मुबंई - शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद पदी शिवसेना आमदार भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती अवैध असल्याचे शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. या संदर्भातील ट्वीट करत त्यांनी माहिती दिली. दरम्यान, एकनाथ शिंदेंच्या ट्विटनंतर आता शिवसेनेत असली-नकलीची लढाई सुरू झाली असल्याची चर्चा आहे.
काय म्हणाले एकनाथ शिंदे - शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद पदी शिवसेना आमदार भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुनील प्रभू यांनी आजच्या आमदारांच्या बैठकीबद्दल काढलेले आदेश कायदेशीरदृष्ट्या अवैध आहेत, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
गटनेते पदावरून शिंदे यांची हकालपट्टी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना विधिमंडळ गटनेते पदावरून शिंदे यांना हटवण्यात आले. त्याऐवजी शिवडीचे आमदार अजय चौधरी यांना देण्यात आले. शिवसेना आमदार रवींद्र वायकर यांनी त्यावर सूचक अनुमोदन दिले आहे. तर उदय सामंत, राजन साळवी यांनी अनुमोदन दिलेले पत्र उपाध्यक्ष झिरवळ यांना विधिमंडळात देण्यात आले. दरम्यान, शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे ( Minister Eknath Shinde ) यांच्या बंडखोरीमुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे याची शिवसेना विधिमंडळ गटनेते पदावरून तत्काळ उचलबांगडी ( Shinde Fired From Group Post ) केली. परळ-शिवडीमधील कट्टर शिवसैनिक आणि आमदार अजय चौधरी यांची गटनेतापदी वर्णी लागली आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना या संदर्भातील पत्र काल देण्यात आले.