ETV Bharat / city

महाराष्ट्रात सलग दुसऱ्या दिवशी लसीकरणाचा विक्रमी उच्चांक, सहा लाखाहून अधिक लाभार्थ्यांना लस

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत महाराष्ट्राने आज सलग दुसऱ्या दिवशी विक्रमी उच्चांकाची नोंद केली आहे. आज राज्यात ६ लाख २ हजार १६३ नागरिकांना लस दिली. एकाच दिवशी इतक्या संख्येने लस देण्याची आतापर्यंतची ही सर्वात मोठी संख्या आहे.

author img

By

Published : Jun 23, 2021, 10:12 PM IST

Maharashtra vaccination
Maharashtra vaccination

मुंबई - कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत महाराष्ट्राने आज सलग दुसऱ्या दिवशी विक्रमी उच्चांकाची नोंद केली आहे. आज राज्यात ६ लाख २ हजार १६३ नागरिकांना लस दिली. एकाच दिवशी इतक्या संख्येने लस देण्याची आतापर्यंतची ही सर्वात मोठी संख्या आहे. लसीकरणाची विक्रमी कामगिरी करणाऱ्या आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. मंगळवारी एकाच दिवशी ५ लाख ५२ हजार ९०९ जणांचे लसीकरण करून उच्चांक नोंदविला होता.

लसीकरणात सातत्य टिकवत महाराष्ट्र देशात अग्रस्थानी आहे. आतापर्यंत सुमारे २ कोटी ९१ लाखांहून अधिक लस मात्रा राज्यात देण्यात आल्या आहेत. आज दिवसभरात ६ लाख २ हजार नागरिकांचे लसीकरण झाले. सायंकाळी सात वाजेपर्यंतची ही आकडेवारी असून त्यात अजून वाढ होऊ शकते, असे आरोग्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.