ETV Bharat / city

Maharashtra Minister Extramartial Affairs - विवाहबाह्य संबंधाच्या आरोपांमुळे महाराष्ट्रातील 'हे' नेते आले अडचणीत? - विजय शिवतारे विवाहबाह्य संबंध

भाजप नेते गणेश नाईक यांच्यावर विवाहबाह्य ( Ganesh Naik Case ) संबंध ठेवल्यामुळे अडचणी वाढल्या आहेत. मात्र, महाराष्ट्रातील अन्यही नेते विवाहबाह्य संबाधमुळे अडचणीत ( Maharashtra Minister Extramartial Affairs ) आले आहेत.

Maharashtra Minister Extramartial Affairs

author img

By

Published : Apr 21, 2022, 5:03 PM IST

मुंबई - भाजप नेते गणेश नाईक यांच्यावर विवाहबाह्य ( Ganesh Naik Case ) संबंध ठेवल्यामुळे अडचणी वाढल्या आहेत. एका महिलेने गणेश नाईक यांच्यावर बलात्काराचा आरोप लावला आहे. त्यानंतर गणेश नाईक यांचा पोलिसांकडून शोध सुरू झाला आहे. मात्र, केवळ गणेश नाईकच नाही तर, राज्यातले इतरही काही नेते विवाहबाह्य संबंधामुळे अडचणीत आले ( Maharashtra Minister Extramartial Affairs ) आहेत.

भाजपचे आमदार आणि माजी मंत्री गणेश नाईक सध्या फरार आहेत. गेल्या दोन दिवसांपासून गणेश नाईक यांचा पोलीस तपास करत आहे. नवी मुंबईतील घर, कार्यालयात पोलिसांनी त्यांचा कसून शोध घेतला आहे. मात्र, अटकेपासून संरक्षण मिळावे यासाठी गणेश नाईक सध्या भूमिगत झाले आहेत. विवाहबाह्य संबंधाचा आरोप एका महिलेकडून गणेश नाईक यांच्यावर लावण्यात आला आहे.

महिला आयोगाने घेतली दखल - नवी मुंबईतील दीपा चौहान या महिलेने गणेश नाईक आणि आपण गेली सत्तावीस वर्षे 'लिव्ह इन रिलेशन' मध्ये राहत असल्याचा दावा केला आहे. गणेश नाईक यांच्यापासून आपल्याला पंधरा वर्षाचा एक मुलगा असून, त्याला त्याचे हक्क मिळावे म्हणून आपण पोलिसांत तक्रार केली असल्याचे दीपा म्हणत आहेत. आपल्या नात्याबाबत कोठेही खुलासा करू नये, अशी धमकी गेल्या अनेक वर्षांपासून गणेश नाईक आपल्याला देत होते. दीपा यांनी लावलेल्या आरोपानंतर महिला आयोगाने या सर्व प्रकरणाची गंभीर दखल घेत गणेश नाईकांविरोधात तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. महिला आयोगाच्या आदेशानंतर गणेश नाईकांचा शोध पोलिसांकडून सुरू झाला आहे.

गणेश नाईक गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रात सक्रिय राजकारणी म्हणून ओळखले जातात. नवी मुंबई महानगरपालिकेवर त्यांचा वचक आहे. मात्र, विवाहबाह्य संबंधाच्या झालेल्या आरोपांमुळे गणेश नाईक यांची राजकीय आणि सामाजिक कोंडी झाली आहे. विवाहबाह्य संबंधामुळे केवळ गणेश नाईक हेच नाही, तर आतापर्यंत महाराष्ट्राच्या अनेक नेत्यांवर याबाबतचे आरोप झाले आहेत. या आरोपांमुळे अनेक नेत्यांची राजकीय कारकीर्द रसातळाला गेलेली महाराष्ट्राने पाहिली आहे.

धनंजय मुंडे - राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनीही करुणा शर्मा यांच्यासोबत आपले संबंध असल्याचे कबूल केले होते. करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांना दोन अपत्य ही आहेत. करुणा शर्मा यांनीही धनंजय मुंडेवर मानसिक त्रास देणे आणि मारहाण करण्याचे आरोप लावले होते. तसेच, करुणा शर्मा यांची बहीण रेणू शर्मा यांच्याकडून बलात्काराच्या आरोप लावण्यात आले होते. मात्र, रेणू शर्मा यांनी नंतर ही तक्रार मागे घेतल्याने धनंजय मुंडे यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. पण, आपल्या विवाहबाह्य संबंधांमुळे धनंजय मुंडे हे राजकीय अडचणीत आले ( Dhananjay Munde And Karuna Sharma Case ) होते.

माजी मंत्री संजय राठोड - तत्कालीन वन मंत्री संजय राठोडांना टिकटॉक स्टार पूजा चव्हाणच्या आत्महत्येमुळे राजीनामा द्यावा लागला. पूजाच्या आत्महत्येनंतर माध्यमांत फोन वरील संभाषणाच्या काही ऑडीओ क्लिप व्हायरल झाल्या. त्यातील आवाज हा पूजा आणि संजय राठोड यांचा असल्याचे बोलले गेले. यातील एका ऑडिओ क्लिपमुळे 'गबरुशेठ' हे नाव चर्चेत आले. पूजा चव्हाण हिची आत्महत्या नसून संजय राठोड यांनीच हत्या घडवली असल्याचा आरोप सातत्याने भाजपकडून करण्यात आला होता. सरकारवर याबाबतीत वाढत्या दबावामुळे शेवटी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना संजय राठोडांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा लागला होता. पण, पूजा चव्हाण यांच्या बाबतीत संजय राठोड यांच्यावर लावलेले आरोप अद्यापही सिद्ध झालेले ( Sanjay Rathod Puja Chavan Case ) नाहीत.

माजी मंत्री विजय शिवतारे - शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांच्यावरही त्यांच्या पत्नी मंदाकिनी शिवतारे यांनी अन्य महिलांशी संबंध असल्याचा आरोप केला होता. 27 वर्ष विजय शिवतारे आणि आपण सोबत राहत नाही. मात्र. या 27 वर्षांमध्ये काही महिलांसोबत विजय शिवतारे यांचे संबंध होते. 2021 मध्ये गंभीर आजारामुळे विजय शिवतारे हे रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. त्यावेळेसही हा वाद चव्हाट्यावर आला ( Vijay Shivtare Extramartial Affairs ) होता.

हेही वाचा - Hanuman Chalisa Book Sales : ठाण्यात हनुमान चालीसा पुस्तकांच्या मागणीत वाढ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.