ETV Bharat / city

Maharashtra Live Breaking News : यासिन मलिकला जन्मठेप; पटियाला न्यायालयाचा निर्णय - २५ मे ठळक घडामोडी

Maharashtra Live Breaking News
Maharashtra Live Breaking News
author img

By

Published : May 25, 2022, 7:37 AM IST

Updated : May 25, 2022, 6:24 PM IST

18:20 May 25

यासिन मलिकला जन्मठेप; पटियाला न्यायालयाचा निर्णय

टेरर फंडिग प्रकरणात दिल्लीच्या पटियाला न्यायालयाने यासिन मलिकला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. आज सायंकाळी 6.20 वाजता न्यायालयाने हा निकाल दिला आहे.

17:19 May 25

ओझरजवळ दोन कारचा भीषण अपघात; 1 ठार, 5 जखमी

नाशिक - ओझरजवळ राष्ट्रीय महामार्गावर दहावा मैल इथे दोन कारचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये 1 जणांचा मृत्यू झाला असून 5 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. ओझरजवळ राष्ट्रीय महामार्गावर दहावा मैल इथे स्विफ्ट डिझायर आणि इनोव्हा कार यांच्यात आज दुपारी 3 वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. नाशिकच्या दिशेने जात असलेल्या स्विफ्ट कारचे टायर फुटून हा अपघात घडला.

15:37 May 25

आमदार अबू आझमी प्रकरणात स्वाती मालीवाल यांचा जबाब नोंदवला

महिलांविरोधात वादग्रस्त विधाने केल्याप्रकरणी २०१७ मध्ये महाराष्ट्रातील समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी, दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी आज बोरिवली कोर्टात आपले स्टेटमेंट नोंदवले. या प्रकरणात न्यायालय पुढील सुनावणी १८ जून रोजी करणार आहे.

महाराष्ट्रातील समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी २०१७मध्ये एका घटनेवर वादग्रस्त विधान केले होते, ज्यावरून वादंग उठले होते. या प्रकरणात दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनीही त्यांच्याबद्दल संताप व्यक्त केला होता आणि तक्रार केली होती. स्वाती मालीवाल याचा जबाब आज बोरिवली न्यायालयात नोंदवण्यात आला.

14:52 May 25

भाजपचा मोर्चा चिरडला; कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड

मुंबई - ओबीसी आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ भाजपच्यावतीने मंत्रालयावर धडक देण्यात येणार होती. मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांची धरपकड केली. त्यामुळे संतप्त झालेल्या भाजप कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवला.

13:32 May 25

इम्पिरीकल डेटा म्हणजे काय ते मुख्यमंत्र्यांनी सांगावे, चंद्रकांत पाटील यांचे आव्हान

मुंबई - माझं जाहीर आव्हान आहे की उद्धव ठाकरे यांनी इम्परीकल डेटा म्हणजे काय हे सांगावे, असे आव्हान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे. तसेच त्यांनी दावा केला की, जो स्वतंत्र आयोग नेमला आहे, त्यांना यातील काहीच कळत नाही.

13:28 May 25

बेकायदा बांधकाम प्रकरणी राणा दाम्पत्याला कोर्टाचा दिलासा

मुंबई - खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना दिंडोशी न्यायालयाने दिलासा दिला आहे. बीएमसीची नोटीस बजावल्यानंतर आता राणा दाम्पत्य आपले बेकायदा बांधकाम लवकरच नियमित करणार आहेत. दिंडोशी न्यायालयाने त्यांना एक महिन्याची मुदत दिली आहे. राणा दाम्पत्यांना हा मोठा दिलासा मानला जात आहे.

11:04 May 25

अभिनेता पुष्कर जोग याची आई सुरेखा जोग यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल

पुणे - पुण्यात ११ बनावट शाळांकडून विद्यार्थ्यांसह शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी सुप्रसिद्ध मराठी अभिनेता पुष्कर जोग याची आई आणि जोग एज्युकेशन ट्रस्टच्या संचालिका सुरेखा जोग यांच्यावर गुन्हा दाखल. जोग यांच्यासह पुणे जिल्हा परिषदेच्या तीन अधिकाऱ्यावर बंडगार्डन पोलीस स्थानकात फसवणुकीचा गुन्हा दाखल. जोग एज्युकेशनच्या अकरा शाळांसाठी शिक्षण अधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या करून स्व मान्यता प्रमाणपत्र तयार करून कोट्यवधी रुपयांची शासनाची फसवणूक. जिल्हा परिषदेच्या आणखी काही बड्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होण्याची शक्यता.

10:15 May 25

शिवसेना नेते यशवंत जाधव यांची होणार फेमा उल्लंघन प्रकरणी चौकशी

मुंबई - अंमलबजावणी संचालनालयाने शिवसेना नेते यशवंत जाधव यांना फेमा नियमांचे कथित उल्लंघन केल्याप्रकरणी चौकशीसाठी बोलावले आहे. आर्थिक गुप्तचर संस्थेने ही माहिती दिली आहे.

08:16 May 25

माहीम रेल्वे ट्रॅकजवळ गोणीत आढळला महिलेचा मृतदेह

मुंबई - माहीम रेल्वे ट्रॅकजवळ गोणीत रात्री महिलेचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणातील आरोपीला रेल्वे जीआरपीने गोरेगाव येथून अटक केली आहे. आरोपी हा महिलेचा मित्र होता. दोघांमध्ये वादावादी झाली. त्यानंतर आरोपीने महिलेची हत्या केली आणि पोत्यामध्ये घालून माहीम ट्रॅकजवळ फेकून दिले. महिलेचे वय 25-30 वर्षे असल्याचे सांगण्यात आले. रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिला मुंबईतील दिंडोशी भागातील रहिवासी आहे. आरोपीला आज न्यायालयात हजर करणार आहेत.

07:32 May 25

Maharashtra Live Breaking News_25 May 2022 कोल्हापूरचे संजय पवार राज्यसभेच्या रिंगणात

कोल्हापूर - शिवसेनेने आपल्या भूमिकेवर ठाम राहत कोल्हापूरचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्याला राज्यसभेसाठी दिलेल्या या उमेदवारीनंतर अनेक कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

Last Updated : May 25, 2022, 6:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.