मुंबई - मागील आठ दिवसांपासून कोरोनाचा रुग्ण संख्येत ( Maharashtra Corona Patients ) होणाऱ्या वाढीत मोठी घट दिसून आली आहे. आज (सोमवारी) 28 हजार नव्या यांची ( Maharashtra Corona Update 24rd January 2022 ) राज्यात नोंद झाली असून त्यापैकी 35 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 21 हजार रुग्ण बरे झाले आहेत, असा दावा राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ( Maharashtra Health Department ) केला आहे. दुसरीकडे रविवारी ओमायक्रॉनचा एकही रुग्ण आढळून आला नव्हता. मात्र आज 86 रूग्ण आढळून आले आहेत. सर्वाधिक रुग्ण नागपूर, पुणे मनपा आणि पिंपरी चिंचवडमधील आहेत, असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.
राज्यात 28 हजार 286 रुग्ण आढळून आले. त्यामुळे आजपर्यंतची रुग्णसंख्या 75 लाख 35 हजार 511 इतकी झाली आहे. तर 1 लाख 42 हजार 151 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात आजच्या 36 मृतांचा समावेश आहे. राज्यातील मृत्यूदर 1.88 टक्के एवढा आहे. तर 21 हजार 941 इतके रुग्ण बरे होऊन घरी परतले असून आजपर्यंत 70 लाख 69 हजार 936 कोरोना बाधित बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही 94.09 टक्के एवढे आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 7 कोटी 35 लाख 11 हजार 861 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 75 लाख 25 हजार 511 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 14 लाख 35 हजार 141 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 3402 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 2 लाख 99 हजार 604 कोरोना सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
ओमायक्रॉनचे 86 रुग्ण
राज्यात आज ओमायक्रॉनचे 144 नव्या बाधितांची नोंद झाली. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने हे अहवाल तपासले आहेत. त्यात नागपूर सर्वाधिक 46, तर पुणे मनपा 28, पिंपरी चिंचवड 3, वर्धा 2, मुंबई, अमरावती, यवतमाळ, भंडारा, ठाणे मनपा आणि पुणे ग्रामीण मध्ये प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. त्यामुळे राज्यात आजपर्यंत 2 हजार 845 एवढे रुग्ण आहेत. तर 1454 जणांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्याने सर्वांना घरी सोडण्यात आले. आजपर्यंत 6358 नमुने जनुकीय चाचणीसाठी पाठवले. त्यापैकी 6223 चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले. उर्वरित 105 नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत.
'या' विभागात सर्वाधिक कोरोना रुग्ण
मुंबई महापालिका - 1857
ठाणे - 210
ठाणे मनपा - 467
नवी मुंबई पालिका - 753
कल्याण डोबिवली पालिका - 281
मीरा भाईंदर - 115
वसई विरार पालिका - 141
नाशिक - 648
नाशिक पालिका - 1426
अहमदनगर - 602
अहमदनगर पालिका - 295
पुणे - 1592
पुणे पालिका - 3383
पिंपरी चिंचवड पालिका - 2743
सातारा - 1071
नागपूर मनपा - 2876
हेही वाचा - Mumbai Corona Update : मुंबईत सोमवारी १८५७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद, ११ जणांचा मृत्यू