ETV Bharat / city

New Traffic Rules : 'हे' 50 वाहतूक नियम मोडल्यास कोर्टाच्या चकरा माराव्या लागणार - Drunk and drive

केंद्र सरकारने रस्ते अपघात कमी करण्यासाठी नव्या वाहतूक नियमांची ( New Traffic Rules in India 2021 ) अंमलबजावणी केली होती. महाराष्ट्रात हे नवे नियम लागू करण्यात येणार आहे. त्यानूसार 50 नियमांसाठी वाहन चालकांना कोर्टाच्या फेऱ्या माराव्या लागणार आहे.

नवे वाहतूक नियम
नवे वाहतूक नियम
author img

By

Published : Dec 26, 2021, 7:25 PM IST

मुंबई - भारतात रस्ते अपघातांचं प्रमाण जास्त आहे. वाहन चालवताना वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन, ओव्हरस्पीड अशा अनेक कारणांनी लोकांना प्राण गमवावे लागतात. रस्ते अपघात कमी करण्यासाठी केंद्र सरकारने नव्या वाहतूक नियमांची अंमलबजावणी केली ( New Traffic Rules in India 2021 ) होती. ते आता महाराष्ट्रातही लागू ( Maharashtra New Traffic Rules ) झाले आहेत. यापूर्वी ज्या 50 नियमांसाठी पोलिस दंड आकारायचे, त्यासाठी आता वाहन चालकांना कोर्टाच्या फेऱ्या माराव्या लागणार आहे. तसेच, याबाबतचा दंड आकारण्याचा अधिकार पोलिसांना नसून, कोर्टात दोषी ठरणाऱ्या चालकांना दंड किंवा कैद किंवा दोन्हीही शिक्षा सुनावल्या जाऊ शकतात. या नवीन नियमांचा आढावा घेणारा 'ई-टीव्ही' भारताचा हा विशेष रिपोर्ट.

अल्पवयीन मुलाने गुन्हा केल्यास पालकाला शिक्षा ...

राज्य सरकारने 1 डिसेंबर पासून लागू केलेल्या या नवीन नियामावलीनूसार वाहन चालकाला आता कमीत कमी 500 रुपये तर जास्तीत जास्त १० हजार रुपये दंड आणि किमान ६ महिने व कमाल १ वर्षांची कैद सुनावली जाऊ शकते. अल्पवयीन मुला-मुलीने वाहन चालवून गुन्हा केल्यास मालक व पालकाला तीन वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागणार आहे. तर, सिग्नल जंपिंग सारख्या पहिल्याच चुकीसाठी थेट न्यायालयात जावावे लागणार आहे.

...तर तीन महिन्यांसाठी लायसन्सचे निलंबन

विनाहेल्मेट वाहन चालवल्यास ( Without Helmet Bike Drive ) पहिल्या चुकीसाठी, ट्रिपल सीट प्रवास करणे, दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहनासाठी मंजुर वजन क्षमतेहून अधिक मालाची वाहतूक करणे, दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी माल वाहतूक वाहनांमधून धोकादायक प्रकारे मालाची वाहतूक करणे. त्याचसोबत, घाटात दुचाकी, तीनचाकी किंवा चारचाकी वाहनांचे गिअर न्युट्रल करून वाहन चालवणे यासारख्या नियमांचे उल्लंघन केल्यास तीन महिन्यांसाठी लायसन्सचे निलंबन केले जाणार आहे.

'या' कारणांसाठी वाहनमालकांना माराव्या लागतील न्यायालयाच्या चकरा

नव्या नियमांत रेड सिग्नल जंपिंग, स्टॉप साईनचे उल्लंघन, वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे, नो पार्किंग, बोगद्यात, बस मार्गिकेत वाहन उभे करणे, डाव्या बाजूने ओव्हरटेकिंग करणे, लेन कटींग,चुकीच्या दिशेने वाहन चालविणे, ओव्हरटेक करताना अडथळा निर्माण करणे, रॅश ड्रायव्हिंग करणे, डबल पार्किंग, मद्य पिऊन वाहन चालवणे (ड्रंक अँड ड्राईव्ह), पदपथ, झेब्रा क्रॉसिंग आणि सायकल ट्रॅकवर वाहन पार्क करणे, ५० किमी वेग मर्यादा असलेल्या मार्गावर वाहन उभे करणे, बस स्टॉप, रुग्णालयाचे प्रवेशद्वार, शैक्षणिक संस्थांचे प्रवेशद्वारावर वाहन पार्क करणे, सदोष वाहन चालवणे, धोकादायक वस्तूंची बेकायदेशीर वाहतूक, वाहन प्रशिक्षणाने प्रशिक्षण देताना मोबाईलचा वापर करणे, वळणावर ओव्हरटेकिंग करणे, चौक, क्रॉसलेन, शाळा परिसरात ओव्हरटेकिंग, अरुंद रस्ता, चढण किंवा उतार, बोगद्याजवळ वाहन थांबवणे, उजव्या मार्गिकेतून अवजड वाहन चालवणे, सिग्नल न देता डावे व उजवे वळण घेणे, कारणाशिवाय वाहन हळू चालवून अडथळा निर्माण करणे आणि विनाकारण अचानक ब्रेकचा वापर करून गती कमी केल्यास वाहनचालकांना न्यायालयाच्या चकरा माराव्या लागणार आहे.

सतत नियम मोडल्यास न्यायालय करणार कारवाई

यापुर्वी नियम मोडणाऱ्या चालकांवर वाहतूक विभागाकडून दंड आकारणी केली जात असे. तरीही सातत्याने मुजोर चालकांकडून नियमांचे उल्लंघन करण्यात येई. आता उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा अधिकार प्रशासनाकडे असला, तरी दंड भरण्यासाठी आणि प्रत्येक चुकीसाठी न्यायालयात चक्करा माराव्या लागणार आहेत. तसेच, चालकांना न्यायालयात सुनावेल ती शिक्षाही भोगावी लागणार आहे.

हेही वाचा - एनसीबीच्या प्रायव्हेट आर्मीकडून होणाऱ्या वसुलीला कंटाळून अभिनेत्रीची आत्महत्या, नवाब मलिकांचा आरोप

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.