ETV Bharat / city

राज्यातील पहिले टेलीआयसीयू भिवंडीत; आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन - Bhivandi TeleICU project in Maharashtra

अतिदक्षता विभागात (आयसीयू) दाखल असलेल्या कोरोनाच्या गंभीर रुग्णांसाठी विशेष तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन आणि उपचाराची सेवा तंत्रज्ञानाच्या मदतीने घेण्यात येणार आहे. कोरोनामुळे होणारा मृत्यूदर नियंत्रणासाठी टेलीआयसीयू सुविधा फायदेशीर ठरेल, असा विश्वास आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला.

संग्रहित- राजेश टोपे
संग्रहित- राजेश टोपे
author img

By

Published : Aug 14, 2020, 8:03 PM IST

मुंबई- भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राज्यातील पहिल्या टेलीआयसीयू प्रकल्पाचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. हे टेलीआयसीयू भिवंडी येथील उपजिल्हा रुग्णालयात सुरू करण्यात आले आहे. राज्यात अकोला, जळगाव, सोलापूर, जालना आणि औरंगाबाद येथील वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा रुग्णालयांमध्ये ही सुविधा लवकरच कार्यान्वित होणार आहे.

अतिदक्षता विभागात (आयसीयू) दाखल असलेल्या कोरोनाच्या गंभीर रुग्णांसाठी विशेष तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन आणि उपचाराची सेवा तंत्रज्ञानाच्या मदतीने घेण्यात येणार आहे. कोरोनामुळे होणारा मृत्यूदर नियंत्रणासाठी टेलीआयसीयू सुविधा फायदेशीर ठरेल, असा विश्वास आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला.

असे आहे राज्यातील पहिले टेलीआयसीयू -
मेडीस्केप इंडिया फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या (सीएसआर) माध्यमातून प्रायोगिक तत्वावर ही सुविधा काही महिने देण्यात येणार आहे. भिवंडी येथील आयजीएम उपजिल्हा रुग्णालयातील आयसीयुमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. यामध्ये दिल्ली येथील विशेष तज्ज्ञांकडून गंभीर रुग्णांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवले जाते. त्यांना कुठले उपचार द्यायचे याचे मार्गदर्शन केले जाते.
दिवसातून पाच वेळा या विशेष तज्त्रांकडून रुग्णांची विचारपूस केली जाते. राज्यात अन्य ठिकाणी करण्यात येणारी ही सुविधा वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा रुग्णालयात आहे. मात्र भिवंडी त्याला अपवाद ठरले आहे. टेलीआयसीयू सुविधा असणारे हे राज्यातील पहिले उपजिल्हा रुग्णालय ठरले आहे. येथील टेलीआयसीयू कक्ष आरोग्यमंत्री यांच्या दिवंगत मातोश्री शारदाताई यांना समर्पित करण्यात आल्याचे मेडीस्केप फाउंडेशनतर्फे सांगण्यात आले.

मृत्यूदर एक टक्क्यांपेक्षाही कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न-
यावेळी आरोग्यमंत्री म्हणाले, की आरोग्य सुविधेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ही काळाची गरज आहे. राज्यातील कोरोना रुग्णांचा मृत्यूदर ही चिंतेची बाब आहे. मृत्यूदर एक टक्क्यांपेक्षाही कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात विशेष तज्ज्ञ डॉक्टरांची जाणवणारी कमतरता टेलीआयसीयू तंत्रज्ञानामुळे काहीशी भरून निघणार आहे. कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर विशेष तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनातून उपचार झाले तर मृत्यूदर कमी होण्यासाठी त्याचा लाभ होईल. जालना, सोलापूर, औरंगाबाद येथील रुग्णालयात ही सुविधा पुढील आठवड्यात कार्यान्वित होऊ शकते, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

आरोग्यमंत्र्यांकडून रुग्णांची अतिदक्षता विभागात विचारपूस
मेडीस्केप इंडिया फाउंडेशनच्या डॉ. सुनिता दुबे, डॉ. संदीप दिवाण यांनी तंत्रज्ञानाबाबत माहिती दिली. भिवंडी उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अनिल थोरात यांनी प्रास्ताविक केले. यावेळी आरोग्यमंत्र्यांनी आयसीयूमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांशी संवाद साधत त्यांची विचारपूस केली. बरे वाटते का..दादा कसे आहात काळजी घ्या..असा त्यांनी रुग्णांशी संवाद साधला. आयसीयूमध्ये कोरोना योद्ध्याची भूमिका बजाविणाऱ्या डॉक्टरांशी आरोग्यमंत्री टोपे यांनी संवाद साधला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.