ETV Bharat / city

Maharashtra Monsoon : राज्यात पावसानं दिली उघडीप; अरबी समुद्रात 'तुफान' वारे, हवामान विभागाचा मच्छिमारांना इशारा

राज्यात काही प्रमाणात पावसाचा (Maharashtra rain ) जोर कमी झाला आहे. हळूहळू पूरस्थिती नियंत्रणात येत आहे. त्यामुळं नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

author img

By

Published : Jul 17, 2022, 10:17 AM IST

Updated : Jul 17, 2022, 10:35 AM IST

Maharashtra Rains
Maharashtra Rains

मुंबई - गेल्या आठवडाभरात राज्यामध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावल्याचं बघायला मिळालं. या पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले होते. तर काही ठिकाणी नदी नाल्यांना पूर आल्याने शेतीचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. दरम्यान, कालपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळे काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती, त्या ठिकाणी पाणी हळूहळू कमी होत आहे. त्यामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळत आहे.

दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोकण, गोवा, कर्नाटक आणि उत्तर केरळ किनारपट्टीजवळ हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यात अनेक भागात पावसाने मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातल्याने नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. मराठवाडा आणि विदर्भात काही जिल्ह्यामध्ये पूर आल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच शेतीला देखील मोठा फटका बसला आहे. विदर्भात गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा या जिल्ह्यात गंभीर स्थिती झालीी आहे. तसेच मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली या भागात देखील पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्याचबरोबर मुंबई, ठाणे, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात काही जिल्ह्यात चांगला पाऊस पडत आहे.

बुलढाणा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी - बुलढाणा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी बरसल्या आहेत. इतर ठिकाणी कुठेही पाऊस झालेला नाही.

वर्धा जिल्ह्यात पावसाचा जोर कमी - गेल्या आठवडाभरापासून वर्धा जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे अनेक ठिकाणी नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणचे मार्ग ठप्प झाले आहेत. कालपासून पावसाने थोडीशी उघडीप दिल्याने पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे. मात्र, अनेक ठिकाणी पाणी साचले आहे.

कोल्हापुरात पुराचा धोका टळला - गेल्या आठवडाभर कोल्हापूर जिल्ह्यात आणि शहरात पावसाने धूमशान घातल्यावर पावसाचा जोर कमी होऊ लागला आहे. त्यामुळे सद्यस्थितीमध्ये पुराचा धोका टळला आहे. पंचगंगा नदी स्थिर पातळीवर राहिल्यानंतर आता पाण्याची पातळी कमी होऊ लागली आहे. दिलासादायक म्हणजे अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आला होता. अलमट्टीतून दीड लाख क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पुराचा जोर ओसरू लागला असला, तरी अजून जिल्ह्यामधील 61 बंधारे पाण्याखाली आहेत. त्यामुळे या मार्गावर वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली आहे. पावसाचा जोर असाच कमी राहिल्यास पाणी वेगाने कमी होण्याची शक्यता आहे.

गडचिरोलीतल सिरोंचामध्ये भितीदायक स्थिती - मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर देखील आले आहे. विदर्भात गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी भयावह स्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात तेलंगणाच्या टोकावर असलेल्या सिरोंचा येथे भयानक स्थिती झाली आहे. गेल्या 5 दिवसांपासून या शहराला चारही बाजूने पाण्याने वेढा दिला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिले आहेत.

मुंबईत मुसळधार पाऊस - ७ महिने पुरेल इतका पाणीसाठा जमा - जूनच्या अखेरीपासून मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात चांगला पाऊस पडत आहे. यामुळे गेल्या १२ ते १३ दिवसात ५० टक्के म्हणजेच अर्धी धरणे भरली आहेत.(Monsoon Update Mumbai) मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणामध्ये ५०.३२ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

अर्धी धरणे भरली - मुंबईत २९ जूनपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. २९ जूनला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार व तुळशी या ७ धरणांमध्ये १ लाख ४७ हजार ६ दशलक्ष लिटर म्हणजेच १०.१६ टक्के पाणीसाठा होता. मगंळवारी सकाळी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये ७,२८,२८६ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा जमा झाला आहे. धरणांमध्ये सध्या ५०.३२ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. समाधानकारक पाऊस झाल्याने १२ जुलैला ७ लाख २८ हजार २८६ दशलक्ष लिटर ५०.३२ टक्के पाणीसाठा जमा झाला. २९ जून ते १२ जुलै या दरम्यान ४०.१६ टक्के म्हणजेच ५,८१,२८० दशलक्ष लिटर पाण्याची वाढ झाली. सध्या धरणात १८९ दिवसांचा पाणी साठा आहे. मुंबईला ७ महिने पुरेल इतका पाणीसाठा जमा झाला आहे.

३८५० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा - मुंबईला वर्षाला १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. जून ते सप्टेंबर दरम्यान पडणाऱ्या पावसामुळे हा पाणीसाठा जमा होत होता. मात्र यंदा जून महिन्यात समाधान कारक पाऊस पडलेला नाही. यामुळे २७ जून रोजी १० टक्के पाणी कपात लागू करण्यात आली होती, ८ जुलैला धरणात २५ टक्के पाणी साठा जमा झाल्यावर पाणी कपात रद्द करण्यात आली आहे. धरणांतून दररोज ३८५० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा होतो. त्यामधील ठाणे, भिवंडी महानगरपालिकेला दररोज १५० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा करण्यात येतो. सध्या १० टक्के पाणी कपात असल्याने ३४६५ दशलक्ष लिटर पाणी पुरवठा केला जात आहे.

हेही वाचा - Maharashtra Political Crisis : एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार का ? दिपाली सय्यद यांचे संकेत

Last Updated : Jul 17, 2022, 10:35 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.