ETV Bharat / city

आता लोकसभेत घुमणार या आमदारांचा आवाज...! - patil

लोकसभा निवडणुकीत भाजपला २३, शिवसेनेला- १८ राष्ट्रवादीला -५, काँग्रेसला -१ आणि वंचित बहुजन आघाडीला -१ जागा मिळाली आहे. राज्यातील ४८ खासदारांचा संसदेत आवाज घुमणार आहे. त्यापैकी विधानभवनात जनतेचे प्रश्न मांडणारे एकूण ७ आमदार आता संसदभवनामध्ये राज्याच्या प्रश्नांवर आवाज उठवणार आहेत.

या आमदारांचा आवाज आता लोकसभेत घुमणार..!
author img

By

Published : May 24, 2019, 6:04 PM IST

मुंबई - लोकसभा निवडणुकीचे निकाल गुरुवारी जाहीर झाले. यावेळी राज्यात सेना-भाजपला घवघवीत यश मिळाले. मात्र, आघाडीला अपेक्षित, असे यश मिळाले नाही. या लोकसभा निवडणुकीत युती आणि आघाडीकडून काही विद्यमान आमदारांना लोकसभेचे तिकीट देण्यात आले होते. त्यापैकी कोणकोणते आमदार दिल्लीत जाणार आहेत.. त्याबाबतचा घेतलेला हा संक्षिप्त आढावा...

लोकसभा निवडणुकीत भाजपला २३, शिवसेनेला- १८ राष्ट्रवादीला -५, काँग्रेसला -१ आणि वंचित बहुजन आघाडीला -१ जागा मिळाली आहे. राज्यातील ४८ खासदारांचा संसदेत आवाज घुमणार आहे. त्यापैकी विधानभवनात जनतेचे प्रश्न मांडणारे एकूण ७ आमदार आता संसदभवनामध्ये राज्याच्या प्रश्नांवर आवाज उठवणार आहेत.

  • औरंगाबाद मध्य - इम्तियाज जलील (एमआयएम )
  • लोहा - प्रताप पाटील चिखलीकर (शिवसेना)
  • चाळीसगाव- उन्मेश पाटील (भाजप)
  • वरोरा - बाळू धानोरकर (शिवसेना)
  • रायगड - सुनिल तटकरे (राष्ट्रवादी - विधानपरिषद)
  • पुणे कसबा - गिरीष बापट (भाजप)
  • हिंगोली - नांदेड दक्षिण - हेमंत पाटील (शिवसेना)

खासदार इम्तियाज जलील ( एमआयएम-औरंगाबाद)

विधानसभेच्या औरंगाबाद (मध्य) मतदारसंघातील एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील हे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यांनी अटीतटीच्या लढतीत शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांचा पराभव केला. जलील यांनी वंचित बहुजन आघाडीच्या तिकीटावर ही निवडणूक लढवली. त्यांनी साडेचार हजार मतांनी खैरे यांचा पराभव केला. या निवडणुकीत खैरेंना हर्षवर्धन जाधव यांचा फटका बसला. मागील २० वर्षांपासून औरंगाबादचा विकास थांबला होता, आता तो सुरू होईल, अशी प्रतिक्रिया औरंगाबाद शहराचे एमआयएमचे नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील यांनी दिली.

खासदार-प्रताप पाटील चिखलीकर (भाजप - नांदेड)

प्रताप पाटील चिखलीकर हे नांदेड जिल्ह्यातील लोहा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार होते. यावेळी भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या विरोधात चिखलीकरांना उतरवले. चव्हाणांचे कट्टर विरोधक असलेल्या चिखलीकरांनी ४ लाख मते घेऊन लोकसभा गाठली आहे. त्यांनी अशोक चव्हाणांचा ४१ हजार मतांनी पराभव केला. आता प्रताप पाटील चिखलीकर खासदार म्हणून संसदेत नांदेड मतदारसंघाचे नेतृत्व करणार आहेत.

खासदार- उन्मेश पाटील (भाजप -जळगाव)

विधानसभेच्या चाळीसगाव मतदारसंघाचे भाजप आमदार उन्मेष पाटील हे आता लोकसभेत जळगाव मतदारसंघाचे नेतृत्व करणार आहेत. उन्मेश पाटील यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांचा परावव केला. उन्मेष पाटील हे ४,११,६१७ इतक्या विक्रमी मताधिक्याने विजयी झाले. मोदी सरकारने केलेली कामामुळेच जनतेने मला निवडून दिले असल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.

खासदार - बाळू धानोरकर (काँग्रेस - चंद्रपूर)

विधासभेच्या वरोरा मतदारसंघाचे शिवेसेनेचे आमदार बाळू धानोरकर हे आता लोकसभेच्या चंद्रपूर मतदारसंघाचे नेतृत्व संसदेत करणार आहेत. मात्र ते काँग्रेसपक्षाचे खासदार आहेत. धानोरकर यांनी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेच्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपचे नेते केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांचा पराभव केला. धानोरकर हे राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार ठरले आहेत.

खासदार- सुनिल तटकरे (राष्ट्रवादी - रायगड)

राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे आमदार सुनिल तटकरे हे आता लोकसभेच्या रायगड मतदारसंघाचे संसदेत नेतृत्व करणार आहेत. त्यांनी शिवसेनेचे नेते आणि केंद्रीय मंत्री अनंत गिते यांना पराभवाची धुळ चारली. रायगड मधून सुनील तटकरे यांचा ३१ हजार ४३८ मतांनी विजय झाला.

खासदार गिरीष बापट (पुणे -भाजप)

भाजपचे पुणे-कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार गिरीष बापट हे पुणे लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. बापट हे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांचा पराभव केला. बापट हे तब्बल ३ लाख २४ हजार मतांनी विजयी झाले. बापट आता पुणे लोकसभा मतदारसंघाचे संसदेत नेतृत्व करणार आहेत.

खासदार हेमंत पाटील (-हिंगोली शिवसेना)

नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेंमत पाटील हे हिंगोली लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. या निवडणुकीत हेमंत पाटील यांनी तब्बल दीड लाखांपेक्षा अधिक मतांनी विजय मिळविला आहे. या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून सुभाष वानखेडे, वंचित बहुजन आघाडीकडून मोहन राठोड यांच्यासह २८ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. मागील निवडणुकीत हिंगोलीची जागा मोदी लाटेत माजी खासदार राजीव सातव यांनी शिवसेनेकडून खेचून घेतली होती. हिंगोली लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी गद्दाराला जागा दाखवली असून एका सामान्य शिवसैनिकाला निवडून दिले. हा जनतेचा विजय असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Intro:Body:

या आमदारांचा आवाज आता लोकसभेत घुमणार..!  

मुंबई -  लोकसभा निवडणुकीचे निकाल गुरुवारी जाहीर झाले. यावेळी राज्यात सेना-भाजपला घवघवीत यश मिळाले. मात्र, आघाडीला अपेक्षित असे यश मिळाले नाही. या लोकसभा निवडणुकीत युती आणि आघाडीकडून काही विद्यमान आमदारांना लोकसभेचे तिकीट देण्यात आले होते. त्यापैकी कोणकोणते आमदार दिल्लीत जाणार आहेत.. त्याबाबतचा घेतलेला हा संक्षिप्त आढावा...

लोकसभा निवडणुकीत भाजपला २३, शिवसेनेला- १८ राष्ट्रवादीला -५, काँग्रेसला -१ आणि वंचित बहुजन आघाडीला -१ जागा मिळाली आहे. राज्यातील ४८ खासदारांचा संसदेत आवाज घुमणार आहे. त्यापैकी विधानभवनात जनतेचे प्रश्न मांडणारे एकूण ७ आमदार आता संसदभवनामध्ये राज्याच्या प्रश्नांवर आवाज उठवणार आहेत.

औरंगाबाद मध्य - इम्तियाज़ जलील (एमआयएम )

लोहा - प्रताप पाटील चिखलीकर (शिवसेना)

चाळीसगाव- उन्मेश पाटील (भाजप)

वरोरा - बाळू धानोरकर (शिवसेना)

रायगड - सुनिल तटकरे (राष्ट्रवादी - विधानपरिषद)

पुणे कसबा - गिरीष बापट (भाजप)

हिंगोली - नांदेड दक्षिण - हेमंत पाटील (शिवसेना)

हिंगोली लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांनी तब्बल दीड लाखांपेक्षा अधिक मतांनी दणदणीत विजय मिळविला आहे. विशेष म्हणजे सर्वच विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेला आघाडी मिळाली आहे.

खासदार इम्तियाज जलील ( एमआयएम-औरंगाबाद)

विधानसभेच्या औरंगाबाद मध्य मतदारसंघातील एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील हे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यांनी अटीतटीच्या लढतीत शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांचा पराभव केला. जलील यांनी वंचित बहुजन आघाडीच्या तिकीटावर ही निवडणूक लढवली. त्यांनी साडेचार हजार मतांनी खैरे यांचा पराभव केला. या निवडणुकीत खैरेंना हर्षवर्धन जाधव यांचा फटका बसला. मागील २० वर्षापासून औरंगाबादचा विकास थांबला होता, आता तो सुरू होईल, अशी प्रतिक्रिया औरंगाबाद शहराचे एमआयएमचे नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील यांनी दिली.

खासदार-प्रताप पाटील चिखलीकर (भाजप - नांदेड)

प्रताप पाटील चिखलीकर हे नांदेड जिल्ह्यातील लोहा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार होते. यावेळी भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या विरोधात चिखलीकरांना उतरवले. चव्हाणांचे कट्टर विरोधक असलेल्या चिखलीकरांनी ४ लाख मते घेऊन लोकसभा गाठली आहे. त्यांनी अशोक चव्हाणांचा ४१ हजार मतांनी पराभव केला. आता प्रताप पाटील चिखलीकर खासदार म्हणून संसदेत नांदेड मतदारसंघाचे नेतृत्व करणार आहेत.

खासदार- उन्मेश पाटील (भाजप -जळगाव)

विधानसभेच्या चाळीसगाव मतदारसंघाचे भाजप आमदार उन्मेष पाटील हे आता लोकसभेत जळगाव मतदारसंघाचे नेतृत्व करणार आहेत. उन्मेश पाटील यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांचा परावव केला. उन्मेष पाटील हे ४,११,६१७ इतक्या विक्रमी मताधिक्याने विजयी झाले. मोदी सरकारने केलेली कामामुळेच जनतेने मला निवडून दिले असल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.

खासदार - बाळू धानोरकर (काँग्रेस - चंद्रपूर)

विधासभेच्या वरोरा मतदारसंघाचे शिवेसेनेचे आमदार बाळू धानोरकर हे आता  लोकसभेच्या चंद्रपूर मतदारसंघाचे नेतृत्व संसदेत करणार आहेत. मात्र ते काँग्रेसपक्षाचे खासदार आहेत. धानोरकर यांनी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेच्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपचे नेते केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांचा पराभव केला. धानोरकर हे राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार ठरले आहेत.

खासदार- सुनिल तटकरे (राष्ट्रवादी - रायगड)

राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे आमदार सुनिल तटकरे हे आता  लोकसभेच्या रायगड मतदारसंघाचे संसदेत नेतृत्व करणार आहेत. त्यांनी शिवसेनेचे नेते आणि केंद्रीय मंत्री अनंत गिते यांना पराभवाची धुळ चारली. रायगड मधून सुनील तटकरे यांचा ३१ हजार ४३८ मतांनी विजय झाला.  

खासदार गिरीष बापट (पुणे -भाजप)

भाजपचे पुणे-कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार गिरीष बापट हे पुणे लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. बापट हे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांचा पराभव केला. बापट हे तब्बल ३ लाख २४ हजार मतांनी विजयी झाले. बापट आता पुणे लोकसभा मतदारसंघाचे संसदेत नेतृत्व करणार आहेत.

खासदार हेमंत पाटील (-हिंगोली शिवसेना)

नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेंमत पाटील हे हिंगोली लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. या निवडणुकीत हेमंत पाटील यांनी तब्बल दीड लाखांपेक्षा अधिक मतांनी विजय मिळविला आहे. या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून सुभाष वानखेडे, वंचित बहुजन आघाडीकडून मोहन राठोड यांच्यासह २८ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. मागील निवडणुकीत हिंगोलीची जागा मोदी लाटेत माजी खासदार राजीव सातव यांनी शिवसेनेकडून खेचून घेतली होती.  हिंगोली लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी गद्दाराला जागा दाखवली असून एका सामान्य शिवसैनिकाला निवडून दिले. हा जनतेचा विजय असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.