ETV Bharat / city

महाराष्ट्र कोरोना अपडेट - रुग्ण वाढ सुरूच, 8702 नवीन रुग्ण, 56 मृत्यू - कोरोना बातमी

गेल्या काही दिवसात रुग्णसंख्या 6 हजाराच्या वर होती, 22 फेब्रुवारीला त्यात किंचित घट झाली होती. मात्र त्यात पुन्हा मोठी वाढ झाली आहे. राज्यात आज 8702 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 56 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Maharashtra Corona Update
महाराष्ट्र कोरोना अपडेट
author img

By

Published : Feb 25, 2021, 10:24 PM IST

मुंबई - आरोग्य विभागाने केलेल्या उपाययोजनांमुळे राज्यात गेल्या वर्षीच्या मार्चपासून सुरू झालेला कोरोनाचा प्रसार काही प्रमाणात कमी झाला होता. मात्र नागरिकांकडून कोरोना संदर्भातील नियमांचे पालन केले जात नसल्याने रुग्णसंख्या वाढू लागली आहे. गेल्या काही दिवसात रुग्णसंख्या 6 हजाराच्या वर होती. 22 फेब्रुवारीला त्यात किंचित घट झाली होती. मात्र त्यात पुन्हा मोठी वाढ झाली आहे. राज्यात आज 8702 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 56 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

8702 नवीन रुग्ण -

आज राज्यात 8702 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 21 लाख 29 हजार 821 वर पोहचला आहे. तर आज 56 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 51 हजार 993 वर पोहचला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर 94.70 टक्के तर मृत्यूदर 2.44 टक्के आहे. राज्यात आज 3744 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचा आकडा 20 लाख 12 हजार 367 वर पोहचला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1 कोटी 60 लाख 26 हजार 587 नमुन्यांपैकी 21 लाख 29 हजार 821 नमुने म्हणजेच 13.29 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 3 लाख 5 हजार 745 व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये असून 64 हजार 260 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

रुग्ण संख्या वाढली -

राज्यात दोन महिन्यानंतर पुन्हा रुग्णसंख्या वाढली आहे. राज्यात 11 डिसेंबरला 4268, 12 डिसेंबरला 4269, 16 डिसेंबरला 4304 रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर यात घट होऊन 2 ते 3 हजाराच्या आसपास रुग्ण आढळून येत होते. 14 फेब्रुवारीला 4092, 15 फेब्रुवारीला 3365, 16 फेब्रुवारीला 3663, 17 फेब्रुवारीला 4787, 18 फेब्रुवारीला 5427, 19 फेब्रुवारीला 6112, 20 फेब्रुवारीला 6281, 21 फेब्रुवारीला 6971, 22 फेब्रुवारीला 5210 रुग्ण आढळून आले होते. त्यात 23 फेब्रुवारीला किंचित वाढ होऊन 6218, 24 फेब्रुवारीला 8807 तर आज 8702 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

या दिवशी सर्वात कमी रुग्णांची नोंद -

राज्यात गेल्या दहा महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. या कालावधीत राज्यात 15 नोव्हेंबरला 2 हजार 544, 18 जानेवारीला 1 हजार 924 तर 25 जानेवारीला 1 हजार 842 इतके सर्वात कमी रुग्ण आढळून आले आहेत.

आज या विभागात सर्वाधिक रुग्ण -

  • मुंबई पालिका - 1145
  • ठाणे - 90
  • ठाणे पालिका - 224
  • नवी मुंबई पालिका - 137
  • कल्याण डोंबिवली पालिका - 166
  • नाशिक -184
  • नाशिक पालिका - 526
  • अहमदनगर - 191
  • अहमदनगर पालिका - 78
  • जळगाव - 185
  • जळगाव पालिका - 111
  • पुणे - 317
  • पुणे पालिका - 779
  • पिंपरी चिंचवड पालिका - 429
  • सातारा - 112
  • औरंगाबाद - 103
  • औरंगाबाद पालिका - 249
  • अकोला पालिका -107
  • अमरावती - 209
  • अमरावती पालिका - 497
  • यवतमाळ - 162
  • बुलढाणा - 135
  • वाशीम - 229
  • नागपूर - 303
  • नागपूर पालिका - 864
  • वर्धा - 185

    हेही वाचा- मुकेश अंबानींच्या बंगल्याजवळ आढळली बेवारस कार, जिलेटीनच्या कांड्या सापडल्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.