मुंबई : महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष (speaker of Maharashtra Legislative Assembly) राहुल नार्वेकर यांनी 'हर घर तिरंगा' (Har Ghar Tiranga) अभियानामध्ये सहभाग घेतलेला आहे. मुंबईतील जनतेसोबत त्यांनी या अभियानामध्ये (Rahul Narvekar is involved in the campaign) सहभागी होऊन; जनतेचा उत्साह वाढवला. तसेच तिरंग्याला अभिवादन करत, त्यांनी जनतेसोबत संवादही साधला.
महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज मुंबईत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव यानिमित्ताने, 'हर घर तिरंगा' अभियान मध्ये सहभागी झाले. देशभरात 'हर घर तिरंगा' अभियान राबवले जात आहे. तिरंग्याला अभिवादन करणे, तिरंगा सोबत स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाच्या आठवणी जाग्या करणे, पुढील पिढीला स्वातंत्र्या संदर्भात माहिती देणे. तसेच ज्या उद्देशाने स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय आणि अभिव्यक्ती मिळावी. यासाठी लाखो स्वातंत्र्यसैनिक आणि क्रांतिकारक यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांनी मिळवलेल्या स्वातंत्र्याला 75 वर्षे होत आहे. त्यानिमित्ताने केंद्र सरकारने 'हर घर तिरंगा' अभियान ही मोहीम सुरू केलेली आहे. या मोहिमेमध्ये विविध शिक्षण संस्था, राजकीय पक्ष, सामाजिक संस्था संघटना देखील सहभागी झाल्या आहेत.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर देखील आज या 'हर घर तिरंगा' मोहिमेत मुंबईत सहभागी झाले. या संदर्भातला त्यांनी आपला व्हिडिओ त्यांच्या ट्विटर खात्यावर टाकत माहिती दिली आहे .तसेच ईटीव्ही भारत सोबत संवाद साधतांना त्यांनी सांगितले की, 'देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे होत आहेत. लाखो स्वातंत्र्य सैनिक तसेच क्रांतिकारक लोकांनी देशासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. स्वातंत्र्य, समता, बंधुता मिळण्यासाठी त्यांनी लढा दिला. त्यांची आठवण ठेवत सर्व जनतेने यात सहभागी व्हावे, असे आवाहन देखील त्यांनी केले.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या निमित्ताने : खादीचा तिरंगा, खादीचे कपडे, गांधी टोपी, तसेच ब्रिटिश साम्राज्यशाही विरोधात लढताना ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिले. त्यांच्या स्मृतीना उजाळा दिला जातो. स्वातंत्र्य आंदोलनातून ज्या इच्छा आणि आकांक्षा पुढे आल्या, त्याचे प्रतिबिंब भारतीय राज्यघटनेत आहे. त्या संदर्भात देखील घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर, पंडित नेहरू, भगतसिंग यांचे विशेष स्मरण केले जाते.
हेही वाचा : Har Ghar Tiranga : सोलापुरात भारतीय तिरंग्यांसह देशविदेशातील झेंडेही बनतात; मोठ्या प्रमाणात मागणी