ETV Bharat / city

Maharashtra Corona Update : राज्यात कोरोनाच्या 324 रुग्णांची नोंद; 2 जणांचा मृत्यू

राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस घट होताना दिसत ( Maharashtra Corona Update ) आहे. आज ( शनिवार ) राज्यात 324 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तर, 2 जणांचा मृत्यू झाला आहे.

Maharashtra Corona Update
Maharashtra Corona Update
author img

By

Published : Mar 12, 2022, 8:30 PM IST

मुंबई - आज राज्यात कोरोनाच्या 324 नव्या रुग्णांची नोंद ( Maharashtra Corona Update ) करण्यात आली. तर, दोघांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज ( शनिवार ) सक्रिय रुग्णांची संख्या 2 हजार 721 झाली असून, पॉझिटिव्ह रेट 10 टक्क्यांवर पोहचला आहे. सलग चौथ्या दिवशी ओमायक्रॉनचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही, असे राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने सांगितले आहे.

शुक्रवारी 318 रुग्ण आढळून आले होते. त्यात सहा रुग्णांची भर पडत आज ( शनिवारी ) 324 नव्या रुग्णांची नोंद झाली. तर 2 जणांचा मृत्यू झाल्याने मृत्यूदर 1.82 टक्के झाला आहे. दिवसभरात 525 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील 98.9 टक्क्यांवर गेले आहे. आजपर्यंत 77 लाख 20 हजार 474 रुग्ण ठणठणीत होऊन घरी परतले आहेत.

आजपर्यंत 7 कोटी 85 लाख 90 हजार 233 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 10.02 टक्के इतके म्हणजेच 78 लाख 70 हजार 951 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 17 हजार 9 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये तर 554 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 2721 कोरोना सक्रिय रुग्ण आहेत.

विभागनिहाय रुग्णंसख्या -

  • मुंबई महापालिका - 31
  • ठाणे - 0
  • ठाणे मनपा - 8
  • नवी मुंबई मनपा - 13
  • कल्याण डोंबिवली मनपा - 3
  • मीरा भाईंदर - 1
  • वसई विरार मनपा - 1
  • नाशिक - 5
  • नाशिक मनपा - 7
  • अहमदनगर - 25
  • अहमदनगर मनपा - 2
  • पुणे - 56
  • पुणे मनपा - 70
  • पिंपरी चिंचवड मनपा - 13
  • सातारा - 7
  • नागपूर मनपा - 1

हेही वाचा - Mumbai Crime News : धावत्या लोकलमध्ये तरुणीवर ब्लेडने हल्ला; हल्लेखोर सीसीटीव्हीत कैद

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.