ETV Bharat / city

Maharashtra omicron update - राज्यात दिवसभरात ओमायक्रॉनचे 31, तर कोरोनाचे 1 हजार 648 रुग्ण आढळले

राज्यात कोरोना आणि ओमायक्रॉन रुग्ण संख्येत चढ उतार होताना दिसून येत आहेत. दिवसभरात कोरोनाचे 1648 तर, ओमायक्रॉन 31 नवे रुग्ण आढळून ( Maharashtra omicron update ) आले आहेत. ओमायक्रॉनचे सर्वाधिक 27 रुग्ण मुंबईत तर, उर्वरित 4 रुग्ण इतर भागात सापडले आहेत. यामुळे राज्यात ओमायक्रॉनची रुग्ण संख्या 141 झाली आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक
author img

By

Published : Dec 26, 2021, 9:36 PM IST

मुंबई - राज्यात कोरोना आणि ओमायक्रॉन रुग्ण संख्येत चढ उतार होताना दिसून येत आहेत. दिवसभरात कोरोनाचे 1648 तर, ओमायक्रॉन 31 नवे रुग्ण आढळून ( Maharashtra omicron update ) आले आहेत. ओमायक्रॉनचे सर्वाधिक 27 रुग्ण मुंबईत तर, उर्वरित 4 रुग्ण इतर भागात सापडले आहेत. यामुळे राज्यात ओमायक्रॉनची रुग्ण संख्या 141 झाली आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली.

हेही वाचा - Actress Suicide Case Mumbai : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे दोन तोतया अधिकारी अखेर मुंबई पोलिसांच्या जाळ्यात

9813 अॅक्टिव्ह रुग्ण

राज्यात रविवारी 918 नवीन कोरोना बाधित आढळून आलेत. कोरोनाग्रस्तांचा आकडा यामुळे 66 लाख 57 हजार 888 पर्यंत पोहचला आहे. आज दिवसभरात 17 रुग्णांचा मृत्यू झाला. आज 918 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा आकडा 65 लाख 2 हजार 957 वर पोहचला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 97.68 टक्के इतका आहे. तर, मृत्यूदर 2.12 टक्के आहे. रुग्ण शोधून काढण्यासाठी आजपर्यंत 6 कोटी 85 लाख 55 हजार 313 चाचण्या करण्यात आल्या आहेत. एकूण करण्यात आलेल्या चाचण्यांपैकी 9.73 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 89 हजार 251 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. 9 हजार 813 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

या विभागात सर्वाधिक रुग्ण -

मुंबई महापालिका - 896
ठाणे पालिका - 15
ठाणे मनपा - 67
नवी मुंबई पालिका - 66
कल्याण डोबिवली पालिका - 27
वसई विरार पालिका - 20
नाशिक - 18
नाशिक पालिका - 25
अहमदनगर - 46
अहमदनगर पालिका - 7
पुणे - 64
पुणे पालिका - 138
पिंपरी चिंचवड पालिका - 66

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातील अहवाल

राज्यात ओमायक्रॉनचा संसर्ग फैलावत आहे. राष्ट्रीय विज्ञान संस्थेने ओमायकॉनबाबत दिलेल्या अहवालानुसार, आज दिवसभरात ओमायक्रॉनचे 31 रुग्ण आढळून आले. यात मुंबईतील 27, पुण्यातील 2, पुणे ग्रामीण आणि अकोला भागातील प्रत्येकी 1 रुग्णाचा समावेश आहे. 17 पुरुष आणि 14 स्त्रियांचा यात समावेश आहे. 30 जणांनी आंतरराष्ट्रीय प्रवास केला आहे. तर, एक जण निकटवर्तीय आहे. यापैकी 22 जणांनी लसींचे दोन्ही डोस घेतले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांच्या निकटवर्तीयांचा आरोग्य विभागामार्फत शोध सुरू आहे, असे राज्य सार्वजनिक आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

आजपर्यंत 737 प्रवाशांची जनुकीय चाचणीसाठी नमुने

1 डिसेंबरपासून आजपर्यंत 1 लाख 77 हजार 913 प्रवासी मुंबईत उतरले. एकूण 33 हजार 717 प्रवाशांची आरटीपीआर चाचणी करण्यात आली. अति जोखमीच्या देशातील 153 आणि इतर देशातील 55 अशा एकूण 208 जणांची आरटीपीसीआर तर, आजपर्यंतच्या 737 प्रवाशांची जनुकीय चाचणी करण्यासाठी नमुने पाठवले आहेत. पैकी 126 नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे, असे राज्य सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.

हेही वाचा - New Traffic Rules : 'हे' 50 वाहतूक नियम मोडल्यास कोर्टाच्या चकरा माराव्या लागणार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.