ETV Bharat / city

नगरविकास विभागाकडून तब्बल 76 मुख्याधिकाऱ्यांच्या बदल्या; मुख्यमंत्र्यांच्या भुमिकेकडे लक्ष - 76 Chief Officers Transfered in maharashtra

सोमवारी राज्यातील विविध नगरपरिषद/नगरपालिका आणि महानगरपालिकांमध्ये कार्यरत असलेल्या 'वर्ग-अ' आणि 'वर्ग-ब' दर्जाच्या तब्बल 76 पेक्षा अधिक मुख्याधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या गेल्या आहेत.

maharashtra mantralay news
महाराष्ट्र मंत्रालय मुंबई
author img

By

Published : Jul 7, 2020, 8:59 PM IST

मुंबई - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रणाचे गांभीर्य आणि निकड सांगत राज्याच्या नगरविकास विभागाने मुख्याधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धमाका दोन महिन्यांपासून सुरू केला आहे. सोमवारी राज्यातील विविध नगरपरिषद/नगरपालिका आणि महानगरपालिकांमध्ये कार्यरत असलेल्या 'वर्ग-अ' आणि 'वर्ग-ब' दर्जाच्या तब्बल 76 पेक्षा अधिक मुख्याधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या गेल्या आहेत.

सदर बदल्यांना कोरोना नियंत्रणासाठीचे 'गांभीर्य' आणि 'निकड' असे कारण देत, या बदल्या केल्या गेल्या आहेत. विशेष म्हणजे गृह विभागाच्या बदल्यांना तत्काळ स्थगिती देणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नगरविकास विभागाच्या या बदली निर्णयाबाबत काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा - मुंबईत सांसर्गिक आजारांवर अत्याधुनिक उपचार सुविधेचे कायमस्वरुपी रुग्णालय तयार करा - मुख्यमंत्री

राज्यात शहरी भागात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव झालेला आहे. त्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून स्थानिक नगरपालिका, नगरपरिषद आणि महानगरपालिका या विविध उपाययोजना करत आहेत. शिवाय राज्य सरकारने नियमित बदल्या न करण्याचे धोरण स्विकारले असले, तरीही कोरोनाच्या नियंत्रणाचे कारण देत नगर विकास विभागाने बदल्यांचा सपाटा लावला आहे.

याबाबत संबंधीत अधिकाऱ्यांशी संवाद साधला असता, काही रिक्त जागा भरल्या गेल्या असल्याची माहिती त्यांनी दिली. परंतु, कोरोना वाढीच्या काळात गेल्या 4 महिन्यापासून काम करणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांच्या अचानक बदल्या केल्याने कोरोनाविरोधी सुरू असलेल्या कामावरही परिणाम होणार नाही का? असाही सवाल उपस्थित झाला आहे. नगरविकास विभागाने मे आणि जून महिन्यातही बदल्यांचा धमाका सुरू ठेवला होता. आता जुलै महिन्यातही बदल्यांचा सपाटा सुरूच आहे.

हेही वाचा - मराठा आरक्षण : सरकारी वकीलांनी न्यायालयात प्रभावीपणे बाजू मांडली - अशोक चव्हाण

मागील तीन महिन्यात करण्यात आलेल्या बदल्यांमुळे त्या-त्या शहरात किती प्रमाणात कोरोना आटोक्यात आला? यावर नगरविकास विभागाने स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता असल्याची चर्चा आता केली जाऊ लागली आहे. त्यामुळे गृह विभागाच्या बदल्या करताना विश्वासात न घेतल्याने त्यास स्थगिती देणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबत काय भूमिका घेणार? याकडे आता लक्ष लागले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.