मुंबई - राज्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. दिवसेंदिवस राज्यातील कोरोनाबाधितांमध्ये वाढ होत आहे. मंगळवारी तब्बल 28 हजार 699 कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे. तर 132 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यूदराचे प्रमाण 2.12 टक्के एवढे आहे.
राज्यातील कोरोनास्थिती
राज्यात मंगळवारी दिवसभरात तब्बल 28 हजार 699 कोरोबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 25 लाख 33 हजार 26 वर पोहोचला आहे. आज 13 हजार 165 जणांनी कोरोनावर मात केल्याने राज्यातील कोरोनामुक्तांची एकूण संख्या 22 लाख 47 हजार 495 वर पोहोचली आहे. तर आज कोरोनामुळे 132 जणांचा मृत्यू झाला असून, मृत्यूदराचे प्रमाण 2.12 टक्के एवढे आहे. दरम्यान राज्यात सध्या 2 लाख 30 हजार 641 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
राज्यातील 'या' भागांमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद
मुंबई महानगरपालिका- 3,514
ठाणे- 407
ठाणे मनपा- 814
नवी मुंबई-496
कल्याण डोंबिवली- 720
उल्हासनगर मनपा- 127
मीराभाईंदर- 186
पालघर- 114
वसई विरार मनपा-109
रायगड-122
पनवेल मनपा- 221
नाशिक-521
नाशिक मनपा-947
अहमदनगर- 456
अहमदनगर मनपा-222
धुळे- 238
धुळे मनपा - 179
जळगाव- 941
जळगाव मनपा- 163
नंदुरबार-618
पुणे- 1108
पुणे मनपा- 3,145
पिंपरी चिंचवड- 1,488
सोलापूर- 229
सोलापूर मनपा- 239
सातारा - 157
सांगली-167
रत्नागिरी-133
औरंगाबाद मनपा-1125
औरंगाबाद-652
जालना-404
परभणी-176
परभणी मनपा-165
लातूर मनपा-226
लातूर 210
उस्मानाबाद-183
बीड -213
नांदेड मनपा-1171
नांदेड-495
अकोला- 188
अकोला मनपा-372
अमरावती मनपा- 120
यवतमाळ-464
बुलडाणा-327
वाशिम - 280
नागपूर- 812
नागपूर मनपा-2,279
वर्धा-234
भंडारा-199
हेही वाचा - अँटिलिया प्रकरण: स्कॉर्पिओची फॉरेन्सिक तपासणी
हेही वाचा - केंद्र सरकारकडून मुख्यमंत्र्यांची मागणी मान्य; ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना मिळणार लस