ETV Bharat / city

राज्यातील 94 हजार शिक्षकांच्या प्रशिक्षणाला सुरुवात; वरिष्ठ व निवडश्रेणी मिळून फायदा होणार

author img

By

Published : Jun 1, 2022, 8:15 PM IST

भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांच्या आंदोलन दणक्याने राज्यातील ९४ हजार ५४१ शिक्षकांचे वरिष्ठ व निवडश्रेणीचे प्रशिक्षण आजपासून सुरू ( training program for teachers start ) झाले.

teacher
teacher

मुंबई - भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांच्या आंदोलन दणक्याने राज्यातील ९४ हजार ५४१ शिक्षकांचे वरिष्ठ व निवडश्रेणीचे प्रशिक्षण आजपासून सुरू झाले. शिक्षकांना या प्रशिक्षणाचा आर्थिक फायदा होऊन पगारवाढ होणार ( training program for teachers start )आहे.

आंदोलन करण्याचा दिला होता इशारा - राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांना सेवेत सलग १२ वर्ष पूर्ण झाल्यावर वरिष्ठ वेतनश्रेणी व २४ वर्षानंतर निवडश्रेणी मंजूर केली जाते. यासाठी शिक्षकांनी वरिष्ठ व निवडश्रेणीचे प्रशिक्षण करणे आवशयक असते. मात्र, शासनाने हे प्रशिक्षण आयोजित न केल्याने राज्यातील हजारो शिक्षक वरीष्ठ व निवडश्रेणीपासून वंचित होते. याबाबत भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी शासन दरबारी पाठपुरावा सुरू केला होता. राज्यातील शिक्षकांचे वरीष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण आयोजित करावे, अन्यथा ५ सप्टेंबर शिक्षक दिना पासून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा अनिल बोरनारे यांनी दिला होता. बोरनारे यांच्या आंदोलनाच्या दणक्याने प्रशासन खडबडून जागे होऊन प्रशिक्षण लवकर आयोजित करू, असे लेखी पत्र अनिल बोरनारे यांना दिले होते. अखेर शिक्षण विभागाने आजपासून ऑनलाइन प्रशिक्षण आयोजित केले असून, शिक्षकांनी आपल्या सोयीच्या वेळेनुसार हे प्रशिक्षण पूर्ण करायचे आहे. प्रशिक्षण यशस्वी पूर्ण झाल्यानंतर शिक्षकांनी आपले वरिष्ठ व निवडश्रेणीचे प्रस्ताव शिक्षण विभागाकडे पाठविण्याचे आवाहन अनिल बोरनारे यांनी केले आहे.

शिक्षकांना शुभेच्छा दिल्या शुभेच्छा - शिक्षकांना वरिष्ठ व निवडश्रेणी मिळवून देण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रशिक्षणासाठी शासन दरबारी केलेल्या पाठपुराव्याबाबत माजी शिक्षणमंत्री व आमदार आशिष शेलार तसेच कोकण विभाग पदवीधर मतदार संघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी अनिल बोरनारे यांचे कौतुक केले आहे. तसेच, प्रशिक्षणासाठी शिक्षकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा - Sachin Vaze : सचिन वाझे माफीचा साक्षीदार; अनिल देशमुखांच्या अडचणी वाढणार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.