मुंबई - राज्यात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात तिसऱ्या लाटेने ( Corona Third Wave ) डोकेवर काढल्याने निर्बंध अधिक कठोर केले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या घटत असल्याने राज्यातील निर्बंध अधिक शिथिल ( Restrictions More Relaxed ) करण्यात आले आहेत. नव्या नियमावलीनुसार पर्यटन स्थळ, मैदाने, उद्याने, स्विमिंग पूल, वॉटर पार्क, सिनेमागृह, नाट्यगृह आदी 50 टक्के ( Tourist spots, Grounds, Parks, Swimming Pools, Water Parks, Cinemas, Theaters etc. Will Be Opened at 50% capacity ) उपस्थितीत खुली करण्यास शासनाने संमती दिली आहे. मात्र लसींचे दोन डोस घेतलेल्यांनाच परवानगी देण्याची सूचना बंधनकारक केले आहे. यासंदर्भातील नवे परिपत्रक रात्री उशिरा जाहीर करण्यात आले.
राज्यातील निर्बंध पुन्हा एकदा शिथिल करण्याचा निर्णय सोमवारी (काल) राज्य सरकारने घेतला. त्यानुसार मंगळवारपासून (आज) सर्व पर्यटनस्थळे, राष्ट्रीय उद्याने, सफारी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लग्न समारंभ व अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आता क्षमतेच्या 25 टक्के किंवा जास्तीत जास्त 200 लोकांच्या उपस्थितीत करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तर अंत्यसंस्काराठी 20 व्यक्तींची मर्यादा हटविण्यात आली असून आता कितीही लोकांना उपस्थित राहता येईल. थिमपार्क, जलतरण तलाव, वॉटर पार्क 50 टक्के क्षमतेने, उपहारगृह, नाट्यगृह, चित्रपटगृह स्थानिक प्राधिकरणाने निर्धारित केलेल्या वेळेत 50 टक्के क्षमतेने सुरु करता येणार आहे. मनोरंजनात्मक कार्यक्रम 50 टक्के क्षमतेने, खुल्या मैदानात किंवा सभागृहात क्षमतेच्या 25 टक्के किंवा 200 लोकांना प्रवेश देण्यात आला आहे. या निर्णयामुळे अनेक व्यावसायिका दिलासा मिळाला आहे.
हेही वाचा - Maharashtra Corona Update : राज्यात सोमवारी 15 हजार नवे कोरोनाबाधित; 39 रुग्णांचा मृत्यू