ETV Bharat / city

TET 2021 : 3 ऑगस्टपासून भरता येणार ऑनलाइन अर्ज, १० ऑक्टोबरला परीक्षा

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा १० ऑक्टोबर २०२१ रोजी आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया ३ ऑगस्ट २०२१पासून सुरू होत असून २५ ऑगस्टपर्यंत अर्ज भरता येणार आहेत.

author img

By

Published : Aug 3, 2021, 3:53 PM IST

शिक्षक पात्रता परीक्षा
शिक्षक पात्रता परीक्षा

मुंबई - शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा १० ऑक्टोबर २०२१ रोजी आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया ३ ऑगस्ट २०२१पासून सुरू होत असून २५ ऑगस्टपर्यंत अर्ज भरता येणार आहेत, अशी माहिती परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी ही माहिती दिली आहे.

हेही वाचा - शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यास 2 वर्षानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला मान्यता

वेळापत्रक जाहीर

शालेय शिक्षण विभागाने नुकतेच ६ हजार १०० शिक्षकांची भरती करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, शिक्षक पात्रता परीक्षाचे आयोजन गेल्या दोन वर्षात झाले नव्हते. त्यामुळे या शिक्षक भरतीपासून बरेच विद्यार्थी वंचित राहण्याची भीती व्यक्त होत होती. तसेच उमेदवारांनीसुद्धा शालेय शिक्षण विभागाकडे शिक्षकांची भरती करण्याअगोदर शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घेण्याची मागणी केली होती. त्यानुसार आता शिक्षण क्षेत्रात आपले भविष्य घडवण्यासाठी तयार असलेल्या भावी शिक्षकांना दिलासा देण्याचे काम शिक्षण विभागाने घेतला आहे. शिक्षक पात्रता परीक्षेचे आयोजन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला नुकतीच मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

दहा लाख विद्यार्थी परीक्षेला बसणार?

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा रविवार, १० ऑक्टोबर २०२१ रोजी आयोजित करण्यात आली आहे. परीक्षेच्या आयोजनाची जबाबदारी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेवर आहे. ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया ३ ऑगस्ट २०२१पासून सुरू होत असून २५ ऑगस्टपर्यंत अर्ज भरता येणार आहेत. शिक्षक पात्रता परीक्षाचे आयोजन गेल्या दोन वर्षात झाले नव्हते. सन २०१८-१९नंतर आता परीक्षाचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी सात लाख प्रशिक्षार्थी ही परीक्षा देत असतात, परंतु गेल्या दोन वर्षांत परीक्षा न झाल्याने यंदा अंदाजे दहा लाख विद्यार्थी परीक्षेला बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

हेही वाचा - टीईटीत शिक्षकांनी केला पाच वर्षांतील विक्रम; १६ हजार ५९२ शिक्षक झाले पात्र

परीक्षेचे वेळापत्रक

  • ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याचा कालावधी - ३ ऑगस्ट २०२१ ते २५ ऑगस्ट २०२१ (वेळ रात्री २३.५९ वाजेपर्यंत)
  • प्रवेशपत्राचे ऑनलाइन प्रिंट घेणे - २५ सप्टेंबर २०२१ ते १० ऑक्टोबर २०२१
  • शिक्षक पात्रता परीक्षा पेपर १ - १० ऑक्टोबर २०२१ सकाळी १०.३० ते दुपारी १
  • शिक्षक पात्रता परीक्षा पेपर २ - १० ऑक्टोबर २०२१ दुपारी २ ते सायंकाळी ४.३०

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.