ETV Bharat / city

भाजप सरकारमधील निर्णयांना आघाडीचा ब्रेक?

भाजप सरकारच्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत ज्या सिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती, त्याचा आढावा आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आल्याची माहिती मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.

eknath shinde
मंत्री एकनाथ शिंदे
author img

By

Published : Dec 4, 2019, 9:05 PM IST

Updated : Dec 4, 2019, 9:41 PM IST

मुंबई - भाजप सरकारच्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत ज्या सिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती, त्याचा आढावा आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आल्याची माहिती मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली. भाजप सरकारमधील शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत तत्कालीन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या जिल्ह्यातील ४ मोठ्या प्रकल्पांचा यात समावेश आहे.

मंत्री एकनाथ शिंदे

हेही वाचा - 'रोहिणीसह पंकजा यांना पाडण्यासाठी भाजपमधूनच प्रयत्न'

यात जळगाव जिल्ह्यातील वाघूर प्रकल्पास 2 हजार 288 कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता (सुप्रमा) दिली होती. हतनूर प्रकल्पास 536 कोटींची, वरणगाव तळवेल प्रकल्पास 861 कोटींची, तर शेळगाव येथील प्रकल्पास 968 कोटी सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. तर, ठाण्यातील भातसा प्रकल्पास 1 हजार 491 कोटी सुप्रमा देण्यात आली होती. याचा आढावा आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आल्याचे मंत्री शिंदे म्हणाले.

फडणवीस सरकारच्या शेवटच्या कॅबिनेटमधील 34 निर्णयांचा आढावा

  • शेतकरी कर्जमाफीबाबत चर्चा झाली, अवकाळी पावसामुळे जे नुकसान झालं त्याचा आढावा घेतला, मदत करायला निर्देश दिले. किती निधी लागणार, कशी तजवीज करणार हे पाहण्याचे निर्देश देण्यात आले.
  • गेल्या पाच वर्षात विविध आंदोलनादरम्यान दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या संदर्भात आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आढावा घेण्यात आला.
  • अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत आणि संपूर्ण कर्जमाफीबाबतही आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये चर्चा झाली.
  • राज्यातील कोणत्याही विकास प्रकल्पाला स्थगिती दिली नाही. सुरू असलेल्या प्रकल्पांचा या बैठकीत आढावा घेण्यात आला.
  • कांद्याचे दर सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्यात राहावेत यासाठी आवश्यक ते उपाययोजना केल्या जाईल. गरज असली तर साठेबाजी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई केली जाईल.

Intro:Body:mh_cbnt_eknath_shinde_mumbai_7204684

Eknath shinde byte by live 3G 7

भाजप सरकारमधील निर्णयांना आघाडीचा ब्रेक?

मुंबई: भाजपा सरकारच्या शेवटच्या मंत्रीमंडळ बैठकीत ज्या सिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती, त्याचा आढावाही आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला अशी माहिती मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

भाजप सरकार मधील शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत तत्कालीन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या जिल्ह्यातील ४ मोठ्या प्रकल्पांचा समावेश आहे
- यात जळगाव जिल्ह्यातील वाघुर प्रकल्पास 2288 कोटींची सुप्रमा दिली होती, हतनूर प्रकल्पास 536 कोटींची, वरणगाव तळवेल प्रकल्पास 861 कोटी़ची, तर शेळगाव येथील प्रकल्पास 968 कोटी सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती
- तर ठाण्यातील भातसा प्रकल्पास 1491 कोटी सुप्रमा देण्यात आली होती
- आज यांचा आढावा आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला असे मंत्री शिंदे म्हणाले.

फडणवीस सरकारच्या शेवटच्या कॅबिनेट मधील 34 निर्णयाचा आढावा घेतला
- शेतकरी कर्जमाफी बाबत चर्चा झाली, अवकाळी पाऊस मुळे जे नुकसान झालं त्याचा आढावा घेतला,मदत करायला निर्देश दिले. किती निधी लागणार, कशी तजवीज करणार हे पाहण्याचे निर्देश देण्यात आले.

गेल्या पाच वर्षात विविध आंदोलनादरम्यान दाखल झालेल्या गुन्ह्यांची संदर्भात आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आढावा घेण्यात आला;निष्पाप नागरिकांना अशा गुन्ह्यांमध्ये आम्ही भरडू देणार नाही; -एकनाथ शिंदे

अवकाळी मुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत आणि संपूर्ण कर्जमाफी बाबतही आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली :एकनाथ शिंदे यांची माहिती

राज्यातील कोणत्याही विकास प्रकल्पाला स्थगिती देणार नाही; सुरु असलेल्या प्रकल्पांचा आज मंत्रिमंडळ बैठकीत आढावा घेण्यात आला
- एकनाथ शिंदे

कांद्याचे दर सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्यात राहावेत यासाठी आवश्यक ते उपाय योजना केली जाईल गरज असली तर साठेबाजी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करू :एकनाथ शिंदे यांची माहितीConclusion:
Last Updated : Dec 4, 2019, 9:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.