ETV Bharat / city

सहकारी बँकांच्या खासगीकरणाविरोधात महाराष्ट्र अर्बन को- ऑपरेटिव्ह फेडरेशनचे हातजोडो आंदोलन - आरबीआय

पीएमसी बँकेमध्ये झालेल्या घोटाळ्यानंतर आरबीआय सहकारी बँकांबाबत कडक निर्बंध राबवत आहे. त्यामुळे महाराष्ट्र अर्बन को- ऑपरेटिव्ह फेडरेशनने आक्रमक होत आज (शनिवार) हातजोडो आंदोलन केले. आरबीआयच्या दबावाला बळी पडत न्यू इंडिया को- ऑफ बँक ही बँक त्यांचे रूपांतर खासगी बँकमध्ये करण्यास जात होती.

bank agitation
विद्याधर अनास्कर, अध्यक्ष, महाराष्ट्र अर्बन कॉ- ऑपरेटिव्ह फेडरेशन
author img

By

Published : Jan 18, 2020, 10:07 PM IST

मुंबई - पीएमसी बँकेमध्ये झालेल्या घोटाळ्यानंतर आरबीआय सहकारी बँकांबाबत कडक निर्बंध राबवत आहे. त्यामुळे महाराष्ट्र अर्बन को- ऑपरेटिव्ह फेडरेशनने आक्रमक होत आज (शनिवार) हातजोडो आंदोलन केले. आरबीआयच्या दबावाला बळी पडत न्यू इंडिया को- ऑफ बँक ही बँक त्यांचे रूपांतर खासगी बँकमध्ये करण्यास जात होती. आज त्यासाठी या बँकेच्यावतीने विशेष सभेचे आयोजन गिरगाव येथे केले होते. याला विरोध करत फेडरेशनने याठिकाणी हातजोडो आंदोलन केले. या आंदोलनानंतर न्यू इंडिया बँकेने एक पाऊल मागे टाकत खासगीकरणाचा प्रस्ताव मागे घेतला आहे.

सहकारी बँकांच्या खासगीकरणाविरोधात महाराष्ट्र अर्बन को- ऑपरेटिव्ह फेडरेशनचे हातजोडो आंदोलन

हेही वाचा - 'शिर्डीमधील वाद मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर मिटवावा'

नागरी सहकारी बँकाच मोडीत काढण्याचे धोरण रिझव्‍‌र्ह बँक राबवत आहे. थकीत कर्जाचे प्रमाण वाढवण्याची धमकी सहकारी बँकांना देण्यात येत आहे. या बँकांवर व्यापारी बँकेत रूपांतरित होण्यासाठी दबाव आणला जात आहे. या दबावामुळेच न्यू इंडिया बँक व्यवस्थापनाने या बँकेचे व्यापारी बँकेत रूपांतर करण्याचे ठरवले होते. मात्र, आम्ही फेडरेशनच्यावतीने त्यांना विरोध केला. आज न्यू इंडिया बँकेतर्फे खासगी बँक करण्यासंबंधी विशेष सभेचे आयोजन भारतीय विद्याभवन गिरगाव चौपाटी येथे केले होते. या बँकांच्या संचालकांनी घेतलेल्या खासगीकरणाच्या निर्णयाविरोधात आम्ही सभास्थळी फेडरेशनच्यावतीने हातजोडो आंदोलन केले. यावेळी तिथे उपस्थितीत असलेले न्यू इंडिया बँकेचे सभासद आमदार राम कदम यांनी न्यू इंडिया बँकेचे संचालक आणि आमच्या फेडरेशन मध्ये चर्चा घडवून आणली. सदर प्रस्ताव स्थगित ठेवत भविष्यामध्ये आर बी आयकडून होणाऱ्या निर्णयानुसार संचालक मंडळाने अधिकार घेण्याबाबत मर्यादित स्वरूपाचा ठराव संमत करण्याचे आम्ही मान्य केले, असे आम्हाला न्यू इंडीया बँकेच्यावतीने सांगण्यात आल्याचे महाराष्ट्र अर्बन कॉ- ऑपरेटिव्ह फेडरेशनचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी सांगितले.

यावेळी न्यू इंडिया बँकेच्यावतीने खासगी सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले होते. हे अत्यंत चुकिचे आहे. या बँकेने व्यापारी बँकेत रूपांतर होण्याचा निर्णय का घेतला आहे? याबाबतची सखोल चौकशी करण्याचेही आम्ही ठरवले, असेही अनास्कर यांनी सांगितले.

Intro:
मुंबई

पंजाब महाराष्ट्र बँकेमध्ये झालेल्या घोटाळ्यांतर आर बी आय सहकारी बँकांबाबत कडक निर्बंध राबवत असल्यामुळे महाराष्ट्र अर्बन को- ऑपरेटिव्ह फेडरेशनने आक्रमक होत आज हात जोडो आंदोलन केले. आर बी आयच्या दबावाला बळी पडत न्यू इंडिया को- ऑफ बँक लि ही बँक त्यांचे रूपांतर खासगी बँकमध्ये करण्यास जात होती. आज त्यासाठी या बँकेच्या वतीने विशेष सभेचे आयोजन गिरगाव येथे केले होते. याला विरोध करत फेडरेशनने याठिकाणी हात जोडो आंदोलन केले. या आंदोलनानंतर न्यू इंडिया को- ऑफ बँक लि एक पाऊल टाकत खासगीकरणाचा प्रस्ताव मागे घेतला आहे. Body:नागरी सहकारी बँकाच मोडीत काढण्याचे धोरण रिझव्‍‌र्ह बँकेने राबवत आहे. थकीत कर्जाचे प्रमाण वाढविण्याची धमकी सहकारी बँकांना देण्यात येत आहे. या बँकांवर व्यापारी बँकेत रूपांतरित होण्यासाठी दबाव आणला जात आहे. या दबावामुळेच न्यू इंडिया को- ऑप. बँक व्यवस्थापनाने या बँकेचे व्यापारी बँकेत रूपांतर करण्याचे ठरविले होते. मात्र आम्ही फेडरेशनच्या वतीने त्यांना विरोध केला. आज न्यू इंडिया बँकेतर्फे खासगी बँक करण्यासंबंधी विशेष सभेचे आयोजन भारतीय विद्याभवन गिरगाव चौपाटी येथे केले होते. या बँकांच्या संचालकांनी घेतलेल्या खासगीकरण्याच्या निर्णयाविरोधात आम्ही सभास्थळी फेडरेशनच्या वतीने हात जोडो आंदोलन केले. यावेळी तिथे उपस्थितीत असलेले न्यू इंडिया बँकेचे सभासद आमदार राम कदम यांनी न्यू इंडिया बँकेचे संचालक आणि आमच्या फेडरेशन मध्ये चर्चा घडवून आणली. सदर प्रस्ताव स्थगित ठेवत भविष्यामध्ये आर बी आयकडून होणाऱ्या निर्णयानुसार संचालक मंडळाने अधिकार घेण्याबाबत मर्यादित स्वरूपाचा ठराव संमत करण्याचे आम्ही मान्य केले. असे, आम्हाला न्यू इंडीया बँकेच्या वतीने सांगण्यात आले असे महाराष्ट्र अर्बन कॉ- ऑपरेटिव्ह फेडरेशनचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी सांगितले.

यावेळी न्यू इंडिया बँकेच्यावतीने खासगी सुरक्षक तैनात करण्यात आले होते. हे अत्यंत चुकिचे आहे. तसेच या बँकेने व्यापारी बँकेत रूपांतर होण्याचा निर्णय का घेतला आहे? याबाबतची सखोल चौकशी करण्याचेही आम्ही ठरवले आहे. असेही अनास्कर यांनी सांगितले.

बाईट

विद्याधर अनास्कर ,
महाराष्ट्र अर्बन कॉ- ऑपरेटिव्ह फेडरेशनचे अध्यक्ष

संजय भेंडे, हिंदी बाईटConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.