वंचित नाही, ही तर किंचित बहुजन आघाडी
पुणे - राज्यात तयार झालेली वंचित आघाडी ही किंचित आघाडी आहे, अशी बोचरी टीका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. ते पुण्यात बोलत होते. सविस्तर वाचा..
कोल्हापुरातील 'या' ६० गावांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार..?
कोल्हापूर - जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचे प्रमाण पाहता येथे ओला दुष्काळ जाहीर करावा लागतो. एकीकडे संपूर्ण महाराष्ट्रात पाणीदार जिल्हा अशी कोल्हापूर जिल्ह्याची ओळख असताना, याच जिल्ह्यात पाण्यासाठी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात आला आहे. वाचा सविस्तर..
चंद्रावर बोलून बस्स झाले आता लातूरच्या विकासाबद्दल बोला...
लातूर - येणार...येणार म्हणून सभेच्या निर्धारित वेळेच्या केवळ १० मिनिट अगोदर राज्यस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांचे लातूर येथील सभास्थळी आगमन झाले. मात्र, दरम्यान व्यासपीठावर भाषण करत असलेल्या माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांची चांगलीच गोची झाली. वाचा सविस्तर..
मतदान करा अन् तर्री पोहा व आलू बोंड्यावर ५० टक्के सूट मिळवा...
नागपूर - मतदान करणे हे प्रत्येक सुज्ञ नागरिकाचे कर्तव्य आहे. मात्र, निवडणूक आयोगाच्या अथक प्रयत्नानंतरही मतदानाची टक्केवारी वाढत नाही. मतदानाची टक्केवारी वाढवण्याकरिता निवडणूक आयोगाबरोबर अनेक सामाजिक संघटना आणि संस्था जनजागृती मोहिम राबवतात. याच प्रयत्नांना हातभार लागावा या उद्देशाने नागपुरातील तर्री पोहे विकणाऱ्या काकांनी मतदान करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ५० टक्के सूट देणार असल्याची योजना सुरू केली आहे. वाचा सविस्तर..
माण-खटावच्या काँग्रेस आमदाराचा राष्ट्रवादीला दणका
सातारा - माण-खटावचे आमदार तसेच भाजप-सेनेचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर व राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय शिंदे यांच्या निवडीच्या आधी अनेक ठिकाणी गुप्त बैठका झाल्या होत्या. त्यामुळे, अनेक दिग्गजांची तिकिटे कापली गेली. आज मात्र या दोस्ती गटात असणारे दोस्त एक-मेकांच्या विरोधात उभे राहिले आहेत. ज्यामुळे कोण कोणात्या पक्षाचे काम करते हे सांगणे अवघड झाले आहे. असाच काहीसा प्रकार मंगळवारी माण खटाव तालुक्यात घडला आहे. वाचा सविस्तर..
अनामत रक्कमेसाठी उमेदवाराने आणली १० हजारांची चिल्लर
नाशिक - नाशिक लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारी करू इच्छिणाऱ्या शिवाजी वाघ उमेदवाराने अनामत रक्कम भरण्यासाठी चक्क १० हजार रुपयाची चिल्लर आणली. परंतु, प्रशासनाने मुदतीत नाणी मोजून देण्याचे फर्मान सोडल्याने उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांची धावपळ उडाली. वाचा सविस्तर..
मोदींसारखे खालच्या पातळीवर प्रचार करणारे पंतप्रधान यापूर्वी पाहिले नाहीत...
रत्नागिरी - मला सरकारची कीव येते, की पाच वर्ष सत्तेत राहून त्यांना विरोधी पक्षातील उमेदवारांना उभे करण्याची वेळ आली आहे. आमच्या शक्ती स्थळावर मोदी आणि भाजपकडून हल्ला करण्याचे काम केले जात आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडून येणार नाहीत, याची काळजी घेणे हे भाजपचे समोर मोठे आव्हान आहे. मोदींच्या चार सभा झाल्या चारही वेळा त्यांनी पवार साहेबांवर टीका केली. मात्र, पवारांवर टीका करणे एका पंतप्रधानांना शोभत नसल्याचा टोलाही राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला आहे. वाचा सविस्तर..
राज ठाकरेंच्या 'त्या' सभेची दखल मुख्यमंत्र्यांनाही घ्यावी लागली
पुणे - गुढीपाडव्याच्या दिवशी राज ठाकरेंची शिवाजीपार्कवर जी सभा झाली, त्याची नोंद सत्ताधाऱ्यांनाही घ्यावी लागली. राज्याचे प्रमुख देवेंद्र फडणवीस, क्रीडामंत्री विनोद तावडे यांनीही त्यावर टीका केली. एखाद्या गोष्टीची दखल सरकारमधील प्रमुखाला घ्यावीशी वाटली, तरच त्याला प्रत्युत्तर मिळते. त्यामुळे शिवाजीपार्कवर झालेल्या राज ठाकरेंच्या बहुचर्चित सभेची दखल मुख्यमंत्र्यांनाही घ्यावी लागली, असे मत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. वाचा सविस्तर..
टी.व्ही. मालिकांमधून प्रचार करणाऱ्या निर्मात्यांना निवडणूक आयोगाची नोटीस
मुंबई - दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील मालिकांमधून विविध सरकारी योजनांचा प्रचार केल्याच्या तक्रारीची दखल आता राज्य निवडणूक आयोगाने घेतली आहे. यासोबतच असा प्रचार करणाऱ्या झी टीव्ही आणि अँड टीव्हीवरील मालिकांच्या निर्मात्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली. वाचा सविस्तर..
उन्हाने 'निवडणुकीच्या ज्वरा'त भर
मुंबई - उमेदवारांचा प्रचार आणि राजकीय नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपाने लोकसभा निवडणुकीचा ज्वर चांगलाच वाढला आहे. अशातच तापमानाचा पारा वाढत असल्याने एकूण मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाने दीड तासाने मतदानाची वेळ वाढविली आहे. त्यामुळे मतदारांना सकाळी सात ते संध्याकाळी सहा या कालावधीत मतदान करता येणार आहे. वाचा सविस्तर..
गडचिरोलीत हाय अलर्ट
गडचिरोली - अतिसंवेदनशील व नक्षलग्रस्त असलेल्या गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ११ एप्रिल रोजी मतदान होत आहे. मंगळवारी (ता. ९) छत्तीसगड राज्यात घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीत हाय अलर्ट जारी करण्यात आले आहे. निवडणुकीसाठी गडचिरोली जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून पोलिंग पार्ट्या हेलिकॉप्टर, खासगी वाहने, बसगाड्याद्वारे मतदान केंद्रावर पोचवण्यात आल्या आहेत. वाचा सविस्तर..
मुंबईत १५६ उमेदवारी अर्ज दाखल
मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र सादर करण्याच्या शेवटच्या दिवशी (९ एप्रिल) मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यातील ६ लोकसभा मतदारसंघांतून एकूण ९३ उमेदवारांनी आपली नामनिर्देशन पत्रे सादर केली. यानुसार या ६ मतदारसंघांसाठी एकूण १५६ उमेदवारी अर्ज निवडणूक विभागाकडे दाखल झाले आहेत. प्राप्त झालेल्या नामनिर्देशन पत्रांची छाननी आज (१० एप्रिल) करण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्याच्या प्रसिद्धी माध्यम कक्षाद्वारे देण्यात आली आहे. वाचा सविस्तर..
विकासाचा मुद्दा नसल्याने भाजप भयभीत
लातूर - भाजपकडे विकासाचा मुद्दा नाही. त्यामुळे देशाच्या सीमेवर लढत असलेल्या सैनिकांना पुढे करुन ते मतदारांसमोर जात आहेत. सर्वोच्च न्यायालयाने सैनिकांचा आणि धर्माचा मुद्दा घेऊन मतदारांसमोर जाऊ नका असे ठणकावले असतानाही भाजप याचा भावनिक मुद्दा करीत आहे. विकासाचा मुद्दा नसलेली भाजपा भयभीत झाली असल्यानेच अशी पळवाट शोधत आहे. मात्र, मतदार जागृत झाला असून त्यांना या निवडणुकीत जागा दाखवून देईल असा विश्वास राज्यस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी व्यक्त केला. वाचा सविस्तर..