ETV Bharat / city

Children Vaccination In Maharashtra : शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड घेणार विद्यार्थ्यांच्या लसीकरणाचा आढावा

राज्यभरात १५ ते १८ वर्षे वयोगातील विद्यार्थ्यांचे लसीकरण ( 15 to 18 Age Children Vaccination ) सुरु करण्यात आले आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड ( Education Minister Varsha Gaikwad Meeting ) या लसीकरणाचा ( Children Vaccination In Maharashtra ) आढावा घेणार आहेत. सोमवारी सर्व महत्वाचे अधिकारी बैठकीस उपस्थित राहणार आहेत.

वर्षा गायकवाड
वर्षा गायकवाड
author img

By

Published : Jan 2, 2022, 10:55 PM IST

मुंबई- कोरोना प्रतिबंध करण्यासाठी आता १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांना लस देण्यास मान्यता मिळाली ( 15 to 18 Age Children Vaccination ) आहे. याअनुषंगाने इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना लस देण्याबाबतच्या ( Children Vaccination In Maharashtra ) नियोजनाचा आढावा घेण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड ( Education Minister Varsha Gaikwad Meeting ) यांनी ३ जानेवारी रोजी सर्व संबंधितांची तातडीची बैठक आयोजित केली आहे.

शालेय शिक्षण विभागाचे नियोजन

कोविडचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ( Covid Spread In Maharashtra ) नागरिकांचे १०० टक्के लसीकरण होणे गरजेचे आहे. राज्य शासन यासाठी सर्व पातळीवर प्रयत्नशील आहे. विद्यार्थ्यांच्या लसीकरणाबाबत शालेय शिक्षण विभागाने नियोजन केले आहे. त्याचा शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड या बैठकीत आढावा घेतील.

महत्वाचे अधिकारी राहणार उपस्थित

या बैठकीस शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिवांसह शिक्षण आयुक्त, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, महानगरपालिका, नगरपालिकेचे शिक्षणाधिकारी, प्रशासन अधिकारी, गटशिक्षणाधिकारी ऑनलाइन उपस्थित राहणार आहेत.

मुंबईत होणार सुरुवात

सोमवारपासून ( दि. 3 जानेवारी ) 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात होणार ( 15 to 18 age Vaccine Starting Date ) आहे. त्यादृष्टीने मुंबई महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर पूर्णपणे केंद्रावर तयारी पूर्ण झाली आहे. मुंबईमध्ये 9 लसीकरण केंद्रावर ( Vaccination Centre in Mumbai ) 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण होणार आहे. मुंबई महापालिकेतील विद्यार्थ्यांना प्राधान्याने लस देण्यात येणार आहे. पालिकेच्या शाळांकडून विद्यार्थ्यांसाठी बसची सोय करण्यात आली आहे. बसने त्यांना लसीकरण केंद्रावर नेण्यात येणार असून लसीकरण झाल्यानंतर पुन्हा शाळेत सोडले जाणार आहे. पालिकेतर शाळेतील विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी केल्यानंतर लस दिली जाणार आहे. लसीकरण केंद्रावर गर्दी होणार नाही, याची काळजी घ्या, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. लस घेतल्यानंतर एखाद्या विद्यार्थ्याला त्रास होत असेल तर त्यासााठी बालरोग विभागाचे अधिकारी व कर्मचारी लसीकरण केंद्रावर असणार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.