मुंबई : राज्यात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाबरोबरच कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढताना दिसत आहे. आज राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येने ७ लाखांचा टप्पा पार केला आहे. गेल्या २४ तासांत राज्यात १० हजार ४२५ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ३२९ रुग्णांच्या मृत्युची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्या ७ लाख ३ हजार ८२३वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत २२ हजार ७९४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या संख्येने साऊथ आफ्रिका, पेरू, मेक्सिको यांसारख्या देशांना मागे टाकले आहे. तर राज्यातील मृतांच्या संख्येत साऊथ आफ्रिका, कोलंबिया, चिली, इराण यांसारख्या देशांना देखील मागे टाकले आहे.
समाधानाची बाब म्हणजे राज्यात आज सलग दुसऱ्या दिवशी नविन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक असून आज १२ हजार ३०० रुग्ण बरे झाले तर १० हजार ४२५ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून ते ७३.१४ टक्के झाले. राज्यभरात आतापर्यंत एकूण ५ लाख १४ हजार ७९० रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १ लाख ६५ हजार ९२१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
आज निदान झालेले नवीन रुग्ण, आणि नोंद झालेले मृत्यू यांचा तपशील..
मुंबई मनपा-५८७ (३५), ठाणे- १०५ (३), ठाणे मनपा-१४३ (९), नवी मुंबई मनपा-३०२ (८), कल्याण डोंबिवली मनपा-९४ (२), उल्हासनगर मनपा-१३ (५), भिवंडी निजामपूर मनपा-१३, मीरा भाईंदर मनपा-९२ (४), पालघर-८६, वसई-विरार मनपा-५५ (३), रायगड-१४८ (३५), पनवेल मनपा-६९, नाशिक-१७० (१), नाशिक मनपा-६७५ (७), मालेगाव मनपा-५, अहमदनगर-२५६ (५),अहमदनगर मनपा-२०६ (३), धुळे-३६, धुळे मनपा-६ (१), जळगाव- ४७६ (६), जळगाव मनपा-१४३ (६), नंदूरबार-१०७, पुणे- ४५८ (१३), पुणे मनपा-१२२८ (३६), पिंपरी चिंचवड मनपा-८४२ (९), सोलापूर-३०५ (२), सोलापूर मनपा-४० (२), सातारा-४८९ (८), कोल्हापूर-३५८ (२०), कोल्हापूर मनपा-१३२ (१७), सांगली-१०९ (५), सांगली मिरज कुपवाड मनपा-२२९ (१०), सिंधुदूर्ग-७४, रत्नागिरी-४६, औरंगाबाद-१७४ (६),औरंगाबाद मनपा-२३७ (१५), जालना-३२ (१), हिंगोली-६, परभणी-५०, परभणी मनपा-३३ (१), लातूर-८१(६), लातूर मनपा-८४ (२), उस्मानाबाद-१०५ (७),बीड-१२२ (३), नांदेड-१२९, नांदेड मनपा-१४ (१), अकोला-२२ (१), अकोला मनपा-१४, अमरावती-४२, अमरावती मनपा-४०, यवतमाळ-८४, बुलढाणा-२७ (१), वाशिम-७, नागपूर-१८४ (३), नागपूर मनपा-६०५ (२१), वर्धा-५०(१), भंडारा-४९ (२), गोंदिया-३४, चंद्रपूर-४२ (१), चंद्रपूर मनपा-३० (१), गडचिरोली-२४, इतर राज्य ७.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३७ लाख २४ हजार ९११ नमुन्यांपैकी ७ लाख ०३ हजार ८२३ नमुने पॉझिटिव्ह (१८.८९ टक्के) आले आहेत. राज्यात १२ लाख ५३ हजार २७३ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३३ हजार ६६८ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ३२९ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.२४ टक्के एवढा आहे.
राज्यातील जिल्हानिहाय कोरोना रुग्णांचा तपशील..
- मुंबई :बाधित रुग्ण- (१,३७,६८३) बरे झालेले रुग्ण- (१,११,९६२), मृत्यू- (७४७७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३०६), ॲक्टिव्ह रुग्ण- (१७,९३८)
- ठाणे : बाधित रुग्ण- (१,२४,२६१), बरे झालेले रुग्ण- (१,०१,७१५), मृत्यू (३६२४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१८,९२१)
- पालघर : बाधित रुग्ण- (२३,८००), बरे झालेले रुग्ण- (१६,७२७), मृत्यू- (५५९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६५१४)
- रायगड : बाधित रुग्ण- (२७,०२९), बरे झालेले रुग्ण-(२१,४३२), मृत्यू- (७२३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (४८७२)
- रत्नागिरी : बाधित रुग्ण- (३५२४), बरे झालेले रुग्ण- (१८९७), मृत्यू- (१२५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१५०२)
- सिंधुदुर्ग : बाधित रुग्ण- (१०१०), बरे झालेले रुग्ण- (५३१), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४६३)
- पुणे : बाधित रुग्ण- (१,५५,०३९), बरे झालेले रुग्ण- (१,०९,०३९), मृत्यू- (३८२३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४२,१७७)
- सातारा : बाधित रुग्ण- (१०,४९०), बरे झालेले रुग्ण- (६२९८), मृत्यू- (३०८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (३८८२)
- सांगली : बाधित रुग्ण- (९६६६), बरे झालेले रुग्ण- (५५९५), मृत्यू- (३१९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३७५२)
- कोल्हापूर : बाधित रुग्ण- (१८,६९०), बरे झालेले रुग्ण- (१२,१९८), मृत्यू- (५२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५९७२)
- सोलापूर : बाधित रुग्ण- (१७,५४५), बरे झालेले रुग्ण- (१२,३९९), मृत्यू- (६९७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (४४४८)
- नाशिक : बाधित रुग्ण- (३३,६२८), बरे झालेले रुग्ण- (२२,४८८), मृत्यू- (७६४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०,३७६)
- अहमदनगर : बाधित रुग्ण- (१७,२९२), बरे झालेले रुग्ण- (१३,४०२), मृत्यू- (२४४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३६४६)
- जळगाव : बाधित रुग्ण- (२३,३१७), बरे झालेले रुग्ण- (१५,८७२), मृत्यू- (७८०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६६६५)
- नंदूरबार : बाधित रुग्ण- (१९४५), बरे झालेले रुग्ण- (१०३४), मृत्यू- (६०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८५१)
- धुळे : बाधित रुग्ण- (६७७७), बरे झालेले रुग्ण- (४८३२), मृत्यू- (१८९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (१७५४)
- औरंगाबाद : बाधित रुग्ण- (२१,४०६), बरे झालेले रुग्ण- (१५,३४४), मृत्यू- (६२१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५४४१)
- जालना : बाधित रुग्ण-(३९४८), बरे झालेले रुग्ण- (२३२७), मृत्यू- (१२३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४९८)
- बीड : बाधित रुग्ण- (४२९१), बरे झालेले रुग्ण- (२३८१), मृत्यू- (९७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (१८१३)
- लातूर : बाधित रुग्ण- (६८४०), बरे झालेले रुग्ण- (३८३५), मृत्यू- (२४३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२७६२)
- परभणी : बाधित रुग्ण- (२१९३), बरे झालेले रुग्ण- (८३५), मृत्यू- (६९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२८९)
- हिंगोली : बाधित रुग्ण- (१२७४), बरे झालेले रुग्ण- (१०४६), मृत्यू- (२९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२९९)
- नांदेड : बाधित रुग्ण- (५४८५), बरे झालेले रुग्ण (२७८९), मृत्यू- (१६२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२५३४)
- उस्मानाबाद : बाधित रुग्ण- (५२७३), बरे झालेले रुग्ण- (३०३४), मृत्यू- (१३६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२१०३)
- अमरावती : बाधित रुग्ण- (४४८४), बरे झालेले रुग्ण- (३३८६), मृत्यू- (११०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९८८)
- अकोला : बाधित रुग्ण- (३५६४), बरे झालेले रुग्ण- (२८८५), मृत्यू- (१४९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (५२९)
- वाशिम : बाधित रुग्ण- (१४६७), बरे झालेले रुग्ण- (११३३), मृत्यू- (२४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३०९)
- बुलढाणा :बाधित रुग्ण- (२८५७), बरे झालेले रुग्ण- (१९५२), मृत्यू- (६९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८३६)
- यवतमाळ :बाधित रुग्ण- (२६३९), बरे झालेले रुग्ण- (१८४९), मृत्यू- (६४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७२६)
- नागपूर : बाधित रुग्ण- (२१,११३), बरे झालेले रुग्ण- (११,५०७), मृत्यू- (५४६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (९०५९)
- वर्धा : बाधित रुग्ण- (६३४), बरे झालेले रुग्ण- (३६५), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२५५)
- भंडारा : बाधित रुग्ण- (७८७), बरे झालेले रुग्ण- (५००), मृत्यू- (१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२७२)
- गोंदिया : बाधित रुग्ण- (१०८८), बरे झालेले रुग्ण- (७६०), मृत्यू- (१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३१४)
- चंद्रपूर : बाधित रुग्ण- (१५१०), बरे झालेले रुग्ण- (९०८), मृत्यू- (१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५८७)
- गडचिरोली : बाधित रुग्ण- (६१४), बरे झालेले रुग्ण- (५३३), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८०)
- इतर राज्ये : बाधित रुग्ण- (६६०), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (६६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५९४)
एकूण :
- बाधित रुग्ण- ७,०३,८२३
- बरे झालेले रुग्ण- ५,१४,७९०
- मृत्यू- २२,७९४
- इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- ३१८
- ॲक्टिव्ह रुग्ण- १,६५,९२१