ETV Bharat / city

आत्महत्येतही महाराष्ट्र अव्वल! 2019 मध्ये 18,916 जणांनी संपविले जीवन! - maharashtra suicide cases

2019 या वर्षामध्ये सर्वाधिक आत्महत्या करणाऱ्यांच्या यादीत महाराष्ट्र हा प्रथम क्रमांकावर राहिलेला आहे. 2019 मध्ये महाराष्ट्रात तब्बल 18,916 नागरिकांनी आत्महत्या केली आहे.

आत्महत्येतही महाराष्ट्र अव्वल! 2019 मध्ये 18,916 जणांनी संपविले जीवन!

author img

By

Published : May 7, 2021, 12:46 PM IST

मुंबई : नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालानुसार 2019 मध्ये देशात घडलेल्या एकूण आत्महत्यांमध्ये महाराष्ट्रातील आत्महत्या सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे . नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या 2019 मधील अहवालातून ही बाब समोर आली आहे. यावरचा ईटीव्ही भारतचा हा विशेष रिपोर्ट..

2015 पासून 2019 पर्यंत आत्महत्या करणाऱ्यांच्या संख्येत वाढ
देशात 2015 ते 2019 या वर्षांचा जर आढावा घेतला तर आत्महत्या करणाऱ्यांच्या संख्येत सतत वाढ होत आहे. 2015 मध्ये भारतात 1 लाख 33 हजार 623 नागरिकांनी आत्महत्या केलेली आहे. तर 2016 मध्ये हेच प्रमाण 1 लाख 31 हजार 8 आढळून आलेली आहे. 2017 मध्ये यामध्ये थोडीशी घट झाली असली तरी हे प्रमाण 1 लाख 29 हजार 887 वर होते. 2018 मध्ये हाच आकडा वाढून आत्महत्या करणाऱ्यांची संख्या एक लाख 34 हजार 516 पर्यंत गेली होती. मात्र 2019 मध्ये हेच प्रमाण वाढून तब्बल 1 लाख 39 हजार 123 नागरिकांनी आत्महत्या केलेली आहे.

आत्महत्येतही महाराष्ट्र अव्वल! 2019 मध्ये 18,916 जणांनी संपविले जीवन!
2019 मध्ये देशात सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात
2019 या वर्षामध्ये सर्वाधिक आत्महत्या करणाऱ्यांच्या यादीत महाराष्ट्र हा प्रथम क्रमांकावर राहिलेला आहे. 2019 मध्ये महाराष्ट्रात तब्बल 18,916 नागरिकांनी आत्महत्या केली आहे. त्याखालोखाल तामिळनाडूमध्ये 13,493 व्यक्तींनी आत्महत्या केली असून पश्चिम बंगालमध्ये 12,665 आत्महत्या झाल्याची नोंद करण्यात आली आहेत. याशिवाय मध्यप्रदेशमध्ये 12457, कर्नाटकामध्ये 11288 आत्महत्या झाल्याची नोंद झालेली आहे. 2019 या वर्षामध्ये झालेल्या एकुण आत्महत्यांमध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक 13.6 टक्के नागरिकांनी आत्महत्या केल्या आहेत.
या विविध कारणांमुळे आत्महत्या
2019 मध्ये भारतात झालेल्या आत्महत्यांच्या संदर्भातील आढावा घ्यायचा म्हटलं तर कौटुंबिक अडचणींमुळे तब्बल 32.4 टक्के व्यक्तींनी आत्महत्या केली आहे. आजारपणाला कंटाळून 17.1 टक्के नागरिकांनी आत्महत्या केली असून अंमली पदार्थांचे व्यसन लागल्यामुळे 5.6 टक्के नागरिकांनी आत्महत्या केली आहे. वैवाहिक वादामुळे 5.5 टक्के व्यक्तींनी आत्महत्या केली असून प्रेमभंग झाल्यामुळे 4.5 टक्के, आर्थिक अडचणींमुळे 4.2 टक्के, परीक्षेत नापास झाल्यामुळे 2 टक्के, बेरोजगारीमुळे 2 टक्के, व्यवसायिक स्तरावर अपयशामुळे 1.2 टक्के , संपत्ती वादावरून 1.1 टक्के तर गरीबीमुळे 0.8 टक्के नागरिकांनी आत्महत्या केलेल्या आहेत.
2019 या वर्षामध्ये आत्महत्या करणाऱ्यांच्या बाबतीत नॅशनल क्राईम रिपोर्ट ब्युरो ने म्हटले आहे की या वर्षामध्ये तब्बल
  1. 60 हुन अधिक वयोगटातील 8302 पुरुष व 2709 अशा महिलांनी आत्महत्या केली आहे
  2. 45 ते 60 या वयोगटातील 20 हजार 555 पुरुष चार हजार 881 महिलांनी आत्महत्या केलेली आहे
  3. 30 ते 45 या वयोगटातील 36 हजार 518 पुरुषांनी आत्महत्या केली आहे 2765 महिलांनी आत्महत्या केली आहे
  4. 18 ते 30 वयोगटातील 30 हजार 833 पुरुष तर 17 हजार 930 महिलांनी आत्महत्या केली आहे.

समाजातील या विविध घटकातील नागरिकांच्या आत्महत्या
2019 मध्ये भारतात झालेल्या आत्महत्यांमध्ये सेवानिवृत्तांचे आत्महत्या करणार्‍यांचे प्रमाणही 0.49 टक्के असून विद्यार्थ्यांचे आत्महत्या करण्याचे प्रमाण 7.4 टक्के एवढे आहे. शेतीशी निगडीत आत्महत्या करणाऱ्यांच्या व्यक्तींचे प्रमाण हे 7.4 टक्के असून, पगारी नोकरी करणाऱ्यांचे आत्महत्या करण्याचे प्रमाण 9.1 टक्के आहे. बेरोजगारीमुळे तब्बल 10.1 टक्के नागरिकांनी आत्महत्या केली असून व्यवसायात अपयश आल्यामुळे तब्बल 11.6 टक्के नागरिकांनी आत्महत्या केली आहे. विवाहित महिलांचे आत्महत्या करण्याचे प्रमाण 15.4 टक्के असून रोजंदारीवर काम करणाऱ्या 23.4 टक्के नागरिकांनी भारतात आत्महत्या केली आहे.

2019 या वर्षामध्ये भारतात घडलेल्या आत्महत्यांमध्ये
1) झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्या करणार्‍यांची संख्या 753
2) पाण्यात उडी मारुन आत्महत्या करणार्‍यांची संख्यां 7208
3) स्वतःला पेटवून घेऊन आत्महत्या करणार्‍यांची संख्या 5234
4) बंदुकीतून द्वारा गोळी झाडून आत्महत्या करणार्‍यांची संख्या 428
5) गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्यांची संख्या ही 74629
6) विष घेऊन आत्महत्या करणार्‍यांची संख्यां 35882
7) स्वतःला जखमी करून आत्महत्या करणार्‍यांची संख्या 828
8) इमारतीवरून उडी मारून आत्महत्या करणार्‍यांची संख्या 2034
9) चालत्या वाहनाखाली किंवा ट्रेन खाली येऊन आत्महत्या करणाऱ्यांची संख्या 3337
10) विजेच्या उपकरणांना हात लावून आत्महत्या करणार्‍यांची संख्या 752
11) इतर पद्धतीने आत्महत्या करणार्‍यांची संख्या 8038 इतकी आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.