मुंबई - राज्य विधीमंडळाचे अवघ्या सहा दिवसांच्या पावसाळी अधिवेशनाचे Maharashtra Monsoon Session concludes आज सूप वाजले. पुढील हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये Winter Session 19 December Nagpur १९ डिसेंबरपासून सुरू होईल, असे दोन्ही सभागृहात जाहीर करण्यात आले. सहा दिवसांच्या Six day session अधिवेशनाच्या कामकाजात विधानसभेत एकूण तास ५७ तास २५ मिनिटांचे कामकाज झाले. विरोधकांनी सामंजस्य भूमिका घेतल्याने एक मिटिंग वाया गेला नाही. कनिष्ठ सभागृहातील सदस्यांनी रोज सरासरी ९ तास २५ मिनिटे राज्यातील प्रश्नांवर व त्या अनुषंगाने येणाऱ्या विषयांवर चर्चा केली. तब्बल ४८१५ तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आले. पैकी २५१ प्रश्न स्वीकारले तर २२ प्रश्नांना सभागृहात उत्तरे देण्यात आली. ८६२ लक्षवेधी मांडल्या. ९४ स्वीकारल्या असून ३७ लक्षवेधीना उत्तर देण्यात आली. १० शासकीय विधेयक आणि ४ शासकीय ठराव मांडून समंत केले. दरम्यान, जास्तीत जास्त ८७.१२ टक्के तर कमीत कमी ७०. ७ टक्के सदस्यांची उपस्थिती होती.
विधान परिषदेत सहा दिवसांच्या कालावधीत ६ बैठक झाले. प्रत्यक्षात ४२.३० तासांचे कामकाज झाले. मंत्री अनुपस्थित असल्याने ३० मिनिटांचे तर इतर कारणांमुळे तब्बल ५० तासांचे कामकाज होऊ शकले नाही. सभागृहात दररोज सरासरी ७ तास ५ मिनिटांचे कामकाज झाले. १३८२ तारांकित प्रश्न विचारण्यात आले. त्यापैकी ३६० प्रश्न स्वीकारले तर २९ प्रश्नांना तोंडी उत्तरे देण्यात आली. सभागृहात २९३ लक्षवेधी सूचना मांडण्यात आल्या. त्यापैकी १०७ मान्य करण्यात आल्या. तर २२ लक्षवेधींवर सभागृहात प्रत्यक्ष चर्चा झाली. ६३ औचित्याचे मुद्दे उपस्थित करण्यात आले. अल्पकालीन चर्चेसाठी ६ सूचना मांडण्यात आल्या. ४ शासकीय ठराव मंजूर केले. मात्र यावेळी विधेयके संमत केले नाही.
17 ऑगस्टपासून सुरू झालेल्या अधिवेशन काळात अतिवृष्टीमुळे शेतपिकांचे नुकसान, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर आणि शिंदे गटाच्या सुरत व्हाया गुवाहाटीचा मुद्दा गाजला. विविध भागात असलेला ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी आग्रही मागणी विरोधकांनी लावून धरली होती. अधिवेशन काळात सत्ताधारी शिंदे गट आणि महाविकास आघाडीच्या आमदारांमध्ये घोषणाबाजी वरून राडा झाला होता.
हेही वाचा - Shinde vs Thackeray होय मी विकासाचे कंत्राट घेतलंय, मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंवर जोरदार पलटवार