मुंबई - आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. यात काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये खुलताबाद (जि.औरंगाबाद) येथील सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट या संस्थेच्या ताब्यातील ४५ हेक्टर जागा राज्य मार्ग परिवहन मंहामंडळाकडे देण्याबाबत, तसेच अन्न सुरक्षा कार्यप्रणालीचे बळकटीकरण करणे या योजने संबंधी निर्णयासह पुढील निर्णय घेण्यात आले आहेत.
हेही वाचा - ED Custody to Pravin Raut : प्रवीण राऊत यांना 9 फेब्रुवारीपर्यंत ईडी कोठडी
बैठकीतील महत्त्वाचे निर्णय थोडक्यात
1) खुलताबाद (जि.औरंगाबाद) येथील सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट या संस्थेच्या ताब्यातील ४५ हेक्टर जागा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडे देण्यास मान्यता (महसूल विभाग).
2) मुंबई महानगर प्रदेशातील (बृहन्मुंबई महानगरपालिका वगळून) झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामध्ये पालघर नगरपरिषद आणि बोईसर ग्रामपंचायत क्षेत्राचा समावेश. (गृहनिर्माण विभाग)
3) महाराष्ट्र परिवहन कायदा २०१७ मध्ये रस्ते सुरक्षा उपाययोजना व त्यांच्या संबंधित बाबींकरिता तरतूद करण्यासाठी विधेयक २८/ २०१७ मागे घेण्याचा निर्णय. (परिवहन विभाग)
4) अन्न सुरक्षा कार्यप्रणालीचे बळकटीकरण करणे या योजनेसाठी अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणासोबत सामंजस्य करार करण्यास मान्यता. (वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग)