ETV Bharat / city

परमबीर सिंह अडचणीत; खुली चौकशी करण्यास एसीबीला गृह विभागाची परवानगी - पोलीस निरिक्षक अनुप डांगे

गावदेवी येथील डर्टी बन्स पब रात्री उशीरापर्यंत सूरू होते. तो बंद करण्यासाठी 23 नोव्हेंबर 2019 ला गावदेवी पोलीस तेथे गेले. त्यावेळी तेथे दोन गटांमध्ये मारहाणी सुरू हाती. याप्रकरणी प्रसिद्ध हिरे व्यापारी व निर्माता भरत शहाचा नातू यश, याचे दोन मित्र व तीन विरोधक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

परमबीर सिंह अडचणीत
परमबीर सिंह अडचणीत
author img

By

Published : Jul 15, 2021, 12:32 PM IST

मुंबई - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात खुल्या चौकशीला गृहविभागाने एसीबीला परवानगी दिली आहे. त्यामुळे सिंह यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. पोलीस निरिक्षक अनुप डांगे यांच्या तक्रारीप्रकरणी लाचलुचपत प्रबंधक विभागास (एसीबी) सिंह यांची खुली चौकशी करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

प्रथम बदली , नंतर निलंबन

गावदेवी येथील डर्टी बन्स पब रात्री उशीरापर्यंत सूरू होते. तो बंद करण्यासाठी 23 नोव्हेंबर 2019 ला गावदेवी पोलीस तेथे गेले. त्यावेळी तेथे दोन गटांमध्ये मारहाणी सुरू हाती. याप्रकरणी प्रसिद्ध हिरे व्यापारी व निर्माता भरत शहाचा नातू यश, याचे दोन मित्र व तीन विरोधक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस नाईक संतोष पवार यांना मारहाण झाली, गणवेशही फाटला होता. याप्रकरणात जीतू नवलानीचे नाव आरोपी म्हणून घेण्यात आले.

या घटनेनंतर तत्कालीन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस महासंचालक असलेल्या परमबीर सिंग यांनी याप्रकरणी कोणताही संबंध नसतानाही त्यांना एसीबी कार्यालयात बोलावले होते, असा आरोप डांगे यांच्या लेखी तक्रारीत केला आहे. तसेच फेब्रुवारी, 2020 मध्ये परमबीर सिंग मुंबई पोलीस आयुक्त झाल्यानंतर त्यांनी जीतू नवलानी याच्या सांगण्यावरून डांगे यांची नियंत्रण कक्षात बदली केली व त्यानंतर त्यांचे निलंबन करण्यात आले, असा आरोप पत्रातून केला आहे.

धागेदोरे समोर येणार

परमबीर सिंग यांचे पब मालकाशी असलेले संबंध, दबाव आणि भष्टाचार केल्याप्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी डांगे यांनी फेब्रुवारी महिन्यात गृहविभागाला पत्र लिहून केली होती. तसेच एसीबीनेही केलेल्या तपासात काही तथ्य आढळून आल्याने गृह विभागाकडे खुल्या चौकशीची मागणी केली. आता गृहविभागाने चौकशीला परवानगी दिल्याने परमबीर सिंह यांच्यातील अनेक धागेदोरे समोर येणार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.