज मराठा समाजातील लाखो विद्यार्थी वैद्यकीय प्रवेशाला मुकले आहेत. राज्याची आर्थिक घडी या सरकारमधील असलेल्या असमन्वयामुळे बिघडली आहे. हाथरसच्या घटनेवर बोटे मोडणाऱ्या या सरकारच्या काळात राज्यात अनेक ठिकाणी हाथरससारख्या घटना घडत असताना त्यांच्याकडे मात्र यांचे लक्ष नाही. आज राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघत असतानाही सरकार मात्र आपले यात आलेले अपयश झाकण्याचा प्रयत्न करत असल्याचेही दरेकर म्हणाले.

कोरोनामुळे अपयश समोर आले

शेतकऱ्यांना मदत देण्याचा विषय टाळण्यासाठी कायम केंद्र सरकारकडे यांनी बोट दाखवून ही मदत टाळण्याचा प्रयत्न केला. केंद्राने जीएसटीची रक्कम दिली तसेच जीएसटी कौन्सिलची माहितीही दिली. परंतु, यांनी त्याविषयी गैरसमज पसरवला. केंद्राकडून कोरोनाच्या काळात आलेल्या मदतीविषयी हे लोक बोलत नाहीत. व्हेंटीलेटरच्या अनेक मशीन येऊन पडल्या असताना यांच्याकडे ती वापरण्यासाठी लोक नव्हते. यातूनच यांचे अपयश समोर आले असल्याचेही दरेकर म्हणाले.

हेही वाचा - निराधार प्राण्यांची माय अंधारात; भरमसाट बिलाने लाईट लावण्याचीही आजींना भीती

Last Updated : Nov 29, 2020, 12:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.