ETV Bharat / city

Covid 19 New Restrictions: महाराष्ट्रात पुन्हा निर्बंध लागू, जाणून घ्या नवीन मार्गदर्शक सूचना - कोरोना अपडेट महाराष्ट्र

राज्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका वाढू लागल्याने राज्य सरकारकडून आधीच्याच नियमावलीमध्ये नवीन बदल करत नव्याने काही निर्बंध लादले आहेत. आता राज्यातील सर्व जिल्हे आणि महानगरपालिकांचा समावेश तिसऱ्या गटाच्या वरच ठेवण्यासंदर्भात राज्य सरकारनं निर्णय जारी केला आहे.

unlock-guidelines-
unlock-guidelines-
author img

By

Published : Jun 25, 2021, 7:44 PM IST

Updated : Jun 26, 2021, 12:51 PM IST

मुंबई - महाराष्ट्रात ५ टप्प्यांमध्ये निर्बंध शिथील करण्यात आल्यानंतर गेल्या दोन ते तीन आठवड्यांमध्ये नवे करोनाबाधित आणि मृतांच्या आकड्यांमध्ये काही प्रमाणात वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. त्याचबरोबर कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळेही राज्यासमोर मोठे आव्हान उभे केले आहे. त्यामुळे राज्य सरकारडून नवीन गाईडलाईन जारी करण्यात आली असून सर्व जिल्ह्यात आता तिसऱ्या स्तरावरील निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये रुग्णांमध्ये डेल्टा प्लस करोना विषाणू आढळून आल्यामुळे आणि त्याची संख्या हळूहळू वाढू लागल्यामुळे राज्य सरकारकडून पुन्हा निर्बंध लादण्यात आले आहेत. राज्य सरकारकडून आधीच्याच नियमावलीमध्ये नवीन बदल जाहीर केले आहेत. यानुसार राज्यातील सर्व जिल्हे आणि महानगरपालिकांचा समावेश तिसऱ्या गटाच्या वरच ठेवण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे.

सरकारने जारी केलेल्या नव्या देशात म्हटले आहे की, आठवड्याचा पॉझिटिव्हीटी रेट आणि ऑक्सिजन बेडची व्याप्ती बघता तिसऱ्या स्तरावरील निर्बंध महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात लागू करण्यात आले आहेत. तिसऱ्या स्तरावरील निर्बंध आणखी कडक करायचे असल्यास स्थानिक प्रशासन त्याबाबत निर्णय घेऊ शकते. लेव्हल ३ मध्ये अत्यावश्यक दुकाने आणि आस्थापना सर्व दिवशी दुपारी ४ वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याची परवानगी आहे. तर अत्यावश्यक नसलेली दुकाने आणि आस्थापने सोमवार ते शुक्रवार या दिवसांत ४ वाजेपर्यंत खुली ठेवू शकता. येथे वीकेंड कडक निर्बंध लागू असतील.काय सुरू काय बंद ?- १ व २ लेव्हलचे जिल्हे ३ मध्ये येतील.- थिएटर बंद राहतील.- रेस्टॉरंट ४ वाजेपर्यंतच राहणार सुरू,- लोकल फक्त अत्यावश्यक सेवेतील लोकांसाठी सुरू.- राज्यातील सार्वजनिक स्थळे सकाळी ५ ते ९ पर्यंतच सुरू.- शासकीय उपस्थिती ५० टक्के,-जमावावर पूर्णपणे प्रतिबंध.

राज्य सरकारचा नवा आदेश.. काय सुरू काय राहणार बंद ?

  • - आरोग्य कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकल ट्रेनने प्रवास करता येईल.
  • - मोठ्या प्रमाणात कोरोना चाचणी करावी, आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या वाढवा.
  • - कोविड १९ च्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी कठोर करा
  • - लसीकरणासाठी लोकांमध्ये जनजागृती करावी.
  • - किमान 70 टक्के लोकांचे तरी लसीकरण झाले पाहिजे.
  • - ड्रेसिंग ट्रेकिंग आणि ट्रीटमेंट ही पद्धत जलद गतीने करावी.
  • - RT-PCR टेस्ट मोठ्या प्रमाणात कराव्यात. केवळ आरटीपीसीआर चाचण्यांचाच आधार घ्यावा
  • - मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी काटेकोरपणे स्थानिक प्रशासनाने करावी.
  • - मॉल्स आणि लग्न समारंभाच्या ठिकाण भरारी पथके नेमून त्या माध्यमातून तपासण्या कराव्यात.
  • - अत्यावश्यक दुकाने दुपारी ४ पर्यंत खुली राहतील.
  • - तसेच इतर दुकाने दुपारी ४ पर्यंत खुली राहतील. पण शनिवार-रविवारी पूर्णपणे बंद असतील.
  • - मॉल, चित्रपटगृह बंद.
  • - हॉटेल्सना दुपारी ४ पर्यंत ५० टक्के क्षमतेने सुरू राहण्याची परवानगी, परंतु शनिवार-रविवार बंद.
  • - उद्याने, मैदाने, जॉगिंग पहाटे ५ ते सकाळी ९ पर्यंत सुरू राहतील.
  • - सरकारी कार्यालये ५० टक्के क्षमतेने सुरू राहण्यास परवानगी.
  • - खासगी कार्यालये (परवानगी मिळाल्यास) ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यात येतील.
  • - चित्रीकरणाला बायो बबल वातावरणात परवानगी. संध्याकाळी ५ वाजल्यानंतर बाहेर जाण्यास परवानगी नाही.
  • - सार्वजनिक वाहतूक १०० टक्के क्षमतेने सुरू राहतील. उभ्याने प्रवास करता येणार नाही.
  • - जीम, सलून, स्पा ५० टक्के क्षमतेने दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील.
  • - लग्नाच्या हॉलला ५० टक्के क्षमतेने खुले राहण्यास परवानगी देण्यात येईल. कमाल १०० लोकांची उपस्थितीस परवानगी असेल.
  • - अंत्यसंस्कार विधीला २० लोकांना उपस्थित राहण्यास परवानगी.

Last Updated : Jun 26, 2021, 12:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.