ETV Bharat / city

धक्कादायक ! राज्यभरात 10 महिन्यात 2 हजार 225 शेतकऱ्यांच्या आत्महत्या; नेतेमंडळी सरकारस्थापनेत व्यस्त

यावर्षी अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान केले. सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात राज्यभरात ठिकठिकाणी तत्काळ मदत जाहीर करण्याची मागणी झाली. यासाठी शेतकरी संघटनांनी मोर्चेही काढले. मात्र, अद्याप राजकीय मंडळी सत्तास्थापनेच्या गडबडीत असल्याने शेतकऱ्यांना मदत पुरवण्यात उशिर होत आहे.

राज्यभरात मागील दहा महिन्यांमध्ये 2 हजार 225 शेतकऱ्यांच्या आत्महत्या
author img

By

Published : Nov 20, 2019, 6:56 AM IST

Updated : Nov 20, 2019, 8:27 PM IST

मुंबई - सततचा दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती, घसरणारा बाजारभाव आणि कर्ज, कर्जमाफीची अपूर्ण प्रक्रिया यामुळे राज्यभरात मागील दहा महिन्यांमध्ये 2 हजार 225 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक आकडेवारी निदर्शनास आली आहे.

राज्यभरात मागील दहा महिन्यांमध्ये 2 हजार 225 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक आकडेवारी निदर्शनास आली आहे.

यावर्षी अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान केले. सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात राज्यभरात ठिकठिकाणी तत्काळ मदत जाहीर करण्याची मागणी झाली. यासाठी शेतकरी संघटनांनी मोर्चेही काढले. मात्र, अद्याप राजकीय मंडळी सत्तास्थापनेच्या गडबडीत असल्याने शेतकऱ्यांना मदत पुरवण्यात उशिर होत आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 10 हजार कोटींची मदत करणार असल्याची घोषणा केली. मात्र, सरकार स्थापनेला पक्षांचे एकमत होत नसल्याने ही घोषणाही हवेत विरल्याचे चित्र आहे. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर राज्यपालांनी हेक्टरी 8 हजार रुपयांची मदत जाहीर केली. मात्र, शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अद्यापही पैसे जमा झाले नहीत.

यामध्येच लांबलेल्या परतीच्या पावसाने पिकांचे नुकसान झाल्यामुळे बळीराजाचे कंबरडे मोडले. तसेच बँका देखील पीककर्ज नाकारत असून विम्याची रक्कम मिळण्यात येत असलेल्या अडचणींमुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती आणखी खालावली आहे. परिणामी, यंदा ऑक्टोबर महिन्यापर्यंत राज्यभरात जवळपास अडीच हजार शेतकऱ्यांनी स्वत:चे आयुष्य संपवले आहे. यामध्ये सर्वाधिक 848 आत्महत्या अमरावती विभागात, तसेच यापाठोपाठ औरंगाबाद विभागात 715 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. विदर्भातील अमरावती, बुलडाणा आणि यवतमाळ हे तिन्ही जिल्हे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये पुन्हा एकदा 'डेंजर झोन'मध्ये आले आहेत. यवतमाळ जिल्ह्यात 227, तर बुलडाण्यात 223 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची आकडेवारी समोर आली आहे.

गतवर्षी राज्यभरात दुष्काळी परस्थिती होती. याउलट यंदा अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना ओल्या दुष्काळाचा सामना करावा लागला. परिणामी, शेतकऱ्यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली असून, बँकांनी कर्ज खात्यावर व्याजाच्या रकमेची थकाबाकी दाखवल्याने नवे कर्ज मिळण्यासाठी अडथळा निर्माण झाला आहे. गतवर्षीच्या खरिपातील पीकविम्याचे पैसे मिळण्यासही विलंब झाला असून, अद्याप शेतकरी विम्यातून मिळणाऱ्या लाभाच्या प्रतिक्षेत आहेत. तसेच अनेक ठिकाणी मागील वर्षीच्या खरीप हंगामातील पिकांचे परतावे खोळंबले आहेत.

राज्यात दिवसेंदिवस उग्र होणारी शेतकरी आत्महत्यांची संख्या चिंतेची बाब बनली आहे. विशेषतः अमरावती विभागात आणि दुष्काळी मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याचे मोठे आव्हान शासनापुढे उभे आहे. सिंचनात समृद्ध असणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातही शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे चित्र आहे. पुणे व नाशिक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सिंचन योजना पोहोचल्या असूनही पुणे विभागात 69 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. नाशिक विभागात द्राक्षबागांना परतीच्या पावसाने झोडपल्याने यंदा उत्पादनात घट झाली आहे. नाशिक विभागात एकूण 391 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

राज्य शासनाकडून विविध उपाययोजना केल्याचे सांगण्यात येते. मागील 4 वर्षांत सिंचन सोडून कृषी निधीत दुप्पटीने वाढ करण्यात आली. पीकविमा, विविध आपत्ती आणि कर्जमाफीच्या माध्यमातून तब्बल 48 हजार कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली. कृषी क्षेत्रातील गुंतवणूक वाढवतानाच शेतीचे पावसावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी प्रयत्न केल्याचे सरकाने सांगितले. तसेच यामुळे राज्याच्या इतिहासात सर्वाधिक पीक उत्पादन झाल्याचे राज्य शासनाने दावा केला आहे. परंतु, वाढता शेतकरी आत्महत्येचा आकडा या सुविधा व योजना थेट शेतकऱ्यांपर्यंत न झिरपल्याचा विरोधाभास दाखवतो.

आत्महत्येची आकडेवारी - विभागनिहाय

पुणे - 69
नाशिक - 391
औरंगाबाद - 715
अमरावती - 848
नागपूर - 183
कोकण - 01

सर्वाधिक आत्महत्या - जिल्हानिहाय

अमरावती - 215
बुलडाणा - 223
यवतमाळ - 227
बीड - 158
उस्मानाबाद - 99
औरंगाबाद - 107
अहमदनगर - 107

Intro:Body:
ईटिव्ही विशेष बातमी:

mh_mum_farmer_sucide_governor_mumbai_7204684

ओल्या दुष्काळात पुन्हा तेरावा ; शेतकरी आत्महत्येचं शुक्लकाष्ट सुटेना

मुंबई ः सततची दुष्काळी स्थिती, नैसर्गिक संकटे, शेतीमालाला दरातील अभाव, कर्जमाफीची अपूर्ण प्रक्रिया त्यामुळे बँकांनी पीककर्ज नाकारणे आदी अस्मानी आणि सुलताना संकटांचा सामना करण्याऱ्या शेतकऱ्यांचा धैर्याचा बांध फुटत असताना अवकाळी पावसाच्या संकटानं शेतकरी पुरता खचला आहे. यामुळे राष्ट्रपती राजवटीत राज्यातील सुमारे सव्वादोन हजार शेतकऱ्यांनी चालू वर्षाच्या पहिल्या १० महीन्यात मृत्यूला कवटाळले आहे. यात सर्वाधिक अमरावती विभागात ८४८
तर पाठोपाठ औरंगाबाद विभागात ७१५
शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत.

विशेषतः विदर्भातील अमरावती, बुलडाणा आणि यवतमाळ हे तीन जिल्हे शेतकरी आत्महत्यांमध्ये पुन्हा एकदा डेंजरझोनमध्ये आले आहेत. 
गेल्यावर्षी राज्यात भीषण दुष्काळी स्थिती होती. १९७२ पेक्षाही हा दुष्काळ मोठा होता असे जाणकार सांगतात. अजूनही या दुष्काळाची झळ कमी झालेली नाही उलट अवकाळी पावसानं शेतकरी उध्वस्थ केला. त्यामुळे शेती आणि शेतकऱ्यांपुढील अडचणी कमी न होता वाढतच आहेत. त्यातच कर्जमाफीतील घोळामुळे अजूनही हजारो शेतकरी पीक कर्जापासून वंचित आहेत.

बँकांनी कर्ज खात्यावर व्याजाच्या रकमेची थकबाकी दाखवल्याने शेतकऱ्यांना नवे कर्ज मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक चणचणीला सामोरे जावे लागते. 

गेल्या वर्षीच्या खरिपातील पीकविम्याचे पैसेही मिळण्यास विलंब झाला आहे. अद्यापही शेतकरी विम्याच्या लाभाच्या प्रतीक्षेत आहेत. गेल्यावर्षीचा खरीप हंगाम वाया गेला, दुष्काळामुळे रब्बीतही शेतकऱ्यांच्या हाती काही लागले नाही. परिणामी राज्यातील शेतकरी गेले वर्षभर मोठ्या आर्थिक विवंचनेतून मार्ग काढीत आहेत. ही सततची दुष्काळी स्थिती, नैसर्गिक संकटे, शेतीमालाला दरातील अभाव, बँकांकडून कृषी पत पुरवठा न होणे आदी विविध अस्मानी आणि सुल्तानी कारणांमुळे हतबल शेतकरी शेवटी मृत्यूला कवटाळतो हे कटू वास्तव आहे. 

गेल्या काही वर्षांत राज्यात शेतकरी आत्महत्यांची वाढती संख्या चिंतेची बाब बनली आहे. विशेषतः अमरावती विभागात आणि दुष्काळी मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याचे मोठे आव्हान शासनापुढे उभे आहे. राज्य शासनाकडून विविध उपाययोजना केल्याचे सांगितले जाते. मागील चार वर्षांत सिंचन सोडून कृषीच्या निधीत दुप्पटीने वाढ केली. पीकविमा, विविध आपत्ती आणि कर्जमाफीच्या माध्यमातून तब्बल ४८ हजार कोटी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले.

कृषितील गुंतवणूक वाढवत नेतानाच शेतीचे पावसावरील अवलंबित्व कमी केल्याने राज्याच्या इतिहासात सर्वाधिक पीक उत्पादन झाल्याचे राज्य शासनाचे दावे आहेत. जर पाच वर्षांत थेट हजारो कोटी रुपये थेट शेतकऱ्यांना मिळाले असतील तर मग राज्यातला शेतकरी पीक कर्जासाठी बँकांचे उंबरठे का झिजवतो आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या का कमी होत नाहीत, हे सवाल आवासून उभे आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी तातडीने शेतकरी दुरावस्था दूर करण्यासाठी हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.

शेतकऱ्यांपुढील समस्या

गेल्यावर्षी राज्यात भीषण दुष्काळ

दुष्काळात ओल्या दुष्काळाचे संकट

कर्जमाफीतील घोळामुळे प्रक्रिया अपूर्ण

थकबाकी दाखवल्याने शेतकऱ्यांना नवे कर्ज मिळत नाही

गेल्या खरिपातील पीक परतावा मिळण्यास विलंब

गेल्या रब्बीतही हाती काही लागले नाही: यंदाचा रब्बी संकटात

अवकाळी पावसाचं संकट

विभागनिहाय आत्महत्या
कोकण-१,पुणे - ६९, नाशिक - ३९१, औरंगाबाद - ७१५, अमरावती - ८४८, नागपूर - १८३.

सर्वाधिक आत्महत्यांचे जिल्हे
अमरावती - २१५, बुलडाणा - २२३, यवतमाळ - २२७, बीड - १५८, उस्मानाबाद - ९९, औरंगाबाद - १०७, अहमदनगर - १०७.

Conclusion:
Last Updated : Nov 20, 2019, 8:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.