मुंबई - आज राज्यात ३२७९ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा २०,५२,९०५ वर पोहचला आहे. राज्यात आज २५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण ५१,४१५ हजार रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.५ टक्के एवढा आहे. राज्यात आज एकूण ३०,२६५ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.८४ टक्के -
राज्यात आज ६,१०७ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आजपर्यंत एकूण १९,७०,०५३ कोरोना बाधित बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.८४ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,५१,६३,७८१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २०,५२,९०५ नमुने म्हणजेच १३.५४ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात १,६६,७८५ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये असून राज्यात एकूण ३०,३६५ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
या दिवशी कमी रुग्णांची नोंद -
राज्यात १५ नोव्हेंबरला २,५४४, १६ नोव्हेंबरला २,५३५, १७ नोव्हेंबरला २,८४०, १८ जानेवारीला १,९२४ सर्वात कमी रुग्णांची नोंद झाली आहे.
हेही वाचा- शिक्षक आक्रमक : मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर आत्मदहन करण्याचा इशारा