मुंबई - राज्यात नव्या कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या संख्येत विक्रमी वाढ होताना दिसत आहे. आजची आकडेवारी राज्याची चिंता वाढवणारी आहे. आज राज्यात तब्बल ४९ हजार ४४७ नवीन कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर ३७ हजार ८२१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात २७७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
राज्यात आज ४९,४४७ कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन ३७, ८२१ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण २४९५३१५ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण ४०११७२ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ८४.४९% झाले आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
राज्यात कोरोणाची दुसरी लाट आली आहे. राज्यात कोरोनाचा आलेख चढा आहे . आज रुग्णांची नव्या 49,447 रुग्णाची नोंद झाली आहे.सातत्याने वाढणाऱ्या या रुग्ण संख्ये मुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे.राज्यातील स्थिती गंभीर होत चालली आहे. रुग्णाची वाढ होत असतानाच सक्रिय रुग्ण संख्या देखील 4 लाखांच्या पार पोहोचली आहे.
राज्यातील कोरोनाची स्थिती.
राज्यात 37 हजार 821रुग्ण 24 तासांत कोरोना मुक्त झाले आहेत .
राज्यात आतापर्यंत 24 लाख 95हजार 315रुग्णांनी कोरोनावर मात केलीय
राज्यात नव्या 49,447 रुग्णांची नोंद झाली आहे.
राज्यात 277रुग्णांचा म्रुत्यु झाला झाला असून म्रुत्यूदर 1.88 टक्के एवढा आहे.
राज्यात एकूण 29लाख 53हजार 523 रुग्णांची नोंद झालीय.
राज्यात एकूण सक्रिय रुग्ण 4 लाख 01 हजार 172 इतकी झालीय.
राज्यात कोणत्या भागात सर्वाधिक नव्या रुग्णांची नोंद
मुंबई महानगरपालिका- 9108
ठाणे- 703
ठाणे मनपा- 1482
नवी मुंबई-1,327
कल्याण डोंबिवली- 1,278
उल्हासनगर-162
भिवंडी निजामपूर-139
मीराभाईंदर-400
पालघर-193
वसई विरार मनपा-375
रायगड-256
पनवेल मनपा-566
नाशिक-1,441
नाशिक मनपा-2,459
अहमदनगर-1,464
अहमदनगर मनपा-500
धुळे- 230
धुळे मनपा - 137
जळगाव- 832
जळगाव मनपा- 472
नंदुरबार-820
पुणे- 2,297
पुणे मनपा- 5,778
पिंपरी चिंचवड- 2,798
सोलापूर- 412
सोलापूर मनपा-295
सातारा - 688
सांगली- 155
औरंगाबाद मनपा704
औरंगाबाद-434
जालना-407
परभणी -101
परभणी मनपा-154
लातूर मनपा-288
लातूर 390
उस्मानाबाद-349
बीड -448
नांदेड मनपा-504
नांदेड-714
अकोला -153
अकोला मनपा-164
अमरावती-147
यवतमाळ-236
बुलडाणा-849
वाशिम - 285
नागपूर- 1,090
नागपूर मनपा-2,853
वर्धा-300
भंडारा-837
गोंदिया-250
चंद्रपुर-229
चंद्रपूर मनपा-124