ETV Bharat / city

Maharashtra Live Breaking News; मला शिवसेनेला विचारायचे आहे की त्यांनी तरुणांना किती नोकऱ्या दिल्या - नारायण राणे - फडणविसांनी केली महाविकास आघाडीची तुलना बाबरीबरोबर

Maharashtra Live Breaking News
Maharashtra Live Breaking News
author img

By

Published : May 16, 2022, 6:53 AM IST

Updated : May 16, 2022, 6:27 PM IST

18:23 May 16

मला शिवसेनेला विचारायचे आहे की त्यांनी तरुणांना किती नोकऱ्या दिल्या - नारायण राणे

मला शिवसेनेला विचारायचे आहे की त्यांनी तरुणांना किती नोकऱ्या दिल्या, शेतकऱ्यांसाठी काय केले...भाजपने कधीच लोकांच्या हातात दगड दिला नाही...आज बाळासाहेब ठाकरे हयात असते तर त्यांनी तुम्हाला कधीच मुख्यमंत्री बनवले नसते अशा शब्दात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

17:32 May 16

पुण्यात स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीची महागाई विरोधात आंदोलन

आज केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा पुण्यातील जे डब्ल्यु मॅरेट येथे कार्यक्रम सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने हॉटेलच्या बाहेर महागाईच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले. पोलिसांनी आंदोलक कार्यकर्त्याना पकडण्यास सुरवात केली तेव्हा आंदोलक आक्रमक झाले आणि थेट स्मृती इराणी यांचा कार्यक्रम स्थळा पर्यंत पोचले. आदोलकांनी तेथेही घोषणाबाजी केली.

16:31 May 16

औरंगाबाद नंतर राज ठाकरे यांची पुण्यात होणार सभा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची ठाणे, औरंगाबाद येथे सभा झाल्या आणि गाजल्या आता ते या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पुण्यात सभा घेणार आहेत. तशी तयारी देखील पुण्यातील मनसैनिकांनी सुरू केली आहे

15:11 May 16

केतकी चितळे ला घेऊन ठाणे गुन्हे शाखा नवी मुंबईला रवाना

राष्ट्रवादी चे अध्यक्ष शरद पवार यांच्या बद्दल अपमानास्पद पोस्ट टाकल्याप्रकरणी ठाणे गुन्हे शाखेने अटक केलेली मराठी अभिनेत्री केतकी चितळेला घेऊन ठाणे गुन्हे शाखा केतकी राहत असलेल्या नवी मुंबईतील कळंबोली येथील घराच्या दिशेने रवाना झाले आहेत.

14:59 May 16

आर्थर रोड तुरुंगात १९ वर्षीय कैद्याची २० वर्षीय कैद्यावर जबरदस्ती

  • An incident of unnatural sex has come to light from Arthur Road jail wherein a 19-yr-old inmate forced himself on a 20-yr-old inmate. NM Joshi Marg Police registered a case u/s 377 (unnatural offences), 323 (voluntarily causing hurt) & 506 (criminal intimidation): Mumbai Police

    — ANI (@ANI) May 16, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

आर्थर रोड तुरुंगात १९ वर्षीय कैद्याने २० वर्षीय कैद्यावर जबरदस्ती करत अनैसर्गिक सेक्स केल्याची घटना उघडकीस आली आहे. एनएम जोशी मार्ग पोलिसांनी या प्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

14:51 May 16

४३० किलो भेसळयुक्त चहा पावडर जप्त दोघांना अटक

मुंबई गुन्हे शाखेने शिवडी परिसरातून दोघांना अटक करून त्यांच्या ताब्यातून ४३० किलो भेसळयुक्त चहा पावडर जप्त केली आहे. हा प्रकार करणाऱ्या टोळीचा आणि त्यांनी वीज कोठून पुरवठा केला, याचा पोलिस तपास सुरू आहे.

13:01 May 16

पवारांविरोधात वादग्रस्त सोशल मीडिया पोस्ट प्रकरणी केतकी चितळेची चौकशी सुरू

ठाणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी केतकी चितळेची ठाणे नगर पोलिस कस्टडीमध्ये चौकशी सुरू. ठाणे गुन्हे शाखा युनिट 1 च्या वतीने केतकी चितळे हिची करण्यात येत आहे. ठाणे सायबर सेलदेखील पोस्टबाबत तांत्रिकरित्या चौकशी करत आहे. राजकीय किंवा दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा केतकीचा उद्धेश होता का, याबाबत देखील कसून चौकशी गुन्हे शाखा करणार आहे.

12:49 May 16

त्रिपुरामध्ये ११ आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

आगरतला - त्रिपुरा मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला आहे. त्रिपुरामध्ये ११ नवीन मंत्र्यांना शपथ देण्यात आली. एका शानदार सोहळ्यात हा शपथविधी झाला.

10:27 May 16

शरद पवार यांच्या विरोधात सोशल मीडियावरील पोस्टवरून अदखलपात्र गुन्हा दाखल

पुणे - भाजप नेते विनायक आंबेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या विरोधात सोशल मीडियावर केलेल्या पोस्टवरून राष्ट्रवादीच्या चार कार्यकर्त्यांवर अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. या कार्यकर्त्यांनी आंबेकर यांच्या कानशिलात लगावली होती.

07:46 May 16

कराडमध्ये घरफोडी, साडेबारा लाखांचा दागिन्यांसह ऐवज लंपास

कराड (सातारा) - कुटुंबीय सुट्टीनिमित्त परगावी गेल्याचे हेरून चोरट्यांनी बंद बंगल्यात घुसून धाडसी चोरी केल्याचा प्रकार कराडमधील बनपुरी कॉलनीतून समोर आला आहे. या घटनेत 2 लाखाचे हिरे, 20 तोळ्याचे सोन्या-चांदीचे दागिने आणि 50 हजाराची रोकड, असा साडेबारा लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. या धाडसी घरफोडीमुळे पोलीस खाते चक्रावून गेले आहे. घरफोडीची माहिती मिळताच कराड शहर पोलिसांनी ठसे तज्ज्ञ, श्वान पथकास पाचारण केले. पोलीस अधीक्षकांनी देखील तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी वृषाली पाटील यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

06:47 May 16

Maharashtra Live Breaking News; फडणविसांनी केली महाविकास आघाडीची तुलना बाबरीबरोबर

मुंबई - महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी महाविकास आघाडी (MVA) सरकारची तुलना बाबरीसारख्या रचनेशी केली. जोपर्यंत राज्यातील अशी रचना पाडत नाही तोपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही, असे सांगितले. तुमच्या सत्तेची बाबरीसारखी रचना पाडल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असे फडणवीस म्हणाले. मुंबईतील पक्षाच्या महासंकल्प सभेत त्यांनी इतर भारतीय जनता पक्षासह (BJP) हनुमान चालिसाचा जप केला.

Last Updated : May 16, 2022, 6:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.