मुंबई - राज्यातील विनाअनुदानित अंशत: अनुदानित शाळांना शासनाने घोषित केलेल्या 20 टक्के वाढीव अनुदानाची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे राज्यातील सुमारे 2 हजार 500 प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व अनुदानित शाळांच्या शिक्षक गेल्या सात दिवसांपासून आझाद मैदानावर अघोषित उपोषणाला बसलेले आहे. याठिकाणी मंगळवारी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी भेट दिली आहे. यावेळी आमदार रणजित पाटील व आमदार राम सातपुते उपस्थित होते.
मी सुद्धा आंदोलनात बसेन- दरेकर
शासनाने घोषित केलेल्या 20 टक्के वाढीव अनुदानाची अंमलबजावणी केली नाही, तर तुमचाबरोबर मी सुद्धा आंदोलनात बसेल असे आश्वासन राज्यातील शिक्षकांना प्रवीण दरेकर यांनी दिले आहे. तसेच मागच्या सरकारने राज्यातील विना अनुदानित, अंशतः अनुदानित शाळांना शासनाने 20 टक्के वाढीव अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आमच्या सरकार गेल्यानंतर शासनाने घोषित केलेल्या 20 टक्के वाढीव अनुदानाची अंमलबजावणी केली नाही. ही बाब अत्यंत दुर्देवी असून महाविकास आघाडी सरकार भेदभाव करत असल्याचा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला आहे.
शिक्षकांच्या प्रश्नांवर महाविकास आघाडी सरकार असंवेदनशील - प्रविण दरेकर - प्रवीण दरेकर
गेल्या सात दिवसांपासून राज्यातील शिक्षक आमरण उपोषणाला बसले आहेत. तर मराठा समाजाचेही विद्यार्थी आपल्या मागण्या घेऊन गेल्या 15 दिवसांपासून आझाद मैदानांवर आंदोलन करत आहे. त्यांच्या मागण्या मान्य करणे तर सोडा त्यांची साधी विचारपूस सुद्धा महाविकास आघाडी सरकारने केली नाही, असा आरोप दरेकर यांनी केला आहे.
![शिक्षकांच्या प्रश्नांवर महाविकास आघाडी सरकार असंवेदनशील - प्रविण दरेकर प्रविण दरेकर](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-10476889-804-10476889-1612279682305.jpg?imwidth=3840)
मुंबई - राज्यातील विनाअनुदानित अंशत: अनुदानित शाळांना शासनाने घोषित केलेल्या 20 टक्के वाढीव अनुदानाची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे राज्यातील सुमारे 2 हजार 500 प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व अनुदानित शाळांच्या शिक्षक गेल्या सात दिवसांपासून आझाद मैदानावर अघोषित उपोषणाला बसलेले आहे. याठिकाणी मंगळवारी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी भेट दिली आहे. यावेळी आमदार रणजित पाटील व आमदार राम सातपुते उपस्थित होते.
मी सुद्धा आंदोलनात बसेन- दरेकर
शासनाने घोषित केलेल्या 20 टक्के वाढीव अनुदानाची अंमलबजावणी केली नाही, तर तुमचाबरोबर मी सुद्धा आंदोलनात बसेल असे आश्वासन राज्यातील शिक्षकांना प्रवीण दरेकर यांनी दिले आहे. तसेच मागच्या सरकारने राज्यातील विना अनुदानित, अंशतः अनुदानित शाळांना शासनाने 20 टक्के वाढीव अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आमच्या सरकार गेल्यानंतर शासनाने घोषित केलेल्या 20 टक्के वाढीव अनुदानाची अंमलबजावणी केली नाही. ही बाब अत्यंत दुर्देवी असून महाविकास आघाडी सरकार भेदभाव करत असल्याचा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला आहे.
TAGGED:
प्रवीण दरेकर