मुंबई - राज्यात कोरोना कहर सुरू आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. आज तब्बल राज्यात 25 हजार 681 रुग्णांची नोंद झाली आहे. तर कोरोनामुळे आज दिवसभरात 70 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सप्टेंबर 2020 मध्ये कोरोनाची रुग्णसंख्या 24 हजारांच्या घरात होती. एका दिवसात सापडणाऱ्या रुग्णसंख्येचा तो उच्चांक होता. मात्र आता गेल्या दोन दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या 25 हजारांच्या वर जात असल्याने, नागरिकांच्या चितेंत भर पडली आहे.
राज्यातील कोरोनाची स्थिती
राज्यात आज दिवसभरात 25 हजार 681 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची एकूण संख्या 24 लाख 22 हजार 021 वर पोहोचली आहे. तर गेल्या 24 तासांमध्ये 14 हजार 400 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने, कोरोनावर मात केलेल्यांचा एकूण आकडा 21 लाख 89 हजार 965 वर पोहोचला आहे. राज्यात आज 70 जणांचा मृत्यू झाला असून, राज्यातील मृत्यू दर 2.20 टक्के एवढा आहे. सध्या राज्यात 1लाख 77 हजार 560 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
राज्यात कोणत्या भागात किती रुग्ण आढळले
मुंबई महानगरपालिका- 3,063
ठाणे- 256
ठाणे मनपा- 552
नवी मुंबई-391
कल्याण डोंबिवली- 644
उल्हासनगर-103
मीराभाईंदर-119
वसई विरार-120
रायगड-141
पनवेल मनपा- 239
नाशिक-514
नाशिक मनपा-939
अहमदनगर- 441
अहमदनगर मनपा-208
धुळे- 146
धुळे मनपा - 189
जळगाव- 764
जळगाव मनपा- 288
नंदुरबार-424
पुणे- 902
पुणे मनपा- 2,872
पिंपरी चिंचवड- 1,324
सोलापूर- 128
सोलापूर मनपा- 121
सातारा - 125
औरंगाबाद मनपा-1313
औरंगाबाद-567
जालना-685
परभणी-109
लातूर मनपा-138
बीड -302
नांदेड मनपा- 456
नांदेड-345
अकोला- 227
अकोला मनपा-431
अमरावती- 210
अमरावती मनपा- 242
यवतमाळ-432
बुलडाणा-442
वाशिम - 210
नागपूर- 681
नागपूर मनपा-2,617
वर्धा-357
भंडारा-103