ETV Bharat / city

Shivbhojan Thali : राज्य सरकारच्या 'शिवभोजन थाळी'चा गरिबांना आधार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची महत्वकांक्षी शिवभोजन थाळी योजना

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) आणि महाविकास आघाडी सरकारची ( Mahavikas Aghadi Government ) महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे 'शिवभोजन थाळी' ( Shivbhojan Thali ). या योजनेच्या माध्यमातून अनेक कष्टकरी मजूर आपले पोट भरत आहेत.

Shivbhojan Thali
Shivbhojan Thali
author img

By

Published : May 25, 2022, 10:03 PM IST

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) आणि महाविकास आघाडी सरकारची ( Mahavikas Aghadi Government ) महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे 'शिवभोजन थाळी' ( Shivbhojan Thali ). या योजनेच्या माध्यमातून राज्यातील सर्वसामान्य आणि कष्टकरी जनतेला केवळ दहा रुपयांत जेवण उपलब्ध व्हावा, यासाठी राज्य सरकारने ही योजना सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून अनेक कष्टकरी मजूर आपले पोट भरत आहेत.

अशी आहे शिवभोजन थाळी - एका व्यक्तीचे पोट भरेल एवढे अन्न एका थाळीद्वारे लाभार्थ्यांना देण्यात येते. केंद्र चालकाला दररोज ताजे अन्न बनवून द्यावे लागते. शिवभोजन थाळीत 30 ग्रॅम वजनाच्या दोन चपात्या. शंभर ग्रॅम वजन भाजीची एक वाटी, शंभर ग्रॅम वजन वरणाची एक वाटी, 150 ग्रॅम भात असतो. ही थाळी गरिबांपर्यंत दहा रुपयांत केंद्र चालकाला पोहोचवावी लागते. या प्रत्येक थाळीवर केंद्र चालकाला 40 रुपयांचे अनुदान राज्य सरकारकडून दिले जाते.

शिवभोजन थाळीबाबात नागरिकांच्या प्रतिक्रिया

9 कोटी 77 हजार लोकांनी घेतला आस्वाद - राज्यभरात आता एकूण 1528 शिवभोजन थाळी केंद्र सुरू आहेत. 2020 साली जानेवारी महिन्यात राज्य सरकारने ही योजना सुरु केली होती. आतापर्यंत 9 कोटी 77 हजारांंच्या वर शिवभोजन थाळीचा आस्वाद लोकांकडून घेण्यात आला आहे. तर आतापर्यंत राज्य सरकारने यासाठी 349 कोटी रुपये खर्च केले आहेत. शिवभोजन थाळी सर्वसामान्यांना सहज उपलब्ध व्हावी, यासाठी बसस्थानके सार्वजनिक रुग्णालय, जिल्हाधिकारी कार्यालय, बाजारपेठा अशा वर्दळीच्या ठिकाणी केंद्र देण्यात आले आहे. दहा ते बारा लोकांना सहज बसून अन्न खाता यावे, अशी व्यवस्था या केंद्रामध्ये असते. तसेच, केंद्रात स्वच्छतेची देखील काळजी ठेवावी लागते.

मुंबईतून शिवभोजन थाळीचा आढावा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची महत्त्वकांक्षी असलेली योजना शिवभोजन थाळी आहे. या योजनेमुळे कोरोनाच्या काळात सामान्य नागरिक, कष्टकरी यांना चांगलाच फायदा झाला. मुंबईत धारावी परिसरात असलेला दौलत फाउंडेशन कडून शिवभोजन थाळी योजना सुरू करण्यात आली आहे. कोरोनाच्या काळात या फाउंडेशनच्या माध्यमातून क्षमतेपेक्षा जास्त शाळा सामान्य नागरिकांपर्यंत पोचवण्याचा आल्या. तसेच, आताही जेवणाचा दर्जा उत्तम ठेवून सामान्य नागरिकांपर्यंत शिवभोजन थाळी पोहोचवण्याचे काम या केंद्रातून सुरू आहे. या केंद्रातून रोज शंभर जणांना शिवभोजन थाळी अवघ्या दहा रुपयांत दिली जाते. तसेच कुर्ला परिसरात असणारे 'युवा भरारी महिला बचत गट' प्रेम नगर कॉलनी येथे देखील या योजनेच्या माध्यमातून मधुराणी कष्टकऱ्यांना माफक दरामध्ये दर्जेदार जेवण दिले जाते.

योजना योग्यरीत्या राबवण्याची मागणी - मात्र मुंबई काही ठिकाणी शिव भोजन थाळीचे केंद्र बंद पडली असल्याचेही लक्षात आले आहे. तर काही हॉटेल मालकांकडून शिव भोजन थाळी बंद करण्यात आली आहे. मुंबईतील लोअर परेल भागामध्ये असलेल्या 'शुभ हॉटेल'मध्ये देखील ही योजना सुरू होती. मात्र, आता ही योजना या हॉटेलमधून बंद करण्यात आली आहे. अशाच प्रकारे मुंबईतील अनेक ठिकाणी ही योजना बंद झाली आहे. या योजनेमुळे कष्टकरी अवघ्या दहा रुपयांत मुंबईसारख्या ठिकाणी जेवन करत होते. ही योजना मुंबईत योग्यरीत्या राबवावी, अशी मागणी लोकांकडून केली जात आहे.

हेही वाचा - Yasin Malik : दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी यासिन मलिकला जन्मठेप; वाचा, काय आहे प्रकरण?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.