ETV Bharat / city

बळीराजाला दिलासा; ठाकरे सरकारकडून कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर - कर्जमाफी

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती २०१९ योजनेंतर्गत आर्थिक संकटात सापडलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात येत आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात १५ हजार ३५८ शेतकऱ्यांच्या कर्जखात्याची पहिली यादी घोषित करण्यात आली होती.

crop loan waiver
कर्जमाफी
author img

By

Published : Feb 29, 2020, 8:07 PM IST

मुंबई - महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेतील कर्जमाफीची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर लगेच आज(शनिवार) दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यामुळे कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांवरील भार हलका होणार आहे.

या यादीत नगर जिल्ह्यातील २ लाख ५२ हजार शेतकऱ्यांचा समावेश असून ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झालेल्या दोन गावातील शेतकऱ्यांना तूर्त कर्जमाफी योजनेचा लाभ मिळू शकलेला नाही. बाबुडी घुमट व विळद अशी या दोन गावांची नावे आहेत.

वर्धा जिल्ह्यातील ४६ हजार ४२४ शेतकऱ्यांचा दुसऱ्या यादीत समावेश आहे. वर्धा जिल्हा प्रशासनाकडून आधार प्रमाणिकरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. वर्ध्यातील पहिल्या यादीत दोन गावातील १६६ शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली होती. त्यातील १५४ शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत पैसे जमा झाले आहेत.

दुसऱ्या यादीत कोल्हापूर जिल्ह्यातील ४२ हजार ९१३ शेतकऱ्यांचा समावेश असून पुढील प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात आली आहे.

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती २०१९ योजनेंतर्गत आर्थिक संकटात सापडलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात येत आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात १५ हजार ३५८ शेतकऱ्यांच्या कर्जखात्याची पहिली यादी घोषित करण्यात आली होती. शेतकऱ्यांची कर्ज खाती आधार कार्डशी जोडून त्यात कर्जमाफीचे पैसे जमा करण्यात येत आहेत. राज्यातील सुमारे ३४ लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देताना त्यांना हेलपाटे मारायला लागू नयेत, तसेच कर्जमाफी योजनेत अचूकता यावी, हा टप्प्याटप्प्याने याद्या जाहीर करण्यामागील उद्देश आहे, असे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी विधान परिषदेत सांगितले होते. तसेच पहिल्या यादीमध्ये अद्याप तरी त्रुटी असल्याचे निदर्शनास आलेले नाही, असेही त्यांनी नमूद केले होते.

हेही वाचा -

दिल्ली हिंसाचार : खासदार प्रवेश वर्मा देणार रतनलाल-अकिंतच्या कुटुंबीयांना एक-एक महिन्याचा पगार

'पार्थ' पवार पाठोपाठ आता 'जय' पवारही उतरणार राजकारणात?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.