ETV Bharat / city

CM Uddhav Thackery : महाविकास आघाडी सरकार स्थिर; उद्या कॅबिनेटची बैठक : उद्धव ठाकरे

शिवसेना नेते एकनाथ शिंदे ( Eknath Shinde )यांच्या बंडाळीमुळे राज्य सरकार गोत्यात ( The state government is in trouble )आले आहे. मात्र उलथापालथ ऐवजी आघाडी सरकार मजबूत असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न, महाविकास आघाडीकडून केला जातो आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी (CM Uddhav Thackeray ) उद्या कॅबिनेट बैठक बोलावली असून या बैठकीला कोण मंत्री उपस्थित राहणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Ministry
मंत्रालय
author img

By

Published : Jun 21, 2022, 11:01 PM IST

मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीमुळे राज्य सरकार गोत्यात आले आहे. मात्र उलथापालथ ऐवजी आघाडी सरकार मजबूत असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न, महाविकास आघाडीकडून केला जातो आहे. याच पार्श्वभूमीवर उद्या कॅबिनेट बैठक बोलावली असून या बैठकीला कोण मंत्री उपस्थित राहणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सरकार मजबूत? : विधान परिषदेच्या निवडणुकामुळे मागील आठवड्यात मंत्रिमंडळ बैठक झाली नव्हती. या आठवड्यात होईल अशी शक्यता असतानाच शिवसेनेचे आमदार मंत्री एकनाथ शिंदे यांनी डझनभर आमदारांसोबत नॉट रीचेबल झाले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आघाडी सरकारची यामुळे डोकेदुखी वाढली. शिंदे आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने सरकार डळमळीत असल्याची चर्चा रंगली असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उद्या दुपारी एक वाजता कॅबिनेटची बैठक बोलावली आहे. या बैठकीत कोण - कोण मंत्री उपस्थित राहणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. शिवाय आघाडी सरकार मजबूत असे आहे, हे दाखवण्याचा सरकारचा एक प्रयत्न असल्याचे बोलले जाते.

आघाडीच्या नेत्यांची जोर बैठका : विधान परिषदेच्या निवडणुका पार पडताच एकनाथ शिंदे डझनभर समर्थकांसह गुजरातमध्ये रवाना झाले. सकाळपासूनच राजकीय घडामोडींना यामुळे वेग आला आहे. एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून सुरू आहे. मात्र भाजपशी जुळवून घ्या आणि काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ सोडा, असा प्रस्ताव एकनाथ शिंदे आणि समर्थकांनी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर ठेवला आहे. मुख्यमंत्र्यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावत चर्चा करण्याचे आवाहन केले आहे. एकनाथ शिंदे मात्र आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी फुटवण्याच्या मार्गावर असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. आघाडी सरकार यामुळे सतर्क झाली असून जोर बैठकांवर भर दिला आहे.

हेही वाचा : Maharashtra Political Crisis : शिवसैनिक शिवसेना भवनासमोर संतप्त; एकनाथ शिंदेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.